चीनची 44 वर्षांनंतर DF-41 अण्वस्रवाहू क्षेपणास्राची चाचणी, अबब तब्बल 12 हजार किमीचा पल्ला
हे क्षेपणास्र कमाल 31,425 किमी ताशी वेगाने उड्डाण घेते. म्हणजेच हायपरसॉनिक बॅलेस्टीक क्षेपणास्र आहे. हे ध्वनीच्या वेगापेक्षा याचा वेग 25 पट जास्त आहे. या मिसाईलला हवेतून, रोड मोबाईल ट्रान्सपोर्टर इरेक्टर लॉन्चर किंवा रेल मोबाईलद्वारे लॉंच केले जाऊ शकते.
चीनने 44 वर्षांनंतर आपल्या आंतरखंडीय ICBM क्षेपणास्राची चाचणी केली आहे. या क्षेपणास्राचे नाव DF-41 क्षेपणास्र असे असून या क्षेपणास्राने 12 हजार किलोमीटरचे अंतर पार करीत प्रशांत महासागर ओलांडत ऑस्ट्रेलियाजवळील टार्गेट गाठले. हे क्षेपणास्र एकाच वेळी तीन ते आठ टार्गेट हिट होऊ शकते. म्हणजे हे अंतर अमेरिकेइतके आहे. चीन साल मे 1980 नंतर प्रथमच आपल्या इंटर कॉन्टीनेंटल बॅलेस्टीक मिसाईलची ( ICBM ) चाचणी केली आहे.
चीनने या अण्वस्रवाहू क्षेपणास्राची चाचणी करण्यापूर्वी मार्गात येणाऱ्या देशांना कल्पना दिली होती. परंतू त्याच्या मार्गाबद्दल कोणालाही सांगितले नव्हते किंवा टार्गेटबद्दल देखील सांगितले नव्हते. असे म्हटले जाते की या क्षेपणास्राने प्रशांत महासागरातील आपले टार्गेट गाठण्यात यश मिळविले आहे. ही एक प्रकारची एटमॉस्फीरिक टेस्ट होती. म्हणजे हे क्षेपणास्र पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर जाऊन पुन्हा वातावरणात येण्यात यश आले आहे.
याआधी साल 1980 मध्ये चीनमध्ये DF-5 हा क्षेपणास्राचे अशाच प्रकारे चाचणी केली होती. त्या क्षेपणास्राने 9000 किलोमीटरचे अंतर गाठले होते. या वेळी DF – 41 ने 12 हजार किलोमीटरचे अंतर कापले आहे. या क्षेपणास्राची ऑपरेशनल रेंज 12 ते 15 हजार किलोमीटर इतकी प्रचंड आहे.
या क्षेपणास्त्राच्या मार्गात कोणते देश आले?
चीनने क्षेपणास्त्र डागल्यानंतर ते प्रथम सरळ उडाले नंतर ते वातावरणात गेले. यानंतर या क्षेपणास्राच्या टप्प्यात अनेक देश आले आहेत. त्यानंतर या देशांना पार केल्यानंतर हे क्षेपणास्त्र ऑस्ट्रेलियाजवळील समुद्रात पडले. हे क्षेपणास्त्र ज्या देशांवरून गेले त्यात सॉलोमन बेटे, नौरू, गिल्बर्ट बेटे, तुवालू, वेस्टर्न सामोआ, फिजी आणि न्यू हेब्रीड्स यांचा समावेश आहे.
या क्षेपणास्राची ताकत…
साल 2017 मध्ये हे क्षेपणास्र सैन्यात दाखल झाले. डोन्गफेंग-41 चौथ्याची पिढीचे क्षेपणास्र असून हे सॉलिड फ्यूईल्ड रोड-मोबाईल इंटरकॉन्टीनेंटल बॅलिस्टिक मिसाईल आहे. ही चीनची स्ट्रॅटेजिक अण्वस्र क्षेपणास्र आहे. 80 हजार किलोग्रॅम वजनाचे क्षेपणास्र आहे. त्याची लांबी 72 फूट आणि व्यास 7.5 फूट आहे. यात 250 किलो टनाचे आठ वा 150 किलो टनाचे 10 वॉरहेड लावले जाऊ शकतात. म्हणजे MIRV तंत्राने परिपूर्ण आहे. म्हणजे एका मिसाईलने अनेक टार्गेटना लक्ष्य केले जाऊ शकते. या क्षेपणास्राची रेंज 12 ते 15 हजार किमी आहे.