तिचं वय फक्त 39, झाली 19 मुलांची आई, अनोळखी पुरुषांपासून ती…
आई होणं हे प्रत्येक महिलेच स्वप्न असते. मुलांना जन्म घातल्यानंतरच महिलेचा जन्म सार्थकी लागतो असे म्हटले जाते. आई न होता आले तर महिलांना जगणे नकोसे वाटते. तर पुरुषांनाही बाप झाल्यानंतर आपला वंश पुढे वाढणार असे वाटते. परंतू एका महिलेने 19 मुलांना आतापर्यंत जन्म घातला आहे. या मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी ती एकटीच निभावत आहे. आता ती 20 व्या मुलाच्या जन्म घालण्याची तयारी करीत आहे. या मुलांचे वडील कोण आहेत...याची तिला काळजी नाही.
बोगोटा | 4 फेब्रुवारी 2024 : मातृत्व ही दैवाची देणगी मानली जाते. मुलांना देवा घरची फुले मानली जातात. मुलं होणं नशीबवानही मानले जाते. अनेक महिला आई होण्यासाठी उपासतपास करीत असतात. परंतू एका अनोख्या महिलेची गोष्ट समोर आली आहे. 39 वयाच्या या महिलेने 19 मुलांना जन्म दिला आहे. आणि लवकरच ती 20 व्या मुलाची माता होणार आहे. सिंगल मदर असलेल्या या महिलेच्या मुलांचे वडील वेगवेगळे आहेत. त्यामुळे एकटीच ती या मुलांचे पालनपोषण करीत आह. परंतू तिने असे वडीलांचे नाव लावू न शकणाऱ्या अनौरस मुलांचे आई होणं का स्वीकारलं आहे. कारण ऐकाल तर तुम्हाला धक्का बसेल…
ही अनोखी महिला कोलंबियाची आहे. 39 वर्षीय मार्था नावाच्या या महिलेला आतापर्यंत 19 मुलं झाली आहेत. ती एकटीच या मुलाचं पालन पोषण करीत आहे. या मुलाचे वडील वेगवेगळे आहेत. तरीही ती आणखी मुल जन्माला घालण्याची तयारी करीत आहे. तिच्या 19 मुलांपैकी 17 मुले अजून 18 वर्षांची झालेली नाहीत. आणि जोपर्यंत शरीर साथ देत आहे तोपर्यंत ती मुलांना जन्म घालण्यास तयार आहे. तुम्ही म्हणाल काय म्हणावं या महिलेला..वेड तर लागलेलं नाही ना. परंतू त्यामागे कारणही तसेच आहे.
बिझनेसचा नवा मार्ग
मुलं जन्माला घातल्यानंतर या कोलंबिया देशात मुलांचा जन्माचा आणि पालनपोषणाचा खर्च सरकार करते. त्यामुळे मार्था हीने आपला मुलांचा जन्म घालणे हा कमाईचा, बिझनेसचा नवा मार्ग मानला आहे. ती म्हणते व्यावहारिक दृष्ट्या आई होणे हा एक व्यवसायासारखेच आहे. त्यामुळे आपण मुलांना शेवटपर्यंत जन्माला घालत राहू असे तिने म्हटले आहे. मुले मोठी झाल्यानंतर ती घर सोडून जातील. या मुलांच्या वडीलांबद्दल विचारले असता तिने म्हटले की ते सर्व बेजबाबदार आहेत.
दर महिन्याला सरकारची मदत
मार्था म्हणते प्रत्येक मुलासाठी सरकारकडून मोठी आर्थिक मदत केली जाते. आणि त्यामुळे मला जास्त मुलं जन्माला घालण्यास प्रेरणा मिळतेय..सरकार प्रत्येक मुलाच्या पालनपोषणास मदत करते. तिला सर्वात मोठ्या मुलासाठी 6,300 रुपये मिळाले तर सर्वात लहान मुलासाठी 2,500 रुपये मिळाले आहेत. दर महिन्याला कोलंबिया सरकार मार्ता हिला सुमारे 42 हजार रुपये देते. एवढेच काय स्थानिक चर्च आणि शेजारी देखील मार्ताला मदत म्हणून पैसे देतात. तीन बेडरुमच्या एका घरात 19 मुलांना वाढविणे थोडे किचकट आहे. कधी कधी सर्व मुलांना जेवणही नीट मिळत नाही. तरीही जोपर्यंत मुले होणे बंद होत नाही तोपर्यंत आपण हे करत राहू कारण आपल्याला त्यातून फायदा होत असल्याचे तिचे म्हणणे आहे.