मासे पकडण्यासाठी वडिलांसोबत गेलेल्या 8 वर्षीय मुलाला मगरीने गिळलं, त्यानंतर थरारक घटनाक्रम…

आपल्या वडिलांसोबत मासे पकडण्यासाठी एका 8 वर्षीय मुलाला मगरीने (Crocodile) गिळल्याची धक्कादायक घटना इंडोनेशियात (Indonesia) घडली.

मासे पकडण्यासाठी वडिलांसोबत गेलेल्या 8 वर्षीय मुलाला मगरीने गिळलं, त्यानंतर थरारक घटनाक्रम...
Follow us
| Updated on: Mar 07, 2021 | 9:14 PM

जकार्ता : आपल्या वडिलांसोबत मासे पकडण्यासाठी एका 8 वर्षीय मुलाला मगरीने (Crocodile) गिळल्याची धक्कादायक घटना इंडोनेशियात (Indonesia) घडली. त्यामुळे या चिमुकल्याचा मृतदेह (Dead body of Child) मगरीचं पोट फाडून काढावा लागला. मगरीने मुलाला पूर्णपणे गिळल्याने या परिसरात एकच खळबळ माजली. इंडोनेशियातील पूर्व कालिमंतन प्रांतात ही घटना घडली. मगरीने मासेमारी करण्यासाठी आलेल्या मुलालाच आपलं भक्ष केल्यानं त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला (Crocodile eat 8 year child while fishing with Father in Indonesia).

मगरीने आपल्या 8 वर्षीय मुलाला गिळल्याचं पाहिल्यानंतर वडिलांच्या पायाखालची जमिनच सरकली. वडिलांनी मुलाला वाचवण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले. त्यांनी हातात कोणतंही शस्त्र नसतानाही मगरीशी झुंज देत मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या मगरीने वडिलांनाही पाण्यात ओढलं. त्यामुळे त्यांचाही जीव धोक्यात गेला. मात्र, मगर मुलाला गिळून पाण्यात गडप झाल्याने वडिलांचा जीव वाचला.

मगरीचं पोट फाडून मुलाचा मृतदेह बाहेर काढला

मृत मुलाचं नाव डिमास आणि वडिलांचं नाव सुबेलिनिआह असं होतं. ते व्यवसायाने मच्छिमारच होते. दैनंदिन सवयीप्रमाणेच ते मासेमारी करायला गेले. मात्र, त्या दिवशी मगरीच्या रुपातील काळाने त्यांच्या मुलावर घाला घातला. अखेर संबंधित जलाशयात मगरीचा शोध घेतल्यानंतर ती मगर सापडली. त्या मगरीचं पोट फाडून त्या चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मगरीने त्याला तसंच गिळल्याने हा मृतदेह मिळाला.

वडिलांच्या धाडसाचं कौतुक

वडिलांनी आपल्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दाखवलेल्या साहसाबद्दल परिसरातील नागरिकांकडून त्यांचं कौतुक होत आहे. मगरीशी लढताना आपलाही जीव जाऊ शकतो हे माहिती असतानाही त्यांनी मुलासाठी अटोकाट प्रयत्न केले. मात्र, वडिलांना आपल्या प्रयत्नानंतरही मुलाला वाचवू न शकल्यानं धक्का बसलाय.

मगरीने केलेल्या या हल्ल्यानंतर नागरिकांना मगरीपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आलाय. तसेच लहान मुलांना पाण्यापासून सुरक्षित अंतरावर ठेवण्याची सूचना करण्यात आली.

हेही वाचा :

तुम्हाला मगरीची नसबंदी कशी होते माहितीय का? सोलापुरात 20 मगरींची होणार

मुलुंडमध्ये सहा फुटाची मगर, एनजीओकडून मगरीला पकडण्यात यश

रायगडमधील पुरात मगरीचा थरार, पावसाच्या पाण्यातून थेट घराच्या छतावर

व्हिडीओ पाहा :

Crocodile eat 8 year child while fishing with Father in Indonesia

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.