Nepal Plane Crash: नेपाळ विमान दुर्घटनेत पाच भारतीयांचा समावेश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले दुःख

पोखरा विमानतळ एटीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धावपट्टीपासून अवघ्या काही मीटर अंतरावर हा अपघात झाला. या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून दुःख व्यक्त केले

Nepal Plane Crash: नेपाळ विमान दुर्घटनेत पाच भारतीयांचा समावेश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले दुःख
पोखरा विमान दुर्घटनाImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 15, 2023 | 3:47 PM

मुंबई, नेपाळमध्ये आज सकाळी एक मोठा विमान अपघात झाला (Pokhra Plane Crash). यति एअरलाइन्सच्या ATR-72 विमानात 5 भारतीय आणि 4 क्रू सदस्यांसह 68 प्रवासी होते. नेपाळच्या स्थानिक मीडियानुसार आतापर्यंत 42 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र, विमान कंपन्या आणि सरकारकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. अपघाताची छायाचित्रे आणि फुटेज समोर आले आहेत. यावरून हा अपघात त्याच्यात खूपच भयावह असल्याचे दिसते. बचाव आणि मदतकार्यात गुंतलेल्या लोकांच्या मते, कोणीही वाचण्याची शक्याता नाही.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रध्दांजली

नागरी उड्डाण प्राधिकरणाचे म्हणणे आहे की, लँडिंगच्या 10 सेकंद आधी विमानात ज्वाळा दिसत होत्या. त्यामुळे खराब हवामानामुळे हा अपघात झाला असे म्हणता येणार नाही. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे आधी सांगितले जात होते. या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून दुःख व्यक्त केले व मृतांना श्रध्दांजली वाहिली.

अपघाताशी संबंधित मोठे अपडेट्स…

  • नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली. पुष्प कमल दहलही घटनास्थळी भेट देणार आहेत.
  • लष्कर बचाव आणि मदत कार्यात गुंतले आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले की, गर्दीमुळे रुग्णवाहिकेला बचाव स्थळी पोहोचण्यात अडचण येत होती. भारताचे नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नेपाळमधील अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.

अपघात कुठे झाला?

कास्की जिल्ह्यातील पोखरा येथे जुना विमानतळ ते पोखरा विमानतळादरम्यान हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने काठमांडूहून सकाळी 10.30 वाजता पोखरा गाठण्यासाठी उड्डाण केले. पोखरा विमानतळ काठमांडूपासून 200 किमी अंतरावर आहे. येथे पोहोचण्यासाठी 25 मिनिटे लागतात.

कधी झाला अपघात ?

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला. येथे तो टेकडीवर आदळला आणि यती नदीजवळील खड्ड्यात गेला. स्थानिक लोकांनी मदत आणि बचावासाठी धाव घेतली. मात्र, दुपारी बाराच्या सुमारास ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आली.

यामध्ये 5 भारतीयांसह 9 परदेशी नागरिक होते

कॅप्टन कमल केसी हे विमान उडवत होते. 68 प्रवाशांपैकी 53 नेपाळी, 5 भारतीय, 4 रशियन, एक आयरिश, दोन कोरियन, एक अफगाणी आणि एक फ्रेंच होता. यामध्ये 3 नवजात आणि 3 बालकांचा समावेश आहे. एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी सांगितले की, आतापर्यंत एकाही जिवंत व्यक्तीला बाहेर काढण्यात आलेले नाही.

पायलटने दोनदा मागितली लँडिंगची परवानगी

पोखरा विमानतळ एटीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धावपट्टीपासून अवघ्या काही मीटर अंतरावर हा अपघात झाला. पोखराची धावपट्टी पूर्व-पश्चिम दिशेला बांधलेली आहे. वैमानिकाने यापूर्वी पूर्वेकडून उतरण्याची परवानगी मागितली होती आणि परवानगीही मिळाली होती. पण काही वेळातच वैमानिकाने पश्चिमेकडून उतरण्याची परवानगी मागितली आणि पुन्हा परवानगी मिळाली. पण लँडिंगच्या 10 सेकंद आधी विमान कोसळले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.