चीन आणि ब्राझीलमध्ये पुन्हा कोरोनाच्या रुग्णात वाढ, पुन्हा येतेय चौथी लाट?

Coronavirus New Variant: जगभरातील अनेक भागांमध्ये कोरोना व्हायरसच्या नवीन केसेस सातत्याने दिसून येत आहेत. चीन आणि ब्राझीलमध्ये रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुन्हा एकदा चौथी लाट येणार की काय ?असा प्रश्न देखील लोकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे.

चीन आणि ब्राझीलमध्ये पुन्हा कोरोनाच्या रुग्णात वाढ, पुन्हा येतेय चौथी लाट?
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंटImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 6:55 PM

आता कुठे तरी लोकांच्या जीवाला शांतता लाभत होती. लोक दैनंदिन जीवन सुरळीतपणे पार पडण्याच्या आशेने वाट मोकळी करत होते परंतु काही दिवसापासून सगळीकडे एक चर्चा पुन्हा कानी ऐकू पडत आहे व अनेक माध्यमांमध्ये दिसून सुद्धा येत आहे ती म्हणजे चीन आणि ब्राझील (Coronavirus Cases) या दोन्ही देशांमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण संख्या वाढताना पाहायला मिळत आहेत. वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन पुन्हा एकदा कोरोना व्हायरस ची चौथी लाट धडकणार आहे की काय? अशी शंकादेखील अनेकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. सगळीकडेच भीतीचे वातावरण देखील तयार झालेले आहे याशिवाय कोरोनाचे नवीन व्हेरीएंट(Coronavirus New Variant) संबंधित बातम्या देखील माध्यमांद्वारे येत आहेत. वेगवेगळ्या रिपोर्टमध्ये याला ओमीक्रोन चे नवीन व्हेरीएंट (Omicron New Variant) असल्याचे सांगितले जात आहेत. चीन आणि ब्राझील या देशांमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याबद्दलची चर्चादेखील आता भारतामध्ये केली जात आहे आणि भारतातील नागरिकांना सावधान राहण्याचा सल्ला देखील तज्ञ मंडळी द्वारे देण्यात येत आहे.

या कोरोना व्हायरस चा भारतातील लोकांवर नेमका काय परिणाम पाहायला मिळू शकतो याबद्दल देखील अनेकदा चर्चा घडताना पाहायला मिळत आहे.अशावेळी भविष्यात संकट जन्य परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे व त्याचबरोबर तज्ञ मंडळींचा सल्ला देखील जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. आजच्या लेखामध्ये आपण अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत, जेणेकरून पहिल्या लाटे सारखीआपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर आपल्याला नेमकी कोणती सावधानता बाळगायला लागणार आहे त्याबद्दल…

वाढत्या रुग्णसंख्येचे काय संकेत?

यावर नवी दिल्ली येथील सफदरजंग हॉस्पिटल चे डॉक्टर अनूप कुमार यांचे म्हणणे आहे की, आतापर्यंतच्या घटना क्रमानुसार सर्वात आधी चीनमध्ये पहिल्या लाटेची सुरुवात झाली होती त्यानंतर दुसरी लाट यूके आणि अमेरिका या सारख्या देशातून आली होती आणि तिसरी लाट साऊथ आफ्रिका येथून सुरू झाली होती.प्रत्येक वेळी एक नवीन व्हायरस येतो जो कोणत्या ना कोणत्या देशातून आलेला पाहायला मिळत आहे आणि एका देशातून संपूर्ण जगभरामध्ये तो पसरत आहे. अशावेळी एका देशातून दुसऱ्या देशामध्ये घडणारे संक्रमण थांबवणे खूपच कठीण होऊन बसते. एका देशाकडून दुसऱ्या देशांकडे किंवा मोठ्या प्रमाणात होणारी देवाणघेवाण यामुळे हा विषाणू त्वरित पसरण्याची शक्यता असते.

