कुत्र्याच्या हल्ल्यात चेहरा विद्रुप झाला, तरी ताठमानेने ती मॉडेल पुन्हा नव्या रूपात रॅम्प वॉकवर अवतरली
तिच्या पाळीव कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात तिचा जबडाच बाहेर लटकत होता. तिचा वरचा ओठ नष्ट झाला होता, तरीही तिने हार न मानता नव्याने जगायचे ठरविले. चांगला सर्जन गाठला आणि संपूर्ण नव्या रूपात ती जगासमोर आली.
दिल्ली : कुत्र्याने केलेल्या भयानक अमानुष हल्ल्यात या मॉडेलच्या चेहऱ्याला अक्षरश: विद्रुप करून टाकले होते. तिच्या नाकाचा काही भाग आणि वरचा ओठच नाहीसा झाला होता. तरीही या 23 वर्षीय अमेरीकन मॉडेलने हार न मानता परीस्थितीला सामोरे जाण्याचा निर्धार केला. या मॉडेलच्या चेहऱ्यावर डॉक्टरांनी तब्बल सहा कॉस्मेटिक सर्जरी करीत तिचे हास्य तिला परत मिळवून दिले आहे. आता या धक्क्यातून सावरत या मॉडेलने पुन्हा रॅम्प वॉकवर नव्या उमेदीने कमबॅक केले आहे. कोणतेही संकट आले तरी हार न मानण्याचा सल्लाच जणू या घटनेने तिने सर्वांना दिला आहे.
अमेरिकन मॉडेल ब्रुकलीन खोवरी 23 ही नोव्हेंबर 2020 मध्य तिच्या पीट बुल जातीच्या कुत्र्यासह कझीन बरोबर घरी परतत असताना तिच्यावर कुत्र्याने भयानक हल्ला केला. एका टीव्ही जाहीरातीसाठी तिची निवड झाल्याच्या आनंदात ती घरी परतत असताना तिच्यावर कुत्र्याने हल्ला केला होता, या हल्ल्यात तिच्या चेहऱ्यावर भयानक जखमा झाल्या होत्या. तिच्या पाळीव कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात तिचा जबडाच बाहेर लटकत होता. तिचा वरचा ओठ नष्ट झाला होता त्यामुळे तिला डॉक्टरांनी कसेतरी वाचवत तिच्यावर अनेक शस्रक्रिया केल्या. तिने तिच्या विद्रुप चेहऱ्याचा फोटो पोस्ट केला आहे. त्याच तिचा वरचा ओठ दिसत नाही.
एका वृत्तपत्राला मुलाखत देताना ब्रुकलीन हीने सांगितले की त्यावेळी माझा चेहरा पाहून मीच घाबरली अरे देवा मी कशी दिसत आहे. आता कसे या चेहऱ्याला मी ठीक करू. तिने आपला चेहरा ठीक करण्यासाठी सुमारे एक वर्षभर डॉक्टरांचा शोध घेतला. अखेर डॉक्टरांनी तिच्या चेहऱ्यावर सहा सर्जरी करीत तिचा चेहरा तिला मिळवून दिला, यातील काही सर्जरी 20 तासांहून मोठ्या होत्या. त्यानंतर तिला तिचा वरचा ओठ परत मिळाला. डॉ. निकोलस यांनी तिच्या हाताची त्वचा आणि नसा वापरून पूर्ण पूर्वीसारखाच वरचा ओठ तयार करुन दिला.
‘प्लास्टीक सर्जरीत आम्ही अवयवातले जे गहाळ झाले होते ते आपण पुन्हा तयार करू शकत नाही परंतु जर आपण त्या अवयवाची पुरेशी नक्कल करू शकलो, त्यामुळ सार्वजनिक ठिकाणी अशा लोकांना पुन्हा सन्मानाने जाता येते त्यांना कोणताही कमीपणा वाटत नसल्याचे डॉ. निकोलस यांनी सांगितले.