चीनचा धूर्तपणा पुन्हा उघड, पूर्व लडाखमध्ये पॅंगॉन्ग त्सो लेकजवळ दुसरा पूल, सॅटलाईट इमेजेसमुळे खुलासा

नवीनतम हाय-रिझोल्यूशन उपग्रह प्रतिमेचे विश्लेषण करणार्‍या तज्ञांच्या मते, दुसरा पूल तयार करण्यासाठी आवश्यक असलेली क्रेनसारखी उपकरणे हलवण्यासाठी पहिला पूल वापरला जात आहे.

चीनचा धूर्तपणा पुन्हा उघड, पूर्व लडाखमध्ये पॅंगॉन्ग त्सो लेकजवळ दुसरा पूल, सॅटलाईट इमेजेसमुळे खुलासा
भारत-चीनImage Credit source: पीटीआय
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 9:47 AM

बीजिंग : चीनचा धूर्तपणा (China) पुन्हा एकदा समोर आला आहे. चीनने पूर्व लडाखमध्ये पॅंगॉन्ग त्सो (Pangong Tso Lake) सरोवरावर दुसरा पूल बांधण्यास (Bridge) सुरुवात केली आहे. हा ब्रीज शस्त्रसज्ज अवजड वाहनांची वाहतूक करण्यास सक्षम असेल. भारताने दावा केलेल्या प्रदेशात एक पूल बांधून पूर्ण केल्याच्या काही महिन्यांतच चीनने हा दुसरा पूल बांधला आहे.

हे सुद्धा वाचा

पहिल्या पुलाला समांतर दुसरा पूल बांधण्यात येत आहे. अरुंद असलेला पहिला पूल यावर्षी एप्रिल महिन्यात पूर्ण झाला. नवीनतम हाय-रिझोल्यूशन उपग्रह प्रतिमेचे विश्लेषण करणार्‍या तज्ञांच्या मते, दुसरा पूल तयार करण्यासाठी आवश्यक असलेली क्रेनसारखी उपकरणे हलवण्यासाठी पहिला पूल वापरला जात आहे.

पाहा सॅटेलाईट इमेजेस

कुठे आहे हा ब्रिज?

पँगॉन्ग लेकच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यांना जोडणारा पहिला पूल बांधल्याचा अहवाल जानेवारीमध्ये समोर आला, तेव्हा परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, हा पूल 60 वर्षांपासून बेकायदेशीर चीनचा कब्जा असलेल्या भागात आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, भारताने असे अवैध प्रकार कधीच मान्य केलेले नाहीत. दुसर्‍या पुलाखाली बोटींच्या हालचालीसाठी परवानगी देण्यासाठी जागा किंवा पोकळी असू शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

ब्रिजची रचना कशी?

दुसऱ्या पुलाची रुंदी 10 मीटर आणि लांबी 450 मीटर असेल. पुलाच्या दोन्ही टोकांना जोडून रस्त्याच्या जोडणीचे काम समांतरपणे सुरू झाले आहे. नवीन पूल दोन्ही किनाऱ्यांवरुन एकाच वेळी बांधला जात आहे. तो रणगाडे आणि शस्त्रसज्ज वाहनांसह मोठ्या आणि अवजड वाहनांना सामावून घेण्यास सक्षम असेल, असे मानले जाते.

134-किमी-लांब असलेल्या पॅंगॉन्ग त्सो तलावाच्या सर्वात अरुंद विभागात दोन्ही पूल आहेत. पहिला पूल तलावाच्या उत्तर किनार्‍यावरील पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) च्या महत्त्वाच्या स्थानाच्या दक्षिणेस होता, जिथे तलावाचे दोन किनारे 500 मीटर अंतरावर आहेत

जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.