त्याचबरोबर डॉक्टरांचे असे देखील म्हणणे आहे की, एखादा व्हा सरवाईव करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या शरीरामध्ये किंवा रोगप्रतिकारशक्‍ती मध्ये टिकून राहण्याकरिता तो नेहमी प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच व्हायरस हा त्याचे वेगवेगळे रूप धारण करत आहे. भारताबद्दल बोलायचे झाल्यास गेल्या तीन-चार महिन्याचा इतिहास पाहता जेव्हा आपल्याकडे खूप साऱ्या घटना वाढत होत्या. तिसर्‍या लाटेबद्दल बोलायचे झाल्यास , आपल्याकडील यंत्रणेने या व्हायरस वर खूप मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवले होते म्हणूनच या सगळ्या प्रयत्नांच्या आधारे आपल्याकडे फारसे रुग्ण वाढले नाहीत. परंतु जर आता आपण या सगळ्या घटनांकडे दुर्लक्ष केले तर पुन्हा एकदा रुग्ण वाढ संख्या उद्भवू शकते अशा वेळी परिस्थिती नियंत्रणात आणणे कठीण होऊन बसेल. यंदा सावधानता आणि कोविड लसीकरण हेच या समस्येवरील उत्तर ठरणार आहे. जर तुम्ही कोरोनाची लस अद्यापही घेतली नसेल तर त्वरित लस घ्या आणि covid-19 चे प्रोटोकॉल पाळणे देखील अत्यंत गरजेचे आहे.

नवीन कोरोना वेरिएंट धोकादायक ठरू शकतो?

डॉक्टर अनूप कुमार यांच्या मते, या पुढे सण समारंभ यास सुरुवात होणार आहे.या निमित्याने आपल्याला बाजारात गर्दी देखील पाहायला मिळेल. आपण सगळे जाणूनच आहोत की लोक हल्ली सोशल डिस्टंसिंग चे पालन अजिबात करत नाही त्याचबरोबर आपल्यापैकी अनेक जण रस्त्यावर मास्क देखील घालत नाही. या सगळ्या गोष्टी घटनांमुळे भविष्यात चिंता करण्याची वेळ येऊ नये याची प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. चीनमध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे त्याचबरोबर बाकी अन्य शहरांमध्ये देखील रुग्णांची संख्या वाढत आहेत, जोपर्यंत जगभरात सगळे लोक लस घेत नाही तोपर्यंत कोरोना चा धोका संपणार नाहीये. तिसऱ्या लाटेमध्ये भारताला फारसे काही सहन करावे लागले नाही परंतु जर लोकांनी आपल्या वागणुकीमध्ये बदल केला नाही तर येणाऱ्या चौथ्या लाटे मुळे खूप सारे नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

काय खरंच येणार आहे चौथी लाट ?

गंगाराम हॉस्पिटल चे डॉक्टर लेफ्टिनेंट जनरल वेद चतुर्वेदी यांच्या मते, आतापर्यंत आपण काही लाटातून प्रवास केलेला आहे. याबद्दल वैज्ञानिकांनी सगळ्यांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे. त्यांच्या मते लवकरच चौथी लाट येणार आहे ही एक भविष्यवाणी आहे किंवा हा अंदाज म्हणायला हरकत नाही . हा अंदाज एकंदरीत मॅथेमॅटिकल मॉडेल नुसार वर्तवण्यात आलेला आहे त्याचबरोबर ज्या देशांमध्ये संख्या वाढत आहे, त्या संख्यामध्ये आता असलेली वाढ आणि पूर्वी असलेली वाढ यातील फरक लक्षात घेऊनच भविष्यात नेमके कोणते संकट पाहायला मिळणार आहे याचा अंदाज वैज्ञानिक मंडळी लावताना दिसत आहे. जून महिन्यामध्ये भारतात चौथी लाट येईल असा अंदाज आयआयटी कानपूर येथील वैज्ञानिकांनी केलेला आहे.

Nanded Death : पोहण्याकरीता गेलेल्या दोन तरूणांचा गोदावरी नदी पात्रात बुडून करूण अंत

Weight gain tips: वजन वाढवायचे असल्यास अश्या प्रकारे  ओट्सचा करा आहारात समावेश, काही दिवसात दिसून येईल फरक! 

MIM ने भाजपाविरोधी असल्याचं सिद्ध करावं, Ncp च्या सुरात काँग्रेसचा सूर, MIM “अग्निपरीक्षा” देणार?

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.