Corona on Everest : जगातील सर्वात उंच पर्वतावरही कोरोना पोहचला, माऊंट एव्हरेस्टवरील गिर्यारोहकाला संसर्ग

काठमांडू : कोरोना विषाणूने (Corona Virus) जगभरात थैमान घातलंय. जगातील असाही कोणताही भाग राहिला नसेल जेथे कोरोनाचा संसर्ग पोहचलाय. आता तर जगातील सर्वात उंच पर्वत असलेल्या माऊंट एव्हरेस्टवरही (Mount Everest) कोरोना पोहचलाय. नॉर्वेचा (Norway) एक गिर्यारोहक माऊंट एव्हरेस्ट सर करत होता. त्याच दरम्यान त्याला कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालंय. या घटनेनंतर नेपाळच्या (Nepal Corona) चिंतेत […]

Corona on Everest : जगातील सर्वात उंच पर्वतावरही कोरोना पोहचला, माऊंट एव्हरेस्टवरील गिर्यारोहकाला संसर्ग
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 4:37 PM

काठमांडू : कोरोना विषाणूने (Corona Virus) जगभरात थैमान घातलंय. जगातील असाही कोणताही भाग राहिला नसेल जेथे कोरोनाचा संसर्ग पोहचलाय. आता तर जगातील सर्वात उंच पर्वत असलेल्या माऊंट एव्हरेस्टवरही (Mount Everest) कोरोना पोहचलाय. नॉर्वेचा (Norway) एक गिर्यारोहक माऊंट एव्हरेस्ट सर करत होता. त्याच दरम्यान त्याला कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालंय. या घटनेनंतर नेपाळच्या (Nepal Corona) चिंतेत वाढ झालीय. एव्हरेस्ट चढाईचा हा मुख्य सिझन आहे. त्यामुळे आर्थिक उत्पान्नाचं मुख्य साधन असलेल्या पर्यटनावर याचा विपरीत परिणाम होणार आहे (Corona infection reach to Mount Everest Nepal Tourist are worried).

मागील वर्षी देखील कोरोना संसर्गामुळे माऊंट एव्हरेस्टवरील गिर्यारोहण संपूर्ण सिझन बंदच राहिलं. त्यामुळे नेपाळने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी क्वारंटाईन नियमांमध्ये सूट दिलीय. विशेष म्हणजे नेपाळमध्ये संसर्ग झालेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातही अडचणी येत आहेत. एव्हरेस्टवर कोरोना संसर्ग झालेल्या नॉर्वेच्या गिर्यारोहकाचं नाव एर्लेंड नेस (Erlend Ness) असं आहे. त्याने फेसबूक मेसेजद्वारे माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार त्याला कोरोना संसर्ग झालाय आणि सध्या त्याची तब्येत स्थिर आहे. काठमांडूतील एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

कोरोना संसर्गानंतर गिर्यारोहकाला हेलिकॉप्टरने मदत

एर्लेंड नेस एव्हरेस्ट बेस कँपवर (Everest base camp) असतानाच त्याला कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्याला तात्काळ एका हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. त्याच्यावर काठमांडूमधील (Kathmandu) एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे नेसच्या गिर्यारोहकांच्या पथकातील शेरपालाही कोरोना संसर्ग झालाय. त्यामुळे गिर्यारोहकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पर्वतावर चढलेल्या गिर्यारोहकांना यामुळे अडचणी तयार होऊ नये अशीही अपेक्षा व्यक्ती केली जातेय. कारण 8000 फूट उंचीवर कोरोना संसर्ग झाल्यास संबंधित गिर्यारोहकाला हेलिकॉप्टरने वाचवणं कठीण काम असेल.

आतापर्यंत नेपाळकडून एव्हरेस्ट चढाईसाठी 377 गिर्यारोहकांना परमिट

विशेष म्हणजे कोरोना संसर्गाच्या काळातही नेपाळने आतापर्यंत 377 गिर्यारोहकांना पर्वत चढाईसाठी परमिट दिलंय. त्यामुळे पर्वताच्या सर्वात वरच्या टोकावर पोहचलेल्या गिर्यारोहकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. उंचीवर आधीच ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन श्वास घेण्यास अडचणी येतात. त्यात कोरोना संसर्ग झाल्यास मोठा धोका तयार होऊ शकतो. अशा स्थितीत यंदा मागील वर्षी 2019 मध्ये परमिट देण्यात आलेल्या 381 चा गिर्यारोहकांचा आकडा पार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्वांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

हेही वाचा :

बनावट रेमडेसिव्हीरमुळे रुग्णाचा मृत्यू, बारामतीत चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

कोविड विरुद्धची लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकणार, उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत व्यक्त केला विश्वास

“सॉरी, कोरोना व्हॅक्सिन असल्याचं माहित नव्हतं” चिठ्ठी लिहून माफी, चोरलेले शेकडो डोस परत

व्हिडीओ पाहा :

Corona infection reach to Mount Everest Nepal Tourist are worried

Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....