चीन पुन्हा तोंडावर आपटला, गलवान घाटीत 38 चीनी सैनिक वाहून गेल्याचा ऑस्ट्रेलियन रिपोर्ट
पण खरा आकडा चीननं लपवल्याचं आता सिद्ध होतंय. आधी अमेरीकन रिपोर्ट आणि आता ऑस्ट्रेलियन रिपोर्टनुसार 38 चीनी सैनिक मारले गेलेत. त्यामुळे चीन माहिती लपवून पुन्हा एकदा तोंडावर पडलाय.
जवळपास दीड वर्षापूर्वी म्हणजेच जून 2022 मध्ये पूर्व लडाखच्या गलवान घाटीत (Galvan Valley) भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. त्यात कर्नल संतोष बाबू यांच्यासह भारताचे 20 सैनिक शहीद झाले होते. पण याच घटनेत चीनचे (China in Galvan) नेमके किती सैनिक मारले गेले याचा खरा आकडा अजूनही समोर आला नाही. चीनकडून अधिकृतपणे चार सैनिक ठार झाल्याचं जाहीर केलं गेलं. पण प्रत्यक्षात हा आकडा मोठा असल्याचे काही अमेरीकन रिपोर्ट आले होते. त्यानंतर आता ऑस्ट्रेलिय रिपोर्ट समोर आलाय आणि ह्या रिपोर्टमध्ये चीनचे एक नाही दोन नाही तर जवळपास 38 सैनिक गलवान नदीत वाहून गेल्याचं सांगितलं गेलंय. ऑस्ट्रेलियाचा न्यूजपेपर द क्लॅक्सन (The Klaxon) ह्या इंग्रजी वर्तमानपत्रात हा रिपोर्ट छापला गेलाय. गलवान डिकोडेड नावानं हा रिपोर्ट प्रकाशित केला गेलाय आणि याला सोशल मीडिया रिसर्च टीमनं तयार केलंय. ऑस्ट्रेलियाच्या ह्या रिपोर्टमुळे पुन्हा एकदा चीनचा खोटारडेपणा जगासमोर उघडा पडलाय.
रिपोर्टमध्ये नेमकं काय? चीन कायम खरी माहिती लपवत आलेला आहे. आताही गलवान घाटीतल्या हिंसक घटनेनंतर आमचे फक्त 4 सैनिक मृत्यूमुखी पडल्याचं सांगितलं होतं. भारताच्या तुलनेत चीनची कशी काहीच हाणी झाली नाही असं चित्रं उभं करण्याचा प्रयत्न चीननं केला होता. अजूनही करतो. त्यासाठी चीननं सरकारी यंत्रणा कामाला लावली. ब्लॉग, पेजेस सोशल मीडियावरुन हटवले. पण ऑस्ट्रेलियाच्या क्लॅक्सन ह्या वर्तमानपत्राच्या सोशल मीडिया टीमनं चीनचा Weibo हा मुख्य डिजिटल प्लॅटफॉर्म धुंडाळला आणि त्यातून जी माहिती समोर येतेय, त्यानुसार त्या रात्री गलवान घाटीतल्या नदीत 38 चीनी सैनिक वाहून गेल्याची माहिती प्रकाशीत केलीय.
One of the best researched reports on the Galwan clash. has facts behind the incident & truth on Chinese casualties, far in excess of what was declared. China fearing loss of face hid the truth. Hence, still fears Indian army. Comments @globaltimesnews https://t.co/FRUxnNsyjR
— Maj Gen Harsha Kakar (@kakar_harsha) February 2, 2022
जून 2020 मध्ये नेमकं काय घडलं होतं? जवळपास 4 दशकानंतर चीन आणि भारतीय सैनिक यांच्यात गलवान घाटीत हिंसक घटना घडली. गलवान घाटीत चीनी बाजूनं चीनी सैनिक काही काळापासून भौगोलिक स्थिती बदलण्याचा प्रयत्न करतायत. रस्ते, पूल उभारतायत. त्याला उत्तर म्हणून भारतानेही काही अस्थायी पूल बांधायला घेतले. त्याच कारणावरुन दोन्ही देशांच्या सैन्य तुकड्या एकमेकांसमोर आल्या. त्यावरुन गलवान घाटीत दोन्हींमध्ये हिंसक झडप झाली. त्यात 15 जूनच्या रात्री 20 भारतीय सैनिक शहीद झाले. चीननं मात्र सुरुवातीला त्यांची कुठलीच जीवितहाणी झाली नसल्याचा दावा केला. नंतर दबाव वाढला तसा 4 जण मारले गेल्याचं कबूल केलं. नंतर त्यांना चीन सरकारनं मरणोत्तर सन्मानीतही केलं. पण खरा आकडा चीननं लपवल्याचं आता सिद्ध होतंय. आधी अमेरीकन रिपोर्ट आणि आता ऑस्ट्रेलियन रिपोर्टनुसार 38 चीनी सैनिक मारले गेलेत. त्यामुळे चीन माहिती लपवून पुन्हा एकदा तोंडावर पडलाय.
हे सुद्धा वाचा:
‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’
सीमेवर धुसफूस मात्र चीनशी व्यापारी सख्य कायम; निर्यातीत 34 टक्क्यांची वाढ, आयात 28 टक्क्यांनी वाढली