चीनचा मोठा निर्णय, माऊंट एव्हरेस्टवर आता विभाजन रेषा, कारण काय ?
चीन सरकार माऊंट एव्हरेस्टवर ( Mount Everest) थेट विभाजन रेषा आखण्याचा विचार करत आहे. (China spreration line mount everest)
बिजींग : कोरोना महासाथीमुळे (Corona infection) संपूर्ण जगात हाहा:कार माजला आहे. आज जगाच्या कानाकोपऱ्यात कोरोनाचा प्रसार पहायला मिळतोय. माऊंट एव्हरेस्टवर चढाई करणारे गिर्यारोगकसुद्धा या विषाणूपासून सुटू शकलेले नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन चीन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. चीन सरकार माऊंट एव्हरेस्टवर ( Mount Everest) थेट विभाजन रेषा आखण्याचा विचार करत आहे. त्यासाठी चीनने तयारीसुद्धा सुरु केलीये. नेपाळहून येणाऱ्या कोरोनाबाधित गिर्यारोहकांपासून आपल्या गिर्यारोहकांचे संरक्षण व्हावे म्हणून चीनने हा निर्णय घेतलाय. (China is going to form spreration line on Mount Everest to avoid Corona infection)
नेपाळच्या 30 गिर्यारोहकांना कोरोनाची लागण
माऊंट एव्हरेस्ट हे शिखर नेपाळ आणि चीनच्या सीमेवर आहे. या पर्वतावर दोन्ही देशातील गिर्यारोहक चढाई करतात. त्यामुळे या दोन्ही देशातील गिर्यारोहकांचा पुढच्या प्रवासात संपर्क येतो. मागील काही दिवसांपूर्वी नेपाळकडून येणारे काही गिर्यारोहक कोरोनाबाधित असल्याचे समोर आले होते. जवळपास 30 जणांना कोरोनाची लगण झाली होती. हीच गोष्ट लक्षात घेऊन चीन सराकरने माऊंट एव्हरेस्टवर विभाजन रेषा आखण्याचे ठरवले आहे.
शिखरावर एका वेळी फक्त सहा जण उभे राहू शकतात
बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार माऊंट एव्हरेस्टवर मोठ्या प्रमाणात बर्फ जमा होतो. याच कारणामुळे एव्हरेस्टच्या शिखरावर एका वेळी फक्त सहा लोकांना उभे राहता येऊ शकते. तसेच एका वेळी गिर्यारोहकांनी पर्वतावर उभे राहण्याचा प्रयत्न केला तर गिर्यारोहकांची पर्वतावर रांग लागते. याच कारणामुळे येथे कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चीनचे गिर्यारोहकांना कडक निर्देश
दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चीनने त्यांच्या गिर्यारोहकांना कडक निर्देश दिले आहेत. गिर्यारोहकांनी नेपाळच्या कोणत्याही नागरिकाच्या संपर्कात न येण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच एव्हरेस्टवरील कोणत्याही वस्तुला स्पर्श करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच उत्तर आणि दक्षिणेकडून येणाऱ्या गियारोहकांच्या संपर्कात न येण्याच्यासुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, चीन सरकारने या वर्षी एकूण 21 गिर्यारोहकांना एव्हरेस्टवर चढाई करण्याची परवानगी दिलेली आहे. या सर्व गिर्यारोहकांना एप्रिलच्या सुरुवातीलाच क्वॉरन्टाईन करण्यात आलं होतं. चीनकडून आखण्यात येणाऱ्या विभाजन रेषांचे निकष काय आहेत. त्यासाठीचे मापदंड काय आहेत, याबाबत अजूनतरी स्पष्टता नाही. मात्र, चीनकडून सीमा विभाजने रेषा आखण्यात येत आहे. तसी तयारीसुद्धा सुरु झाली आहे.
इतर बातम्या :
Maharashtra Coronavirus LIVE Update :वाशिम जिल्ह्यात दिवसभरात 467 नव्या रुग्णांची नोंद
इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये पुन्हा संघर्ष, 100 रॉकेट डागली, 20 नागरिकांचा बळी
कोरोना संसर्ग हे चीनचं जैविक हत्यार?; सीक्रेट कागदपत्रांच्या आधारे अमेरिकेचा दावा
(China is going to form spreration line on Mount Everest to avoid Corona infection)