चीनने अंतराळात केलेला प्रयोग भारताला महागात पडणार? आज क्षेपणास्त्राचा तुकडा आकाशातून जमीनीवर पडणार
रॉकेटवरील (Rocket) निंयत्रण सुटल्यानं ते निर्धारित ठिकाणी पडण्याऐवजी नक्की कुठे पडेल या विषयी पुन्हा एकदा अनिश्चितता निर्माण झाली आहे. रॉकेट पृथ्वीवर कोणत्या ठिकाणी पडणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
चीनच्या अंतराळ मोहिमेला (China Space Mission) एक धक्का बसला आहे. चीननं अवकाशात सोडलेल्या लाँग मार्च 5 ब रॉकेटवरील ( Long March 5b) नियंत्रण सुटल्यानं नवी समस्या निर्माण झाली आहे. रॉकेटवरील (Rocket) निंयत्रण सुटल्यानं ते निर्धारित ठिकाणी पडण्याऐवजी नक्की कुठे पडेल या विषयी पुन्हा एकदा अनिश्चितता निर्माण झाली आहे. रॉकेट पृथ्वीवर कोणत्या ठिकाणी पडणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे चीन ने पुन्हा एकदा पुढील काही दिवस संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे, अशी माहिती, श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, यांनी निदर्शनास आणली आहे. या मोहिमेबाबतही त्यांनी सविस्तर माहिती आणि विश्लेषण केले आहे. हा नेमका पेच काय? यावरही एक नजर टाकूया.
किती काळ रॉकेट आकाशात राहू शकतं?
रॉकेटचं बाह्य आवारण एका आठवड्यापर्यंत अंतराळात राहू शकतं, असं स्पेस डॉट कॉमनं (Space.Com) ‘द एअरोस्पेस कॉर्पोरेशन सेंटर फॉर ऑर्बिटल रीएंट्री अँड डेब्रिस स्टडीज’च्या (कॉर्ड्स) संशोधकांच्या हवाल्याने म्हटलं आहे. यासंदर्भात यूएस स्पेस फोर्सच्या स्पेस सर्व्हिलन्स नेटवर्ककडून ट्रॅकिंग डाटा गोळा करण्यात आला आहे. त्या डाटाचं विश्लेषण करून संशोधकांनी रॉकेटचं बाह्य आवरण 30-31 जुलै 2022 पर्यंत पृथ्वीच्या वायूमंडळात प्रवेश करणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. चीनच्या वेन्च्यंग प्रक्षेपण केंद्रावरून लाँग मार्च 5 ब रॉकेट 24 जुलै 2022 च्या 06:22 ( जागतिक वेळेनुसार ) प्रक्षेपित केले गेले होते.
आधीही एका रॉकेटचं नियंत्रण सुटलं
असेच 2018 मध्येही चीनच्या टायगॉग हा मॉड्युल वरील नियंत्रण सुटलं होतं, चिनी राॅकेट लाॅन्ग मार्च ५ब गेल्या वर्षी 09 मेच्या सकाळी 07:54 वाजता भारताच्या दक्षिण पश्चिम दिशेला असलेल्या मालदीव बेटांच्या पश्चिमेकडील असलेल्या हिंद महासागरात कोसळले तसेच 3 एप्रिल 2022 रोजी असाच एक रॉकेट चा एक तुकडा चंद्रपूर गडचिरोली भागात कोसळला.
चीनने जगाचं टेन्शन वाढवलं
चीन आपल्या वेगवेगळ्या अंतराळ मोहिमेत सहभागी होतो व या राॅकेट वरील नियंत्रण ण ठेवल्याने तो संपूर्ण जगाला वेठीस धरत आहे. आपल्या धोरणामुळे जगाला वेठीस धरण्याचा चीनचा इतिहास सर्वांना माहिती आहे. संपूर्ण जग बंद पाडणाऱ्या करोना व्हायरसचा उद्रेक चीननमध्येच झाला होता. आता चीनने अंतराळात केलेल्या प्रयोगांमुळे पुन्हा एकदा सर्वांची धास्ती वाढवली आहे. हा चीन लडाख सीमेवर तर भारताचं टेन्शन वाढवतच आहे. मात्र इकडे अंतरात तर संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवत आहे.