कोरोनाचा वाढता कहर, माणसांपाठोपाठ आता पाळीव कुत्र्यालाही लागण

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले (Corona virus affects Dog) आहे. चीनमधून आता बाहेरच्याही अनेक देशात हा आजार पसरला आहे.

कोरोनाचा वाढता कहर, माणसांपाठोपाठ आता पाळीव कुत्र्यालाही लागण
Follow us
| Updated on: Mar 05, 2020 | 11:42 AM

हाँगकाँग : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले (Corona virus affects Dog) आहे. चीनमधून आता बाहेरच्याही अनेक देशात हा आजार पसरला आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये कोरोना व्हायरस 100 लोकांपेक्षा अधिकांना झाला आहे. यादरम्यान हाँगकाँगमध्ये एका पाळीव कुत्र्यालाही कोरोनाची (Corona virus affects Dog) लागण झाली आहे.

हाँगकाँगमध्ये एका 60 वर्षीय महिलेच्या कुत्र्यालाही कोरोना झाल्याचे सिद्ध झाले आहे. माणसांनंतर प्राण्यांमध्ये कोरोना झाल्याची ही पहिलीच घटना आहे.

हाँगकाँगमध्ये एका महिलेला कोरोना झाला. त्यामुळे तिच्या कुत्र्यालाही कोरोना झाला. या कुत्र्याला तेथील एका पशू केंद्रात वेगळ ठेवले जात आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत, अशी माहिती मिळत आहे.

“एका पामेरियन कुत्र्याची कोरोनापासून अनेक गोष्टींची तपासणी कलेी. या तपासणीत कुत्र्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वर्ल्ड ऑर्गनायझेशन अॅनिमल हेल्थने यी कुत्र्याला आपल्याकड ठेवले आहे”, असं अॅग्रीकल्चर फिशरी कंजर्वेशन डिपार्टमेंटने सांगितले.

ही घटना समोर आल्यानंतर हाँगकाँगमध्ये कुत्र्यानाही वेगळे ठेवले जात आहे. पामेरियन ब्रिडच्या सर्व कुत्र्यांची सतत तपासणी केली जात आहे. या कुत्र्यांची तपासणी झाल्यानंतर निगेटिव्ह रिझल्ट आल्यास त्यांना त्यांच्या मालकांकडे सोपवले जाईल. हाँगकाँगमध्ये आतापर्यंत 104 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

जगभरात कोरोनामुळे 3100 लोकांचा मृत्यू

चीनच्या वुहानमधून सुरु झालेला कोरोना जगभरातील 60 पेक्षा अधिक देशात पसरला आहे. जगभरात आतापर्यंत 3100 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 90 हजार लोकांना याची लागण झाली आहे. भारतात कोरोनाचे 26 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत 9 लोकांचा मृत्यू झाला आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.