नवी दिल्लीः काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) सध्या नेपाळ दौऱ्यावर आहेत, या यात्रेच्या प्रारंभीच राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) झाला आणि त्यावरुन आता राजकारण सुरु झालं आहे. राहुल गांधी यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसकडूनही स्पष्टीकरण देत त्यांनी कोणाच्या लग्नाला जाणे हे बेकायदेशीर आहे का असा सवाल उपस्थित केला आहे. मात्र राहुल गांधी ज्या मैत्रिणीच्या विवाहासाठी गेले आहेत, ती मैत्रीण नेपाळच्या नव्या नकाशाचे कौतुक करण्यावरुन वादात सापडल्या होत्या. यावेळी त्यांनी त्या नकाशाबद्दल (Map Row in Nepal) म्हटले होते की, हे जे काही केले आहे ते याआधीच केले पाहिजे होते.
ये राहुल गांधी की निजी जिंदगी का मामला नहीं
राहुल गांधी किसके साथ है? क्या चाइना के एजेंटों के साथ हैं? क्या राहुल गांधी जो ट्वीट करते है सेना के खिलाफ वो चाइना के दबाव में करते है ?
सवाल तो पूछे जाएंगे ?
सवाल राहुल गांधी का नहीं, देश का हैं https://t.co/dNmzqFo36L
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) May 3, 2022
खासदार आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सोमवारी राजधानी काठमांडू्च्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले आहेत. ते यावेळी नेपाळमधील काही पर्यटन स्थळांना भेटी देण्याची शक्यता आहे.
द काठमांडू पोस्टच्या म्हणण्यानुसार राहुल गांधी यांची मैत्रीण सुम्रिमा उदासच्या विवाहसमारंभमध्ये उपस्थित राहण्यासाठी ते काठमांडूला आले आहेत. सुम्रिमा यांचे वडील आणि म्यानमारचे राजदूत भीम उदास यांनी सांगितले की, आम्ही आमच्या मुलीच्या विवाहासमारंभसाठी त्यांना आमंत्रण देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
Nepal issues a new map… should have been done decades ago. Thank you for the write-up @SugamCNN https://t.co/2ImKrmXUVU
— Sumnima Udas (@sumnima_udas) May 22, 2020
सुम्रिमा उदास नेपाळमधील बहुचर्चित अशी पत्रकार असून त्यांनी अमेरिकेतील ली विद्यापीठातून पत्रकारिता केली आहे. तर ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी सीएनएनमध्ये काम केले असून पत्रकारितेतील त्यांना अनेक पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.
सुम्रिमा यांच्या या लग्नाआधीच राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यामध्ये ते एका पबमध्ये दिसत आहेत. कपिल मिश्रा आणि अमित मालवीय यांच्यासमवेत अनेक भाजप नेत्यांनी त्यांच्या या नेपाळ दौऱ्यावर सवाल उपस्थित केले आहेत. त्यांच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर अनेक प्रश्न उपस्थित करुन हा राहुल गांधी यांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रश्न नाही. त्यापुढे त्यांनी जाऊन त्यांनी आणखी एक सवालही उपस्थित केला आहे. राहुल गांधी कोणासोबत आहेत, की चीनच्या एजंटबरोबर आहे तर त्यांनी म्हटले आहे की, प्रश्न राहुल गांधी यांचा नाही तर प्रश्न हा देशाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी ज्या मैत्रिणीच्या विवाहासाठी गेले आहेत, त्या वादग्रस्त पत्रकार आहेत. 2020 मध्ये जेव्हा नेपाळचा नवा नकाशा तयार करण्यात आला होता, त्यावेळी सुम्रिमा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्या वादात सापडल्या होत्या.
नेपाळकडून जो नकाशा तयार करण्यात आला आहे, त्यामध्ये भारतातील उत्तराखंडमधील काही भागांचा समावेश आहे. लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा या भागावर नेपाळकडून दावा केला गेला आहे. भारताच्यादृष्टीने हा भागाला महत्व दिले आहे.