इराणवर सायबर हल्ला, अण्वस्र अड्डे निशाण्यावर, आता काय होणार ?

इराणने 1 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर 200 हून अधिक मिसाईल डागली होती. त्यानंतर इस्रायलने बदला घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू इस्रायलने इराणवर थेट हल्ला न करता लेबनॉनवर मैदानी लढाई सुरु केलेली आहे. आता इराणवर सायबर हल्ला झाल्याचे म्हटले जात आहे.

इराणवर सायबर हल्ला, अण्वस्र अड्डे निशाण्यावर, आता काय होणार ?
cyber attack on iran
Follow us
| Updated on: Oct 12, 2024 | 1:41 PM

इस्रायल आणि इराणमध्ये संघर्ष सुरु आहे. मध्य पूर्वेत युद्धाचा भडका सुरु असताना शनिवारी इस्रायलने इराणवर सायबर हल्ला केला आहे. इराण सरकार आणि आण्विक अड्ड्यांवर इस्रायलने शनिवारी सायबर हल्ला केल्या असून यात महत्वाचा डाटा चोरला गेला आहे.या हल्ल्यात सरकारच्या ती शाखांवर निशाना बनवले आहे. हा सायबर हल्ला नेमका केव्हा झाला त्याचे नेतृत्व कोणी केले याबाबत कोणतीही माहीती मिळालेली नाही. 1 ऑक्टोबर रोजी इराणने इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव केला होता. त्यानंतर इस्रायल संतापला आहे. त्याने इराणचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. काही दिवसांपूर्वी इस्रायलचे पंतप्रधानांनी या संदर्भात बैठक घेतली होती. त्यात इराणच्या न्युक्लिअर अड्ड्यांना लक्ष्य करण्याचे नियोजन केले होते.

इराणच्या सुप्रीम काऊन्सिल ऑफ साइबरस्पेसचे माजी सचिव फिरोजाबादी यांच्या वक्तव्यानुसार इराण इंटरनॅशनलने म्हटले आहे की इराण सरकारच्या तीन शाखा न्यायपालिका, विधायिका आणि एक्झीक्युटीव्ह ब्रांचवर मोठा सायबर हल्ला झालेला आहे.येथून महत्वाची माहीती चोरीला गेलेली आहे. या हल्ल्यात आण्विक ठिकाणांसोबतच इंधन वितरण, नगरपालिका नेटवर्क, परिवहन नेटवर्क, बंदरे आणि अन्य नेटवर्कना टार्गेट केले गेले आहे. ही देशभरातील विविध क्षेत्रातील मोठ्या यादीचा एक हिस्सा असून त्यावर हल्ला केलेला आहे.

अमेरिकेचे निर्बंध असतानाही हल्ला

अमेरिकेने इस्रायलवर अनेक प्रतिबंध लावले असताना हा सायबर हल्ला करण्यात आलेला आहे. इस्रायलवर इराणने मिसाईल हल्ले केल्यानंतर पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल सेक्टर्सवर प्रतिबंध लादले गेले आहे. अमेरिकेचे हे पाऊल त्या आदेशाचा भाग आहे ज्यात इराणला मिसाईल प्रोग्रॅम्ससाठी सरकारी मदत करण्यास प्रतिबंध केलेला आहे. याआधी आपला कट्टर दुश्मन इस्रायल जर आपल्यावर हल्ला करेल तर आपल्या सार्वभौमत्वाची रक्षा करण्यासाठी इराण संपूर्ण तयार असल्याचे इराणने म्हटले आहे. इस्लामिक रिपब्लिक इराणने त्यांचे दोन कट्टर सहकारी इस्माईल हानिया आणि हेजबोला हसन नसरल्लाह यांच्या सह एका इराणी जनरल यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर मिसाईल डागली आहेत.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.