कंपनीने कर्मचाऱ्यांसमोर पोतंभर पैसे टाकले, म्हणाले 15 मिनिटांत जितके मोजाल, तेवढे तुमचे; अनोख्या पद्धतीने बोनस देणारी कंपनी चर्चेत
Viral video: चीनमधील Henan Mining Crane या कंपनीने बोनस देण्याची एक अनोखी पद्धत शोधून काढली. 15 मिनिटांत जेवढे पैसे मोजाल, तेवढी रक्कम कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून मिळेल, अशी ऑफर कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यासाठी त्यांच्यासमोर 70 कोटी रुपये ठेवण्यात आले होते. सोशल मीडियावर हा इव्हेंट चांगलाच व्हायरल झाला, त्यावर लोकांच्या विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

तुमच्यासमोर पैशांचा ढीग ठेवला, त्यातले जितके पैसे तुम्ही मोजाल तेवढी रक्कम बोनस म्हणून घेऊन जाऊ शकता… अशी ऑफर तुमच्यासमोर कोणी ठेवली तर ? तुमची रिॲक्शन काय असेल ? असंच एक आगळं-वेगळं प्रकरण चीनमधून समोर आलं आहे, जिथे Henan Mining Crane Co. ( या कंपनीने) ने कर्मचाऱ्यांना अशीच अनोखी ऑफर दिली. त्या ऑफरअंतर्गत, कंपनीच्या कर्मचाऱ्यांना 15 मिनिटांची वेळ देण्यात आली होती, तेवढ्या वेळात समोर ठेवलेल्या पैशांपैकी ते जेवढी रक्कम मोजू शकतील तेवढे पैसे ते बोनस म्हणून घेऊन जाऊ शकतात, असे त्यांना सांगण्यात आलं. विशेष म्हणजे कंपनीने यासाठी 70 कोटी रुपयांची रोख रक्कम समोर ठेवली होती. या अनोख्या बोनस इव्हेंटमध्ये एक कर्मचाऱ्याने 100,000 युआन ( साधारण 12 लाख रुपये) मोजून सर्वात जास्त बोनस ( रक्कम) जिंकली.
कसा झाला हा अनोखा बोनस इव्हेंट ?
वार्षिक डिनरदरम्यान कंपनीने कर्मचाऱ्यांना ही संधि दिली. समोरच्या टेबलवर पैसे ठेवले आणि 15 मिनिटांत त्यापैकी जितकी रक्कम मोजाल तितके पैसे घेऊन जा, असं सांगण्यात आलं. एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, एक कर्मचाऱ्याने 100,000 युआन एवढी रक्कम मोजली, तेव्हाच इतर कर्मचाराही वेगाने पैसे मोजण्यात गुंतले होते. या अनोख्या इव्हेंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर या घटनेवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काहींना हे मजेदार आणि अनोखी कल्पना वाटली पण काहीजण त्यावर टीका करत आहेत.एका यूजरने गंमतीत लिहिले की, माझी कंपनीही असेच करते, पण पैशाऐवजी खूप काम देते. पण काही लोकांना हा इव्हेंट म्हणजे फक्त “शोबाजी” वाटली. तोच बोनस सरळ बँक अकाऊंटमध्ये ट्रान्स्फर केला असता तर बरं झालं असतं, असं काही यूजर्सचं म्हणणं आहे
कर्मचाऱ्यांना सरप्राईज की शो ऑफ?
कर्मचाऱ्यांचा सहभाग आणि उत्साह वाढवण्याचा एक मनोरंजक मार्ग अशा शब्दांत काहीजण कंपनीच्या या इव्हेंटचे वर्णन करत आहेत. अशा योजना मनोबल आणि ब्रँड मूल्य वाढवू शकतात, असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण काहींना ही फक्त प्रचाराची रणनिती वाटते आहे. पण यामुळे अनेकांचे लक्ष वेधेले गेले आहे, हे निश्चित. गेल्या काही वर्षांत अशा नवनवीन आणि अनोख्या पद्धतीने कर्मचाऱ्यांना आश्चर्यचकित करण्याचा ट्रेंड वाढत आहे.