Video: चीन म्हणतो, भारतीय लोक कोरोनाचा लवकरच पराभव करतील, कुठल्याही मदतीसाठी तयार !
भारतातील कोरोनाच्या भीषण संकटाने जगाचं लक्ष केंद्रीत केलंय. जगभरातील आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्थांनी भारतातील कोरोना परिस्थितीवर वृत्तांकन केलंय.
बीजिंग : भारतातील कोरोनाच्या भीषण संकटाने जगाचं लक्ष केंद्रीत केलंय. जगभरातील आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्थांनी भारतातील कोरोना परिस्थितीवर वृत्तांकन केलंय. यात चीनचाही समावेश आहे. चीनची सरकारी वृत्तसंस्था ग्लोबल टाईम्सने ट्विट करत भारताने सर्वाधिक कोरोना रुग्णांचा विक्रम मोडल्याची माहिती देत एक व्हिडीओ पोस्ट केलाय. यात त्यांनी भारताला मदतीचा हात पुढे करत असतानाच भारतीय नागरिक लवकरच कोरोनाला पराभूत करतील, असा विश्वास व्यक्त केलाय (China offers help to India amid increasing corona patient and lack of facility).
ग्लोबल टाईम्सने पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे, “भारताने 3 लाख 46 हजार रुग्णांच्या नोंदीसह प्रतिदिन कोरोना रुग्णांच्या आकड्याचा जागतिक विक्रम मोडलाय. या काळात भारतात कोरोना लस, ऑक्सिजन आणि बेड्सचीही कमतरता आहे. या कठीण परिस्थितीची चीनने नोंद घेतलीय. या संकटाच्या काळात चीनला भारताला मदतीचा हात देण्याची इच्छा आहे. तात्पुरत्या साथीरोगाच्या विरोधातील वैद्यकीय साहित्याच्या तुटवड्यावर उपाययोजना म्हणून आम्ही भारताला मदतीसाठी तयार आहोत.”
India has been breaking the record of the world’s highest daily surge with more than 346,000 new cases and a shortage of vaccines and oxygen. China is willing to help India in this crisis. pic.twitter.com/cxlseHSoin
— Global Times (@globaltimesnews) April 25, 2021
“कोरोना विरुद्धच्या लढाईत चीनचं सरकार आणि नागरिक भारतासोबत”
“आम्ही भारतातील कोरोना नियंत्रणासाठी देखील सहकार्य करु. चीनची प्रामाणिक सहानुभुती भारतासोबत आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत चीनचं सरकार आणि नागरिक भारताच्या सरकार आणि नागरिकांसोबत आहेत. चीन भारताला मदतीसाठी, सहकार्यासाठी तयार आहे. आम्ही याबाबत भारताशी चर्चा करत आहोत. आम्हाला विश्वास आहे की भारतीय नागरिक लवकरच कोरोनाला पराभूत करतील,” असंही ग्लोबल टाईम्सच्या या व्हिडीओत नमूद करण्यात आलंय.
अमेरिकेनं भारताचं ‘रॉ’ मटेरियल रोखलं, चीननं डिवचलं, तीन देश, एक कार्टून
दरम्यान, चीनने अमेरिकेला भारतात कोरोनाचं संकट आलेलं असताना कोरोना लसीच्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर लावलेल्या निर्बंधावरुन चांगलंच घेरलंय. ग्लोबल टाईम्सने एक कार्टून प्रकाशित केलंय. यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी आपण भारतासोबत असल्याच्या वक्तव्याचा आधार घेत शाब्दिक फुलोऱ्यांपेक्षा कृतीच अधिक स्पष्टपणे बोलते असं म्हटलंय. भारतात एकिकडे कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढतेय, तर दुसरीकडे कोरोनावर उपचार करणाऱ्या औषधांसह ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यातच सीरम इन्स्टिट्युटला कोरोना लसी तयार करण्यासाठी आवश्यक असलेला अमेरिकेतून येणारा कच्चा मालही कमी पडलाय. अमेरिकेने मात्र याबाबत आडमुठी भूमिका घेतल्याचं दिसतंय. यावरुनच चीनने अमेरिकेला लक्ष्य केलंय.
“शब्दांपेक्षा कृतीचा आवाज मोठा असतो”
ग्लोबल टाईम्सच्या या कार्टूनमध्ये अमेरिका आपण भारतीय नागरिकांसोबत असल्याचं बोलताना दाखवलंय. मात्र, दुसरीकडे कोरोना लसीच्या कच्च्या मालावर निर्बंध लावत असल्याचं रेखाटलंय. हे कार्टून ट्विटरवर पोस्ट करताना ग्लोबल टाईम्सने शब्दांपेक्षा कृती अधिक मोठ्याने बोलते असं कॅप्शन दिलंय. तसेच व्हॅक्सिन रॉ मटेरियल आणि इंडिया फाईट्स कोविड 19 हे दोन हॅशटॅग वापरले आहेत.
हेही वाचा :
अमेरिकेनं भारताचं ‘रॉ’ मटेरियल रोखलं, चीननं डिवचलं, तीन देश, एक कार्टून, वाचा सविस्तर
राजपक्षे सरकारनं श्रीलंका चीनला विकल्याचा आरोप, जनता बंडाच्या तयारीत; समजून घ्या संपूर्ण प्रकरण
चीनवर कोरोना पसरवल्याचा वारंवार आरोप, आता WHO च्या अहवालात मोठा खुलासा, ड्रॅगनची भूमिका काय?
व्हिडीओ पाहा :
China offers help to India amid increasing corona patient and lack of facility