श्रीलंका बॉम्बस्फोटात डेन्मार्कच्या सर्वात श्रीमंत उद्योगपतीच्या 3 मुलांचा मृत्यू
कोलंबो : श्रीलंकामध्ये रविवारी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात डेनमार्कचे सर्वात श्रीमंत उद्योगपती अँडर्स होच पोलसेन यांच्या 3 मुलांचा मृत्यू झाला आहे. याबाबत पोलसेन यांच्या कंपनी प्रवक्त्यांनीही दुजोरा दिला. मात्र, याविषयी अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. पोलसेन यांना एकूण 4 मुले असून त्यापैकी 3 मुली आहेत. मात्र, या स्फोटात नेमका कुणाचा मृत्यू झाला हे अजून स्पष्ट होणे […]
कोलंबो : श्रीलंकामध्ये रविवारी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात डेनमार्कचे सर्वात श्रीमंत उद्योगपती अँडर्स होच पोलसेन यांच्या 3 मुलांचा मृत्यू झाला आहे. याबाबत पोलसेन यांच्या कंपनी प्रवक्त्यांनीही दुजोरा दिला. मात्र, याविषयी अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. पोलसेन यांना एकूण 4 मुले असून त्यापैकी 3 मुली आहेत. मात्र, या स्फोटात नेमका कुणाचा मृत्यू झाला हे अजून स्पष्ट होणे बाकी आहे.
पोलसेन हे आंतरराष्ट्रीय कपड्याची कंपनी ‘बेस्टसेलर’चे मालक आहेत. त्यांना स्कॉटलंडमधील सर्वाधिक जमीनीचा मालिकही मानले जाते. पोलसेन यांच्या 3 मुलींची नावे एल्मा, एस्टि्रड आणि एग्नेस अशी आहे, तर मुलाचे नाव अल्फ्रेड आहे. श्रीलंकेत बॉम्बस्फोट होण्याच्या 3 दिवस आधी एल्माने श्रीलंकेत सुट्टीसाठी गेलेल्या आपल्या 3 बहिण-भावांचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. त्यामुळे त्या तिघांचाच मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
पोलसेन ब्रिटेनच्या एएसओएस या ऑनलाइन फॅशन रिटेलरचे सर्वात मोठे शेअरधारक आहेत. तसेच ते जर्मनीच्या जेलांडो या ऑनलाइन क्लॉथ रिटेलरचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शेअरधारक आहेत. डेनमार्कच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पोलसेन यांचे कुटुंब श्रीलंकेत सुट्टीसाठी गेले होते. फोर्ब्सनुसार पोलसेन स्कॉटलंडमधील 1 टक्क्याहून अधिक जमिनीचे मालक आहेत. नॅशनल हॉस्पिटलचे निर्देशक डॉ. अनिल जयसिंघे यांनी 33 पैकी 12 परदेशी नागरिकांची ओळख पटवली आहे. यात भारतातील 10 जणांचा समावेश आहे. या स्फोटातील मृतांची संख्या 310 पर्यंत पोहचली आहे. परदेशी मृतांमध्ये भारतासह चीन, पोलंड, डेन्मार्क, जपान, पाकिस्तान, अमेरिका, मोरक्को आणि बांग्लादेशच्या नागरिकांचाही समावेश आहे.