आओ तुम्हें चांद पे ले जाएं… बायकोला थेट चंद्रावर फिरायला नेणारा जगातील पाहिला माणूस; बुकींगही झाले
डेनिस टिटो त्यांची पत्नी अकिकोसह चंद्राची सफर करणार आहेत. त्याची स्पेस टूर आठवडाभराची असणार आहे.
नवी दिल्ली : आओ तुम्हें चांद पे ले जाएं… बॉलिवुडच्या गोल्डन इरामधील या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे. या गण्यात गायकाने चंद्रावर जाण्याची कल्पना केली आहे. मात्र, लवकरच ही कल्पना प्रत्यक्षात साकारणार आहे. जपानचा एक 82 वर्षीय व्यक्ती आपल्या बायकोला थेट चंद्रावर फिरायला नेणार आहे. स्पेस टूर अर्थात अंतराळ सफरीचे तिकिट बुक करणारा हा जगातील पाहिला पर्यटक आहे.
जपानचे रहिवासी असलेले डेनिस टिटो हे जगातील पहिले अंतराळ पर्यटक ठरणार आहेत. टिटो यांनी चंद्रावर जाण्यासाठी स्टारशिप रॉकेटची दोन तिकिटे बुक केली आहेत.
डेनिस टिटो त्यांची पत्नी अकिकोसह चंद्राची सफर करणार आहेत. त्याची स्पेस टूर आठवडाभराची असणार आहे. या टूरची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
टिटो यांच्यासह या टूरमध्ये आणखी 10 पर्यटकही चंद्रावर जाणार आहेत. स्पेस टूर करणारे हे पर्यटक चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार नाहीत.
स्पेस टूरला जाणाऱ्या या पर्यटकांना अनेक चाचण्यांमधून जावे लागणार आहे. त्यानुसारच यांच्या टूरचे नियोजन केले जाणार आहे.
या स्पेस टूरसाठी पर्यटकांना किती पैसे मोजावे लागणार याचा देखील काहीच तपशील समोर आलेला नाही.
डेनिस टिटो यांनी 2001 मध्ये अंतराळ पर्यटन सुरू केले. अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या विरोधाला न जुमानता टिटो अंतराळात गेले होते. रशियन स्पेस एजन्सीला टिटो यांनी मोठी आर्थिक मदत केली. स्पेस टूरचे तिकीट खरेदी करुन याद्वारे त्यांनी स्पेस एजन्सीला मदत केली.
टिटो यांच्या आधी एका जपानी अब्जाधीशानेही चंद्रावर जाण्यासाठी तिकीट काढले. ऑगस्ट 2021 मध्ये SpaceX सोबत केलेल्या करारानुसार आतापासून पाच वर्षांच्या आत उड्डाण करण्याचा पर्याय समाविष्ट आहे. त्यानुसारच या स्पेस टूरचे नियोजन केले जाणार आहे.