अमेरिकेत एकाच दिवशी ‘कोरोना’चे दोन हजार बळी, वुहानमधील लॉकडाऊन 76 दिवसांनी हटवला
जगभरात 7 हजार 333 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. कोणत्या देशात नेमकी काय स्थिती आहे याचा धावता आढावा (Corona Patients Latest Update in World)
मुंबई : ‘कोरोना व्हायरस’ने जगभरात थैमान घातल्याने अमेरिकेसारख्या महासत्तेपासून भारतातील लहानशा खेड्यापर्यंत अनेकांना फटका बसला आहे. जगभरात कालच्या दिवसात (7 एप्रिल) कोरोनाचे 7 हजारांहून अधिक बळी गेले आहेत. अमेरिकेत एकाच दिवशी जवळपास 2 हजार कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. चीनमध्ये जिथून ‘कोरोना व्हायरस’चा उगम झाला, त्या वुहानमधील लॉकडाऊन 76 दिवसांनी हटवण्यात आले आहे. मुंबई-पुण्यापासून अमेरिका-इटलीपर्यंत कुठे काय स्थिती आहे, याचा हा आढावा (Corona Patients Latest Update in World)
जगात काय स्थिती?
-जगभर कालच्या दिवसात (7 एप्रिल) मृत्यूचे थैमान -एका दिवसात 7 हजार 333 ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण दगावले -जगभरातील एकूण मृतांचा आकडा 82 हजारांवर -जगभर एकूण 14 लाख 25 हजार नागरिक कोरोनाग्रस्त -जगभर 5 देशांत प्रत्येकी एक लाखाहून अधिक कोरोनाग्रस्त -अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनीत ‘कोरोना’चा हाहाकार -जगभर 4 देशांमध्ये 10 हजारांहून अधिक ‘कोरोना’बळी
अमेरिकेत कोरोनाचा कहर
-अमेरिकेत काल मृत्यूचे अक्षरशः तांडव -एका दिवसात 1 हजार 934 ‘कोरोना’ग्रस्तांचा मृत्यू -एका दिवसातल्या सर्वाधिक बळींची नोंद -अमेरिकेत काल 28 हजार 735 नवे ‘कोरोना’ रुग्ण -कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाखांच्या जवळ -अमेरिकेत एकूण 3 लाख 95 हजार 739 रुग्णांची नोंद
United States reports nearly 2,000 #Coronavirus deaths in last 24 hours: AFP news agency quoting Johns Hopkins
— ANI (@ANI) April 8, 2020
युरोपीय देशांमध्ये कोरोनाची स्थिती
-फ्रान्समध्ये मृतांचा आकडा 10 हजारांवर -काल एका दिवसात 1 हजार 417 ‘कोरोना’बळी -फ्रान्समध्ये काल 11 हजार 59 नवे रुग्ण -फ्रान्समध्ये एकूण 10 हजार 328 जण कोरोनामुळे मृत्युमुखी -फ्रान्समध्ये एकूण 1 लाख 9 हजार 69 कोरोनाग्रस्त
-इटली, स्पेन, ब्रिटनमध्ये मृतदेहांचा खच -काल ब्रिटनमध्ये 756, तर इटलीत 604 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू -स्पेनमध्येही एका दिवसात 704 रुग्ण दगावले -स्पेनचा एकूण मृतांचा आकडा 14 हजार 45 -इटलीत एकूण कोरोना बळी 17 हजार 127 -ब्रिटनमध्ये एकूण बळी 6 हजार 159 वर (Corona Patients Latest Update in World)
वुहानमध्ये लॉकडाऊन उठवलं
-चीनने वुहानमधलं लॉकडाऊन 76 दिवसांनंतर उठवलं – 23 जानेवारीपासून 7 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन -हुबेई प्रांतातील वुहानचे 1 कोटी 10 लाख नागरिक बंधमुक्त -वुहानमध्ये आजपासून रेल्वेसह सर्व सेवा सुरु
भारतात रुग्ण वाढतेच
-भारतात कोरोनाबळींचा आकडा 168 वर -मंगळवारी आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वाधिक मृत्यू -देशात कालच्या दिवसात 25 कोरोनाग्रस्त दगावले -मृतांमध्ये 14 वर्षीय बालकाचा समावेश -देशभर सध्या कोरोनाचे 5 हजार 325 रुग्ण -काल एका दिवसात 568 नवे रुग्ण -सलग पाचव्या दिवशी 500 हून जास्त नवे रुग्ण
महाराष्ट्रात फैलाव वाढला
-मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव वाढला -मुंबईत एकूण 642, राज्यात 1 हजार 18 पॉझिटिव्ह -आतापर्यत मुंबईत 40, राज्यात 64 मृत्यु -काल राज्यभर 150 नव्या रुग्णांची भर
-पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 158 कोरोनाबाधित -काल पुणे जिल्ह्यात 16 नवे रुग्ण -पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 8 रुग्ण दगावले -पुण्यात 128, तर पिंपरी-चिंचवडला 20 रुग्ण -बारामतीत 4, हवेलीत 2 कोरोना रुग्ण
(Corona Patients Latest Update in World)