Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाच्या तडाख्यात चिनी नोटांचाही बळी, 84 हजार कोटींचं चलन जाळण्याची तयारी

कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने कोरोना बाधितांचे हात लागून बाजारात आलेल्या नोटांमधून हा फैलाव होत असल्याचा अंदाज चीन सरकारला आहे

कोरोनाच्या तडाख्यात चिनी नोटांचाही बळी, 84 हजार कोटींचं चलन जाळण्याची तयारी
Follow us
| Updated on: Feb 19, 2020 | 12:42 PM

बीजिंग : कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये मृतांचा आकडा वाढत असतानाच, आता चीनच्या चलनी नोटांचाही बळी जाणार आहे. कारण चीन सरकारने तब्बल 84 हजार कोटी युआन किमतीच्या नोटा जाळून नष्ट (China Currency Notes Destroy) करण्याची तयारी केली आहे.

कोरोना व्हायरस या भयंकर विषाणूने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. एकट्या चीनमध्ये या आजाराने आतापर्यंत 1 हजार 775 जणांचा बळी घेतला आहे. आता हाच कोरोना व्हायरस चीनच्या अर्थव्यवस्थेवर आघात करत असल्याचं चित्र आहे. कारण कोरोनामुळे तब्बल 84 हजार कोटी युआन किंमतीच्या चलनी नोटा नष्ट कराव्या लागणार आहेत.

चीनमध्ये दररोज कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आकडा वाढत आहे. कोरोनाचा फैलाव काही केल्या थांबत नाही. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने कोरोना बाधितांचे हात लागून बाजारात आलेल्या नोटांमधून हा फैलाव होत असल्याचा अंदाज आहे. त्यामुळेच आता चीन सरकारने वुहान आणि दक्षिणेतील राज्यांमधील तब्बल 84 हजार 321 कोटी युआन किमतीच्या कागदी नोटा एकत्र जाळण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – कोरोनावर भारतातील पहिली लस पुण्यात विकसित!

दैनंदिन व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणात कागदी नोटांचा वापर होतो. कागदी नोटा हाताच्या घामाने, हवेतील दमटपणाने काहीशा ओल्या होतात. ती परिस्थिती रोगकारक जिवाणू-विषाणूंच्या वाढीसाठी पोषक ठरते. त्यामुळे या कागदी नोटांद्वारे संसर्गजन्य आजारांचा संसर्ग शक्य असल्याचं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. त्यामुळेच चीनने सर्वाधिक प्रभावित असलेल्या वुहान आणि दक्षिणेतील राज्यातील कागदी नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

– 17 जानेवारीपासून देशभरात 600 अब्ज युआन म्हणजे, सुमारे 6.11 लाख कोटी रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्यात आल्या आहेत. – त्यापैकी 4 अब्ज युआन म्हणजे सुमारे 2 हजार 581 कोटी रुपयांच्या नवीन नोटा केवळ वुहानमध्ये पाठवल्या गेल्या आहेत, तर 55,740 कोटी रुपये दक्षिणेकडील राज्यांना पाठवण्यात आले

सर्व चलनी नोटा बँकेत जमा करण्याची विनंती चीनच्या सेंट्रल बँकेने ग्राहकांना केली. एकाच वेळी 84 हजार कोटींच्या नोटा जाळून नष्ट केली जाण्याची शक्यता आहे. याचा चिनी अर्थव्यवस्थेवर तात्पुरत्या स्वरुपात का होईना परिणाम जाणवण्याची शक्यता (China Currency Notes Destroy) आहे.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.