फ्लश करण्याआधी टॉयलेटचे कव्हर बंद करा, अन्यथा कोरोना विषाणू पसरु शकतो, चीनच्या शास्त्रज्ञांचा दावा

कोरोना विषाणू हा मानवी शरिराच्या पचनसंस्थेत (Human Digestive Tract) जीवंत राहू शकतो, असा दावा चीनच्या शास्त्रज्ञांनी केला (Corona Virus spread due to toilet flushing) आहे.

फ्लश करण्याआधी टॉयलेटचे कव्हर बंद करा, अन्यथा कोरोना विषाणू पसरु शकतो, चीनच्या शास्त्रज्ञांचा दावा
Follow us
| Updated on: Jun 18, 2020 | 3:15 PM

मुंबई : कोरोना विषाणू हा मानवी शरिराच्या पचनसंस्थेत (Human Digestive Tract) जीवंत राहू (Corona Virus spread due to toilet flushing) शकतो. हा विषाणू मानवी विष्ठे वाटे बाहेर पडू शकतो. अशावेळी जेव्हाही तुम्ही टॉयलेटचा वापर कराल त्यावेळी फ्लश करण्यापूर्वी सीट कव्हर बंद करा. असे केल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो, असा दावा चीनच्या येंगझाऊ विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केला आहे (Corona Virus spread due to toilet flushing).

फिजिक्स ऑफ फ्लुईड्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासात समोर आले आहे की, एका फ्लशिंग टॉयलेटमध्ये पाणी आणि हवा या दोघांचे प्रवाह रोखण्यासाठी कम्प्यूटर मॉडलचा उपयोग केला जातो. त्यामुळे हवेत पाण्याचे छोटे थेंब बनतात. या थेंबाद्वारे कोरोना विषाणू पसरु शकतो.

जेवढ्या वेळेस टॉयलेटचा वापर केला जातो. तेवढी भीती वाढते. टॉयलेटला फ्लश केल्यानंतर पाणी आणि हवा मिळून पाण्याचे बारीक थेंब तयार होतात. त्यामुळे बॅक्टेरिया आणि विषाणू पसरण्याची शक्यता अधिक असते. ज्या घरात अधिक कुटुंब सदस्या आहेत. त्या घरात विषाणू पसरण्याची भीती अधिक आहे. अशामध्ये सर्वांनी एकच काळजी घेणे गरजेचे आहे की, टॉयलेटचा वापर केल्यावर फ्लश करताना कव्हर बंद करा, असं शास्त्रज्ञ जी शियांग वँग यांनी सांगितले.

नुकतेच केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानेही सार्वजनिक शौचालयातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असं सांगितले होते. त्यामुळे प्रत्येक झोपडपट्टी आणि चाळीत राहणाऱ्या रहिवाशांनी सावधानी बाळगत सार्वजनिक शौचालय स्वच्छ ठेवण्याची मोहिम सुरु केली आहे.

संबंधित बातम्या :

लहान घरं असणाऱ्यांची शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था, सार्वजनिक शौचालयं तासाला धुणार : राजेश टोपे

Health Ministry on Corona | सार्वजनिक शौचालयातून कोरोना वाढू शकतो : केंद्रीय आरोग्य मंत्रालय

धारावीत सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता मोहीम

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.