बिजींग : चीनमधून एक मोठी बातमी समोर आलीय. यलो सागरात चीनच्या एका अणवस्त्र पाणबुडीचा मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत 55 नौसैनिकांचा मृत्यू झाल्याच वृत्त आहे. ब्रिटिश जहाजाला आपल्या जाळ्यात अडकवताना चीनच्या या पाणबुडीचा अपघात झाला. यूकेच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये हा खुलासा केलाय. रिपोर्टनुसार, ऑक्सिजन सिस्टममधल्या खराबीमुळे पाणबुडीबरोबर दुर्घटना घडली . 093-417 पाणबुडीचा कॅप्टन आणि 21 अधिकाऱ्यांचा या अपघातात मृत्यू झाला. चीनने अधिकृतपणे हे वृत्त फेटाळून लावलय. चीनने आंतरराष्ट्रीय मदत घेण्यासही नकार दिला. 21 ऑगस्टला हा अपघात झाल्याच रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
स्थानिक वेळेनुसार, 8 वाजून 12 मिनिटांनी हा अपघात झाला. यात 55 नौसैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. यात 22 अधिकारी, 7 ऑफिसर कॅडेट, 9 ज्यूनियर ऑफिसर आणि 17 खलाशी होते. मृतांमध्ये कॅप्टन कर्नल जू योंग-पेंग आहे. चीन या घटनेवर मौन बाळगून आहे. अजूनपर्यंत अधिकृतपणे चीनने मान्य केलेलं नाहीय. इटेलिजेंसच्या आधारावर यूकेने हा रिपोर्ट दिलाय.
नेमका अपघात कसा झालं?
अमेरिका आणि अन्य देशांच्या जहाजांना अडकवण्यासाठी चिनी नौदलाने समुद्रात साखळी आणि नांगर ठेवला होता. त्यालाच चिनी पाणबुडी धडकली. त्यानंतर ऑक्सिजन सिस्टिममध्ये बिघाड झाला. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पाणबुडीतील 55 नौसैनिकांचा मृत्यू झाला. पाणबुडीतील बिघाड दुरुस्त करुन पुष्ठभागावर आणण्यासाठी 6 तास लागले. चीनने हे वृत्त फेटाळून लावलय. यूकेचा रिपोर्ट गोपनीय असून इंटलिजन्स सूत्रांवर आधारीत आहेत.