बीजिंग : चीनचा धूर्तपणा (China) पुन्हा एकदा समोर आला आहे. चीनने पूर्व लडाखमध्ये पॅंगॉन्ग त्सो (Pangong Tso Lake) सरोवरावर दुसरा पूल बांधण्यास (Bridge) सुरुवात केली आहे. हा ब्रीज शस्त्रसज्ज अवजड वाहनांची वाहतूक करण्यास सक्षम असेल. भारताने दावा केलेल्या प्रदेशात एक पूल बांधून पूर्ण केल्याच्या काही महिन्यांतच चीनने हा दुसरा पूल बांधला आहे.
पहिल्या पुलाला समांतर दुसरा पूल बांधण्यात येत आहे. अरुंद असलेला पहिला पूल यावर्षी एप्रिल महिन्यात पूर्ण झाला. नवीनतम हाय-रिझोल्यूशन उपग्रह प्रतिमेचे विश्लेषण करणार्या तज्ञांच्या मते, दुसरा पूल तयार करण्यासाठी आवश्यक असलेली क्रेनसारखी उपकरणे हलवण्यासाठी पहिला पूल वापरला जात आहे.
Continued monitoring of the bridge construction at #PangongTso shows the further development on site, new activity shows a larger bridge being developed parallel to the first. likely in order to support larger/heavier movement over the lake https://t.co/QoI8LimgWu pic.twitter.com/5p4DY4aqmE
— Damien Symon (@detresfa_) May 18, 2022
पँगॉन्ग लेकच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यांना जोडणारा पहिला पूल बांधल्याचा अहवाल जानेवारीमध्ये समोर आला, तेव्हा परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, हा पूल 60 वर्षांपासून बेकायदेशीर चीनचा कब्जा असलेल्या भागात आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, भारताने असे अवैध प्रकार कधीच मान्य केलेले नाहीत. दुसर्या पुलाखाली बोटींच्या हालचालीसाठी परवानगी देण्यासाठी जागा किंवा पोकळी असू शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
दुसऱ्या पुलाची रुंदी 10 मीटर आणि लांबी 450 मीटर असेल. पुलाच्या दोन्ही टोकांना जोडून रस्त्याच्या जोडणीचे काम समांतरपणे सुरू झाले आहे. नवीन पूल दोन्ही किनाऱ्यांवरुन एकाच वेळी बांधला जात आहे. तो रणगाडे आणि शस्त्रसज्ज वाहनांसह मोठ्या आणि अवजड वाहनांना सामावून घेण्यास सक्षम असेल, असे मानले जाते.
134-किमी-लांब असलेल्या पॅंगॉन्ग त्सो तलावाच्या सर्वात अरुंद विभागात दोन्ही पूल आहेत. पहिला पूल तलावाच्या उत्तर किनार्यावरील पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) च्या महत्त्वाच्या स्थानाच्या दक्षिणेस होता, जिथे तलावाचे दोन किनारे 500 मीटर अंतरावर आहेत