Covid-19 latest update worldwide वॉशिंग्टन : या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये कोरोनासोबत लढा देण्यासाठी आपल्याकडे कोरोना लसीच्या स्वरुपात उपचार उपलब्ध आहे. असं असतानाही यंदा नव्या रुपात समोर येणाऱ्या कोरोना विषाणुंमुळे जगभरातील अनेक देश चिंतेत आहेत. एकिकडे जगभर कोरोना लसीकरण सुरु आहे. दुसरीकडे सातत्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळं या वर्षीही बऱ्याच देशांना लॉकडाऊन लावण्याची वेळ आलीय (Covid-19 latest update worldwide Brazil Bangladesh Italy France America Pakistan Britain).
फ्रान्स, इटलीनंतर बांग्लादेशनेही शनिवारी (3 एप्रिल) 7 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. सध्याच्या परिस्थितीत जगात 13,14,41,030 लोकांना कोरोना संसर्ग झालाय. तर 28,60,578 लोकांचा मृत्यू झाला आहे.
ब्राझिलमध्ये मृतदेह पुरायला जमिनीचा तुटवडा
ब्राझिलमध्ये कोरोना संसर्गामुळे मृत्यूचं प्रमाण इतकं वाढलंय की तेथे अंतिम संस्कारासाठी जमीन कमी पडत आहे. मागील 24 तासात ब्राझिलमध्ये 78,238 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे आणि 2,922 लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यांच्यावर अंतिम संस्कार करुन दफन करायलाही जमीन कमी पडत आहे. इथं एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1.29 कोटीपेक्षा अधिक झालीय. मृतांची संख्या 3 लाख 28 हजारपेक्षा जास्त झालीय.
इटलीमध्ये इस्टरवरही कडक निर्बंध
इटलीमध्ये वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इस्टरवरही निर्बंध लादण्यात आलेत. कोरोना विषाणूच्या संसर्गावर आळा घालण्यासाठी नियमात वाढ करण्यात आलीय. यानुसार 3 दिवसांसाठी कडक राष्ट्रव्यापी लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. कोरोना संसर्गाचा दर कमी होत असला तरी खबरदारी म्हणून सोमवारी सगळ्या भागांना रेड झोन म्हणून बंद करण्यात आलंय. शनिवारी (3 एप्रिल) इटलीत 21,247 नवीन रुग्णांची नोंद झालीय, तर मृतांची संख्या 376 एवढी आहे.
अमेरिकेत शनिवारी 63 हजारपेक्षा अधिक रुग्ण
कोरोनामुळे सगळ्यात जास्त प्रभावित झालेल्या अमेरिकेतही नवीन रुग्णांची भर पडतेय. येथे नव्याने 63,841 रुग्णांची नोंद झालीय तर मृतांची संख्या 748 एवढी आहे. आतापर्यंत इथे एकूण 3, 13. 83,126 रुग्णांची नोंद झाली, तर 5,68,513 लोकांनी आपला जीव गमावला आहे.
पाकिस्तानमधील अवस्था मागील वर्षीपेक्षा गंभीर
शनिवारी पाकिस्तानमध्ये 5,020 रुग्णांची नोंद झाली तर मृतांची संख्या 81 एवढी होती. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसोबत झुंजणाऱ्या पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 68,288 लोक संक्रमित झाले आहेत, तर 14,778 लोकांनी आपला जीव गमावला. पाकिस्तान सरकारने देखील देशातील परिस्थिती मागील वर्षी पेक्षा गंभीर असल्याचं मान्य केलंय.
ब्रिटेनमध्ये लसीकरण विरुद्ध नवा कोरोना संसर्ग
ब्रिटेनमध्ये लसीकरण विरूद्ध नवा कोरोना संसर्ग अशी लढाई सुरु आहे. सगळ्यात अगोदर इथेच नवीन स्वरुपातील कोरोना विषाणूची नोंद झाली होती. शनिवारी इथे 3,423 रुग्णांची नोंद झाली तर मृतांची संख्या 10 एवढी होती. आतापर्यंत इथे एकूण 43,57,091 संक्रमित लोकांची नोंद झाली, तर 1,27,826 लोकांनी आपला जीव गमावला आहे.
हेही वाचा :
Corona Cases and Lockdown News LIVE : मुंबईत दिवसभरात 11,163 नवे रुग्ण, दिवसभरात 25 रुग्णांचा मृत्यू
व्हिडीओ पाहा :
Covid-19 latest update worldwide Brazil Bangladesh Italy France America Pakistan Britain