SpiceJet flight : स्पाईसजेटने दुसरं विमानं कराचीला पाठवलं, विमानातील सगळे प्रवासी सुखरुप
स्पाइसजेटच्या विमानात आत्तापर्यंत अनेकदा बिघाड झाला आहे. ही विमानं आपत्कालीन उतरण्याची पहिली वेळ नाही. दिल्ली-जबलपूर मध्ये मागच्या शनिवारी सुद्धा अशा पद्धतीने अचानक विमान उतरवण्यात आलं.
नवी दिल्ली – दिल्लीहून (Delhi) दुबईला (Dubai) जाणाऱ्या एका स्पाईसजेट (spicejet) विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान अचानक पाकिस्थानातील कराची (karachi) विमानतळावर उतरवण्यात आलं. विमानात असलेले सगळे प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. स्पाईटजेटच्या प्रवक्तांनी सांगितलं की, दिल्लीहून दुबईला निघालेल्या विमानाच्या हेडलाईटमध्ये खराबी झाल्यामुळे ते तात्काळ पाकिस्तानात उतरवण्यात आलं आहे. विमानात असलेले सगळे प्रवासी सुरक्षित आहे.
नेमकं काय झालं
दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे- SG11 पाकिस्तानातील कराचीमध्ये आपत्कालीन अवस्थेत उतरवण्यात करण्यात आले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाचे आपत्कालीन व्यवस्थेत लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती एएनआयने दिली आहे. विमानाने सकाळी 8 वाजता उड्डाण केले होते. भारतीय वेळेनुसार सकाळी 9:50 वाजता दुबईत विमान उतरणार होते. पण तेवढ्यात स्पाईटजेटच्या प्रवक्तांनी सदर घटनेची माहिती जाहीर केली. कराचीला स्पाईसजेट कंपनीचे एक विमान पाठवण्यात येणार असून त्या विमानाने प्रवाशांना दुबईत सोडण्यात येईल. विशेष म्हणजे तिथं असलेल्या प्रवाशांना स्पाईसजेटकडून जेवण देण्यात आले आहे.
पूर्वी देखील असा बिघाड झाला होता
स्पाइसजेटच्या विमानात आत्तापर्यंत अनेकदा बिघाड झाला आहे. ही विमानं आपत्कालीन उतरण्याची पहिली वेळ नाही. दिल्ली-जबलपूर मध्ये मागच्या शनिवारी सुद्धा अशा पद्धतीने अचानक विमान उतरवण्यात आलं. त्यावेळी केबिनच्या एका बाजूने धुर येत असल्याचं प्रवक्तांनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.