Coronavirus in China : चीनमध्ये कोरोनाचा धुमाकूळ, शांघायमध्ये लॉकडाऊननंतर कोरोनाचा पहिला मृत्यू
बीजिंग : चीनमध्ये (china) कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे. येथे मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रूग्ण सापडल्यानंतर अनेक ठिकाणी लॉडाऊन करण्यात आला होता. यादरम्यान जगाची चिंता वाढवणारी बातमी आली असून चीनच्या शांघाई शहरात कोरोनाचा (Corona) पहिला बळी गेला आहे. 28 मार्च ला चीनमधील सगळ्यात मोठ्या शहरात ओमायक्रॉन व्हेरिअंटचे संक्रमण वाढले ते आटोक्यात आणण्यासाठी तेथे दोन वेळा लॉकडाऊन […]
बीजिंग : चीनमध्ये (china) कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे. येथे मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रूग्ण सापडल्यानंतर अनेक ठिकाणी लॉडाऊन करण्यात आला होता. यादरम्यान जगाची चिंता वाढवणारी बातमी आली असून चीनच्या शांघाई शहरात कोरोनाचा (Corona) पहिला बळी गेला आहे. 28 मार्च ला चीनमधील सगळ्यात मोठ्या शहरात ओमायक्रॉन व्हेरिअंटचे संक्रमण वाढले ते आटोक्यात आणण्यासाठी तेथे दोन वेळा लॉकडाऊन करण्यात आले होतं. चीनची आर्थिक राजधानी आणि सगळ्यात मोठे शहर असणाऱ्या शांघाई (Shanghai) शहरात सध्या कोरोना वाढत आहे.
17 एप्रिल रोजी शांघायमध्ये कोरोनाचे 19,831 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यापूर्वी शनिवारी 21,582 बाधीतांची नोंद झाली होती. मात्र, या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसलेली नाहीत. त्याच वेळी, कोरोनाची लक्षणे असलेले 2,417 नवीन रुग्ण आढळले आहेत. मात्र, शनिवारी बाधीतांच्या 3238 प्रकरणांची भर पडली.
या देशातही पसरला कोरोना
दरम्यान फ्रान्स, इटली आणि जर्मनीमध्ये दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. युरोप आणि अमेरिकेतील काही राज्यात ओमायक्रॉन व्हेरिअंटचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. तर दुसरीकडे द.कोरियामध्ये कोरोना कमी होत असल्याने मास्कच्या वापरण्याच्या नियमाला सोडून इतर सर्व नियम शिथील करण्यात आले आहेत.
चीनला जीरो कोविड नितीचा फटका
तज्ज्ञांच्या मते चीनच्या शून्य-कोविड नीतीने जीडीपीचे प्रश्न सुटू शकत नाहीत. कोरोनाच्या नियमांमुळे सगळ्याच बाबतीत परस्थिती बिघडत आहे. त्यामुळे शांघाई लॉकडाऊनमध्ये ढकलला जात आहे. जगाच्या सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्थेने 2022 साठी सर्वात कमी आपला बजेट केला आहे. तज्ज्ञांच्या मत असेही आहे की, देशातील मुख्य शहरांच्या उत्पादन क्षमतेवर कोरोनामुळे प्रभाव पडला असून 5.5 टक्क्यांपेक्षा वाढ होणे कठीन आहे. झेंग्झो विमानतळाकडून कोरोनाच्या पार्शभूमिवर 14 दिवस सेवा बंद करण्यात आली आहे. तर हे आर्थिक क्षेत्र चीनसाठी महत्वपुर्ण उत्पादक क्षेत्र आहे. येथेच अॅपल कंपनीचे फॉक्सकॉन ही फॅक्ट्री आहे. तर देशातील अनेक शहरांनी आपल्या नागरिकांना गरज असेलतरच बाहेर पडा असा सल्ला दिला आहे.
वर्क फ्रॉम होम
चीनचे उत्तर पश्चिम शहर जीयानमध्ये वाढत्या कोरोनाचा कहर पाहता स्थानिक प्रशासनाने सांगितले की, गरज असेल तरच लोकांनी बाहेर पडावं. त्यावर लोकांनी अन्नधान्याचं विचारलं असता प्रशासनाने सांगितलं की, हे काही लॉकडाऊन नाही किंवा तशी स्थितीही नाही. मात्र प्रशासनाने येथील कंपन्यांना त्यांच्या कामगारांना वर्क फ्रॉम होम देण्यास सांगितले आहे. तसे करता येत नसेल तर कामाच्या ठिकाणीच त्यांची साय करा असे सांगण्यात आले आहे.