भारताविरोधात चीनच्या वाढत्या कुरापती, सीमेजवळ सैन्यतळ उभारणी सुरु
सीमेवरील तणावाच्या पाश्वभूमीवर चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील दक्षिणकडे सैन्याचा तळ उभारणीला सुरुवात केली आहे. (China LAC)
नवी दिल्ली: भारत (India) आणि चीन (China) यांच्यातील तणाव जून महिन्यापासून वाढलेला आहे. जून महिन्यात लडाखजवळील गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्या सैन्यात झटापट झाली. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले. भारतीय सैन्याने देखील चीनला जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र, गेल्या काही वर्षांपासून चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) कुरापती वाढल्या आहेत. सीमेवरील तणावाच्या पाश्वभूमीवर चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील दक्षिणकडे सैन्याचा तळ उभारणीला सुरुवात केली आहे. भारताचा दुसरा शेजारी असलेल्या पाकिस्तान कोरोना संकटाचा सामना करतोय. (China is building military camp near LAC)
चीन
भारत आणि चीन यांच्यातील वाढत्या तणावाच्या स्थिती चीन त्यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ सैन्याचा तळ उभारण्यास सुरुवात केली आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार चीनने 2017 मध्ये डोकलाममध्ये भारतासोबत झालेल्या वादानंतर यादृष्टीनं काम सुरु केलं होते. (China is building military camp near LAC)
पाकिस्तान
कोरोना विषाणू संसर्गामुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. मगंळवारी नॅशनल कमांड अँड ऑपरेशन सेंटरकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत वाढ झाली आहे. मंगळवारी पाकिस्तानात कोरोनामुळं 89 जणांचा मृत्यू झाला. ही गेल्या पाच महिन्यातील कोरोना मृत्यूंची सर्वाधिक संख्या आहे. दुसरीकडे इमरान खान यांच्या विरोधात विरोधी पक्षही आक्रमक झाले आहेत.
बांग्लादेश
भारतामध्ये वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी बांग्लादेशात मशिदी आणि मदरशांमध्ये महिलांवर अत्याचार होत असल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर नसरीन यांनी याबाबत आरोप केले आहेत.
नेपाळमध्ये के.पी.ओली शर्मा यांच्या विरोधात नाराजी
भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये आणखी एक वादळ उठलं आहे. नेपाळला पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी काही संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. आंदोलक मोठ्या प्रमाणात रस्त्यांतवर उतरले होते. पंतप्रधान के.पी.ओली शर्मा यांच्या विरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. आंदोलकांनी नेपाळमधील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांवर रोष व्यक्त केला आहे. हिंदू राष्ट्र घोषित करुन नेपाळमध्ये राजेशाही लागू करावी, अशी मागणी देखील आंदोलकांनी केली आहे.
वुहान: ज्या शहरातून कोरोना संसर्ग झाला तिथे एका वर्षानंतर काय चाललेय?#china #wuhan #corona #COVID19 https://t.co/lw7J7AOrf9
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 9, 2020
संबंधित बातम्या:
नेपाळ-चीनने माऊंट एव्हरेस्टची उंची मोजली ! उंची वाढली की कमी झाली?
पाकिस्तानातील गोंधळ वाढला, इमरान खान यांच्या विरोधात विरोधी पक्षांचे नेते सामूहिक राजीनामे देणार
(China is building military camp near LAC)