दहशतवादी मसूद अजहरला 18 जानेवारीपर्यंत बेड्या ठोका, पाकिस्तानी न्यायालयाचे आदेश

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला येत्या 18 जानेवारीपर्यंत अटक करण्याचे निर्देश पाकिस्तानी कोर्टाने दिले आहेत. (Pakistan Masood Azhar arrest)

दहशतवादी मसूद अजहरला 18 जानेवारीपर्यंत बेड्या ठोका, पाकिस्तानी न्यायालयाचे आदेश
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 7:25 AM

 इस्लामाबाद : जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला येत्या 18 जानेवारीपर्यंत अटक करण्याचे निर्देश पाकिस्तानी कोर्टाने दिले आहेत. पाकिस्तानमधील पंजाबच्या गुजरांवाला दहशतवाद विरोधी न्यायालयाने (ATC) हे निर्देश दिले आहेत. पोलिसांनी अजहरला दिलेल्या मुदतीपर्यंत अटक केली नाही; तर न्यायालय त्याला गुन्हेगार म्हणून घोषित करु शकतं. (court of Pakistan ordered police to arrest the Masood Azhar before 18 January)

या आधी गुजरांवला न्यायालयाने मसूद अजहरला शुक्रवारी (8 जानेवारी) न्यायालयात आणण्याचे आदेश दिले होते. मात्र पोलीस त्याला अटक करु शकले नाही. त्यानंतर न्यायलयाने मसूदला 18 जानेवारीपर्यंत अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

संसदेवरील हल्ला, पठाणकोट हल्ला, उरी हल्ला, पुलवामा हल्ला असे अनेक हल्ले जैश-ए -मोहम्मद या संघटनेने घडवून आणले आहेत. तसेच पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांना आर्थिक रसद देण्यासारखे अनेक आरोप जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूदवर अजहरवर आहेत. मसूदचा ठावठिकाणा माहीत नसल्याचे पाकिस्तानने कित्येक वेळा न्यायालयाला तसेच माध्यमांसमोर सांगितले आहे. त्यानंतर गुजरांवाला न्यायालयाच्या न्यायाधीश नताशा नसीम सुप्रा यांनी मसूदला 18 जानेवारीपर्यंत बेड्या ठोकण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे मसूद पाकिस्तानमध्येच असल्याचे स्पष्ट होत आहे.

एफएटीएफच्या भीतीमुळे कारवाई

पाकिस्तानी न्यायालयाने मसूद अजहरला पकडण्याचे आदेश दिलेले असले तरी एफएटीएफ (FATF) च्या कारवाईच्या भीतीने पाकिस्तान ही करत असल्याचे भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात एफएटीएफची बैठक होणार आहे. या बैठकीत पाकिस्तानकडून दहशतदावादी संघटनांना रसद पुरवली जाते ही बाब सिद्ध झाली, तर पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’ मध्ये टाकले जाऊ शकते. परिणामी जागतिक बँक, युरोपीय महासंघ यांच्याकडून आर्थिक मदत मिळवण्यास पाकिस्तानला अडचणी येऊ शकतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच मसूदला 18 जानेवारीपर्यंत अटक करण्याचे फर्मान सोडलेले आहे, असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, पाकिस्तानी पोलीस दहशतवादी मसूद अजहरला 18 जानेवारीपर्यंत अटक करु शकले नाही तर पाकिस्तानी न्यायालय मसूदवर वेगवेगळे आरोप ठेवू शकते. त्यांनतर दहशतवादी कारवायांमध्ये सहकार्य केल्याप्रकरणी न्यायालय मसूदला दोषी ठरवू शकते. भरातातील पुलवामा येथे 2019 साली झालेल्या हल्ल्यामध्ये मसूद अजहरची भूमिका असल्याचे पुरावे यापूर्वीच भारताने दिलेले आहेत. त्यानंतर आता पाकिस्तानी पोलीस येत्या 18 जानेवारीपर्यंत मसूदला कोर्टात हजर करु शकतील की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड लखवीला पाकिस्तानात 15 वर्षांची शिक्षा

मुंबईवरील 26 /11 दहशतवादी हल्ल्याची 12 वर्षे, पाकिस्तानची पोलखोल करणारे ‘सात मुद्दे’

मुंबई हल्ल्यामागचा सूत्रधार हाफिज सईदला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

(court of Pakistan ordered police to arrest the Masood Azhar before 18 January)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.