Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hazara Community : पहिल्यांदा झेलल्या तालिबान्यांच्या यातना; आता होत आहेत हल्ले, कोण आहे हजारी समाज

Hazara Community : तालिबानच्या (Taliban) अधिपत्याखाली अफगाणिस्तान आल्यापासून येथे अनेक घटना या घडत आहेत. तेथे बॉम्बस्फोट, शिया लोकांवर हल्ले होत आहेत. आता पुन्हा एकदा अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूलमधील एका शाळेत सलग तीन बॉम्बस्फोट झाले. त्यामुळे इस्लामिक स्टेटवर संशयाची सुई जात आहे. याचे कारण की, तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून इस्लामिक स्टेट अॅक्टिव्ह झाली आहे. ही दहशतवादी […]

Hazara Community : पहिल्यांदा झेलल्या तालिबान्यांच्या यातना; आता होत आहेत हल्ले, कोण आहे हजारी समाज
हजारा समाजImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 6:43 PM

Hazara Community : तालिबानच्या (Taliban) अधिपत्याखाली अफगाणिस्तान आल्यापासून येथे अनेक घटना या घडत आहेत. तेथे बॉम्बस्फोट, शिया लोकांवर हल्ले होत आहेत. आता पुन्हा एकदा अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूलमधील एका शाळेत सलग तीन बॉम्बस्फोट झाले. त्यामुळे इस्लामिक स्टेटवर संशयाची सुई जात आहे. याचे कारण की, तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून इस्लामिक स्टेट अॅक्टिव्ह झाली आहे. ही दहशतवादी संघटना जादातर शिया लोकांना आपला निशाना बनवत आहे. येथील शिया लोकांच्या मशीदींवर हल्ला केला जात आहे. अशातर काबूलमध्ये हजारा (Hajara) समुदायाचे प्राबल्य असलेल्या भागात हे तीन स्फोट झाले आहेत. यामध्ये 25 हून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालिबानच्या अत्याचारांना बळी पडलेल्या हजारा समाजाची चर्चा सुरू झाली आहे.

हजारा समाज हा येथील डोंगराळ भागात राहतो. तो येथील अल्पसंख्याक समाजांपैकी एक आहे. तर अफगानिस्तानच्या एकुण लोकसंख्येपैकी 20 टक्के लोकसंख्या ही हजारा समाजाची आहे. तर यांच्याबद्दल असे म्हटलं जात की ते मंगोल सम्राट चंगेच खान यांचे वशंज आहेत. मात्र मंगोल सैनिक येथून 13 व्या शतकात गेले होते. त्यांची भाषा आणि चेहरे हे अफगानच्या लोकांपासून वेगळे आहेत. अफगाण लोक हे बहुतेक वंशीय पश्तून आहेत. जो शिया समुदायात येतो. त्यामुळेच त्यांच्यावर इस्लामिक स्टेट वारंवार हल्ला करत असतो.

कोण आहे हजारा समाज

हजारा समुदाय हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये राहणारा शिया मुस्लिमांचा समुदाय आहे. जो 10 टक्के आहे. मात्र विचार करण्याची बाब म्हणजे तालिबान आणि इस्लामिक स्टेट हे दोघेही सुन्नी आहेत. तर हजारी समुदाय हा दारी पर्शियन भाषेतील हजागी बोली बोलतात. हजारा हे पर्शियन, मंगोलियन आणि तुर्किक वंशाचे आहेत. तर ते मंगोल शासक चंगेज खानचे वंशज असल्याचेही मानले जाते. चंगेज खानने 13 व्या शतकात अफगानवर हल्ला केला होता. ते मध्य अफगानिस्तान च्या डोंगराळ भागात राहतो. जो हजारांच्या समुदायात राहतो. ज्यांची हजारगी ही बोली भाषा ही आहे. तर हा समाज पाकिस्तान, अमेरिका आणि ब्रिटनमध्येही लोक राहतात. जे सारख्या सुरू असणाऱ्या युद्धाला कंटाळून देश सोडून इतर देशात गेले आहेत.

तालिबान आणि इस्लामिक स्टेट का चिडते हजारी समुदायावर

तालिबान आणि इस्लामिक स्टेट हे हजारी समाजाला कायम आपल्या टार्गेटवर ठेवून आहे. याचे कारण त्यांचे शीया असणे. तर तालिबान आणि इस्लामिक स्टेट हे सुन्नी पंथी असणे. तालिबान आणि इस्लामिक स्टेट कट्टर पंथी आहे. त्यामुळे तो शीया यांना काफिर मानतो. त्यामुळे तालिबान आणि इस्लामिक स्टेट हजारी समुदायावर चिडून आहे. यावर माजी खासदार मोहम्मद अलीजादा ने सांगितले की, आमच्या लोकांचा लोकशाही, शिक्षण तर तालिबान आणि इस्लामिक स्टेट यांची धार्मिक आणि रूढीवाद यावरून कायम वाद होतो. तालिबान आणि इस्लामिक स्टेट हे हजारी समाजावर कायम हल्ला करतात.

तर मागिल शासन काळात हजारा समाजाच्या लोंकाचे 1998 मध्ये मजार शरिफ मध्ये नर संहार करण्यात आला होता. असाच प्रकार बामियान प्रातांतही झाला होता. त्याचबरोबर तालिबान आणि पाकिस्तानमध्येही त्यांच्यावर हल्ला हा होतच आहे. आजही हजारा समुदायाची मोठ्या प्रमाणात हत्त्या केली जात आहे. त्याचबरोबर इस्लामिक स्टेटशी संबंधीत इतर गटांनी हजारा समुहाबरोबरच द. एशियामधील शीया समुहांना निशाना साधला आहे.

इतर बातम्या :

kabul Blast : अफगाणिस्तान हादरले! शाळेजवळ जबरदस्त साखळी बॉम्बस्फोट, 25 पेक्षा अधिक विद्यार्थी ठार

Imran Khan : इम्रान खानच्या सभांना जमलेल्या गर्दीमुळे पाकिस्तान लष्कराला का घाम फुटतोय?

Cristiano Ronaldo’s Newborn Boy Dies : हृदयद्रावक! रोनाल्डोचं नवजात बाळ दगावलं, ट्वीट करत काय म्हणाला रोनाल्डो?

करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज..
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज...
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्.
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी.
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक.
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन.
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी.