China Army : हिंदी भाषा येणाऱ्यांची का करतायेत चिनी सैन्यात भरती, काय आहे ड्रॅगनचा नवा प्लॅन ?

तिबेट मिलटरी डिस्ट्रिकच्या वतीने एलएसी (प्रत्यक्ष ताबा रेषा)च्या सखल भागात सुरक्षेचे काम करण्यात येते. ही सीमा रेषा भारतातील ईशान्येकडील राज्ये आणि उत्तराखंडच्या जवळ आहे. यासह लडाखवर देखरेख करणारी शिनजियांग मिलिटरी डिस्ट्रिक्टही याच वेस्टर्न कमांडच्या अंतर्गत काम करते.

China Army : हिंदी भाषा येणाऱ्यांची का करतायेत चिनी सैन्यात भरती, काय आहे ड्रॅगनचा नवा प्लॅन ?
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 7:20 PM

नवी दिल्ली – चीनी ड्रॅगन (China Dragon) शांत बसताना दिसत नाहीये, आता त्यांनी भारताविरोधात लढण्याची नवी रमनीती आखली आहे. गेल्या काही दिवसांत चीनचे सैन्य (China Army) असलेल्या पिपल्स लिबरेशन आर्मीत, हिंदी भाषा माहित असलेल्या तरुणांची भरती करण्यात येते आहे. हे तरुण पदवीधर असतील आणि त्यांना हिंदी भाषेचे योग्य ज्ञान असेल याची खात्री चीनकडून करण्यात येते आहे. चीन आणि भारताच्या (India China Border) सीमेवर गेल्या काही काळापासून तणावाची स्थिती आहे. या भागातील माहिती गुप्तपणे काढण्यासाठी आणि त्या सूचनांची देवाणघेवाण करण्यासाठी तसेच त्या भागातील परिस्थितीची माहिती मिळावी, यासाठी हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. याचसाठी हिंदी भाषेचे ज्ञान असणाऱयांना सैन्यात भरती करुन घेण्याचे चीनि सैन्याचे मनसुबे आहेत. चिनी सैन्याच्या वेस्टर्न थिएटर कमांडकडे भारताच्या सीमा परिसरात सुरक्षेची जबाबदारी आहे.

याच वेस्टर्न कमांडमध्ये असलेल्या तिबेट मिलटरी डिस्ट्रिकच्या वतीने गेल्या वर्षी जूनमध्ये अशी भरतीप्रक्रिया सुरु केल्याची माहिती आहे. तिबेट मिलटरी डिस्ट्रिकच्या वतीने एलएसी (प्रत्यक्ष ताबा रेषा)च्या सखल भागात सुरक्षेचे काम करण्यात येते. ही सीमा रेषा भारतातील ईशान्येकडील राज्ये आणि उत्तराखंडच्या जवळ आहे. यासह लडाखवर देखरेख करणारी शिनजियांग मिलिटरी डिस्ट्रिक्टही याच वेस्टर्न कमांडच्या अंतर्गत काम करते.

चीनच्या विद्यापीठांत सुरु आहे शोध

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, तिबेटच्या मिलिटरी डिस्ट्रिक्ट विभागातील अधिकाऱ्यांनी चीनच्या अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठांत विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. या दौऱ्यात महाविद्यालयांत हिंदी अनुवादक म्हणून चिनी सीमेवर त्या विद्यार्थ्यांचे भविष्य किती चांगले आहे, हे या विद्यार्थ्यांना सांगण्यात येते आहे. तिथून विद्यार्थी आले तर त्यांची भरतीही करण्यात येणार आहे. इतकेच नाही तर तिबेट भागात हिंदी माहिती असणाऱ्या अनेकांनाही सैन्यात भरती करुन घेण्यात आले आहे. मोठ्या संख्येने भरती झालेले, हिंदी माहिती असलेले हे सैनिक भारताच्या उत्तरी सीमेलगत तैनात करण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

भारतीय सैन्याचेही प्रत्युत्तर

या रणनीतीला उत्तर देण्याची भारतीय सैन्यानेही तयारी सुरु केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय सैन्याने सैनिकांसाठी तिब्बतोलॉजी हा कोर्स सुरु केला आहे. यामुळे तिबेटची भाषा सैनिकांना समजू शकणार आहे. तसेच चीनची मंदरीन भाषा शिकण्यासाठीचा कोर्सही भारतीय सैन्याने सुरु केला आहे. भाषा समजून घेतल्याने शत्रूंच्या परिसरात नेमके काय सुरु आहे, याची माहिती मिळवणे अधिक सोपे होणार आहे. नुकतेच तिब्बतोलॉजीचा कोर्स यशस्वीपणे पूर्ण करण्यात पहिल्या बॅचला यश मिळाले आहे. याबाबतचे ट्विटही सैन्याच्या वतीने करण्यात आले आहे.

2020 च्या भारत-चीन सैनिकांच्या धुमश्चक्रीनंतर तिबेटींची संख्या वाढतेय. 2020 साली पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन सैन्य यांच्यात चकमक झाली होती. यात दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर तिबेटींची संख्या चिनी सैन्यात वाढताना दिसते आहे. तिबेटमधील रहिवाशांना लडाखची चांगली माहिती आहे. इतकेच नाही तर सिक्कीमच्या सीमेवरही तिबेटी तरुणांची भरती चिनी सैन्याकडून करण्यात येते आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.