Corona : इटलीसाठी रविवार ठरला घातवार, चीनपेक्षा सहापट बळींची नोंद
चीनमध्ये आतापर्यंत 3119 नागरिकांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. चीनमध्ये रविवारी कोरोनाची 40 नवीन प्रकरणं समोर आली.
नवी दिल्ली : जीवघेण्या कोरोना विषाणूने (Corona Virus) आता चीनबाहेर (Corona Virus In Italy) पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. चीनबाहेर (China) कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणात वाढतो आहे. तर, चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
न्यूज एजन्सी पीटीआयनुसार, चीनमध्ये रविवारी 22 नागरिकांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला. तर इटलीमध्ये चीनच्या सहापट म्हणजेच 133 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
चीनमध्ये आतापर्यंत 3119 नागरिकांचा कोरोना (Corona Virus In Italy) विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. चीनमध्ये रविवारी कोरोनाची 40 नवीन प्रकरणं समोर आली आहेत. जानेवारीपासून आतापर्यंतची ही सर्वात कमी संख्या आहे.
हेही वाचा : कोरोनाची धास्ती! वाशिममध्ये साखरपुड्यातच लग्न उरकले
दुसरीकडे, इटलीमध्ये कोरोनामुळे (Corona Virus In Italy) गेल्या 24 तासात 133 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर इराणमध्ये (Iran) एकून 49 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. इराणमध्ये कोरोनामुळे 24 तासात मृत्यू झालेला ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. इराणमध्ये 24 तासात 743 नवीन प्रकरणं समोर आली आहे. इराणमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 194 जणांचा मृत्यू झाला आहे.
चीनमध्ये कोरोनाचे जी 40 प्रकरणं समोर आली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक नागरिक हे वुहान शहरातील आहेत. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगातर्फे दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये आतापर्यंत 80,700 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. वुहान शहरात गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. वुहानपासूनच कोरोना विषाणूचा जन्म झाला.
चीनच्या वुहान (Corona In Wuhan) शहराशी जानेवारी महिन्यातच संपर्क तोडण्यात आला होता. आता त्या शहरावरील लॉकडाऊन हटवलं जाणार असल्याची माहिती चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
इटलीमध्ये कोरोनामुळे 366 जणांचा मृत्यू
कोरोना विषाणूचा संसर्ग हा चीन बाहेर इटलीमध्ये सर्वात जास्त पसरतो आहे. इटलीमध्ये रविवार कोरोना विषाणूमुळे 133 मृत्यू झाले. कोरोनामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेल्या देशांमध्ये चीननंतर इटलीचा दुसरा क्रमांक लागला आहे.
इटलीनंतर दक्षिण कोरियात (South Korea) कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. दक्षिण कोरियामध्ये कोरोना मोठ्या प्रमाणात पसरतो आहे. इटलीच्या नागरी संरक्षण एजन्सीनुसार, हार्डबोन लोम्बार्डी क्षेत्रात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले. इथे मृतांच्या आकड्यात जवळपास तीनपट वाढ झाली आहे. रविवारी ही संख्या 133 वरुन 366 वर पोहोचली.
दक्षिण कोरियात 7,313 जणांना कोरोनाची लागण
इटली एका दिवसात कोरोना विषाणूची (Corona Virus) लागण झालेल्या रुग्णांची संख्या 1,492 वरुन वाढून 7,375 वर पोहोचली. तर दक्षिण कोरियात सध्या कोरोनाची 7,313 प्रकरणं समोर आली आहेत.
इटलीच्या नागरी संरक्षण एजन्सीचे प्रमुख एन्जेलो बोरेली यांच्यानुासर, कोरोना विषाणूचा प्रकोप थांबवण्यासाठी 220 लाख सर्जिकल मास्कचा ऑर्डर देण्यात आला आहे.
खबरदारीम्हणून इटलीने लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोकांच्या येण्या-जाण्यावर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला. पंतप्रधान ग्युसेप कोंते यांनी घटनात्मक आदेशावर सही केली. इटलीची लोकसंख्या जवळपास 6 कोटी आहे. या आदेशानंतर इटलीच्या जवळपास 160 लाख लोकांच्या ये-जावर (Corona Virus In Italy) बंदी घालण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
कोरोना इफेक्ट : हात मिळवण्यास आलेल्या व्यक्तीसमोर शरद पवारांनी हात जोडले
परदेशात वापरलेले मास्क धुवून विक्रीचा घाट, भिवंडीत एकावर गुन्हा दाखल
कोरोनाचा चिकन बाजाराला फटका, 60 टक्के मांसाहारप्रेमींची चिकनकडे पाठ