डोनाल्ड ट्रम्प यांच्याजवळ आता 29,170,000,000,000 डॉलर, राज काय ?

जगाची सर्वात मोठी आर्थिक सत्ता असलेल्या अमेरिकेच्या तिजोरीच्या चाव्या ट्रम्प यांच्या हातात पु्न्हा एकदा आल्या आहेत. अमेरिकेचा अर्थव्यवस्थेचा आवाका नेमका किती आहे ? तेथील परिस्थितीचा हा आढावा

डोनाल्ड ट्रम्प यांच्याजवळ आता 29,170,000,000,000 डॉलर, राज काय ?
donald trump
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 5:02 PM

जगाची सर्वात मोठ्या आर्थिक महासत्तेला अखेर राष्ट्राध्यक्ष मिळाला आहे. अमेरिकेने रिपब्लिकन पार्टीच्या डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले आहे. अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून महा बलाढ्य देशाचे नेतृत्व अखेर ट्रम्प दुसऱ्यांदा करणार आहेत.परंतू ही जबाबदारी किती मोठी आहे. हे तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. अमेरिकेची अर्थव्यवस्था नेमकी किती मोठी आहे. अमेरिकेवर किती कर्ज आहे , अमेरिकेचे उत्पन्न किती आणि खर्च किती ? तसेच या बलाढ्य देशात बेरोजगारी किती याची माहिती घेऊयात…

अमेरिकेची ताकद किती आहे?

कोणत्याही देशाची ताकद त्यांची अर्थव्यवस्था असते. कारण त्यावर वरच जगात तुम्हाला किंमत मिळते. अर्थव्यवस्था सांगते की तो देश किती प्रगती करत आहे. किती जणांना रोजगार देत आहे. महागाई किती आहे आदी माहिती त्यावरुन कळते.

अमेरिकेच्या जीडीपीचा विचार केला तर तो 29,170,000,000,000 डॉलर आहे. म्हणजे सुमारे 29.17 लाख कोटी डॉलर इतका प्रचंड आहे. ही जगाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. त्यानंतर चीन, जर्मनी, जापान आणि भारताचा क्रमांक लागतो. IMF च्या अनुसार साल 2025 मध्ये अमेरिकेची अर्थव्यवस्था वाढून 29.8 लाख कोटी डॉलर इतकी होऊ शकते.

लोकाचे राहणीमान काय ?

समजा तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न महिन्याला एक लाख रुपये आहे. परंतू कुटुंब दहा लोकांचे आहे. तर एक माणूस सरासरी दहा हजार कमावत आहे. जर दोन लोकांच्या कुटुंब असते तर एक माणसानृवर 50 हजार खर्च झाले असते, म्हणजे राहाणीमान कोणाचे चांगले असणार हे तुम्हाला कळले असेल. दरडोई उत्पन्न किती ?

अर्थव्यवस्थेच्या भाषेत याला जीडीपी पर कॅपिटा ( दरडोई उत्पन्न )  म्हणतात. तुमचा जीडीपी कितीही मोठा असला तरी त्याने काही फरक पडत नाही. दरडोई उत्पन्न  खरे सत्य सांगत असते. अमेरिकेच्या जीडीपीनुसार दरडोई उत्पन्न 86.6 हजार डॉलर आहे. म्हणजे सरासरी एका माणसाचे उत्पन्न इतके आहे. हे खूपच चांगले उत्पन्न आहे.

आता भारत जगातील पाचवी आर्थिक महासत्ता आहे.परंतू भारताचे दरडोई उत्पन्न अवघे 2.7 हजार डॉलर इतके आहे. म्हणजे एक भारतीय वर्षाला केवळ 2.7 लाख रुपये कमाई करीत आहे. आणि अमेरिक नागरिक वर्षाला 72.96 लाख रुपये कमावत आहे. तरीही अमेरिका दरडोई उत्पन्नात टॉपवर नाही.

अमेरिकेवर कर्ज किती ?

या वेळेच्या निवडणूकीच्या प्रचारात अजब गोष्ट घडली. डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यानी अमेरिकेच्या कर्जाबद्दल काही वाच्छता केली नाही. या आधीच्या निवडणूकात कर्जाचा मुद्दा हॉट होता. परंतू यावर देखील बोलले गेले पाहीजे. कारण अमेरिकेचे कर्ज वाढत चालले आहे.

आज घडीला अमेरिकेवर सुमारे 28 लाख कोटी डॉलरचे कर्ज आहे. ते जीडीपीच्या 99 टक्के आहे. दहा वर्षांपूर्वी 2012 मध्ये हे कर्ज 11.4 लाख कोटी डॉलर होते. तेव्हा ते जीडीपीच्या 69.5 टक्के होते. अमेरिकेच्या कॉंन्ग्रेशनल बजेट ऑफीसच्या मते साल 2023 मध्ये अमेरिकेचे कर्ज वाढून 51 लाख कोटी डॉलर झाले असून ते जीडीपीच्या 122 टक्के आहे.

अमेरिकेची कमाई, खर्च आणि तोटा किती ?

अमेरिकेच्या बजेटनुसार सध्या अमेरिकेची कमाई 4.9 लाख कोटी डॉलर हून अधिक आहे. आणि खर्च सुमारे 6 लाख कोटी डॉलरहून अधिक आहे.या हिशेबाने अमेरिका सध्या 1.8 लाख कोटी तोट्यात आहे. या तोटा गेल्यावर्षांपेक्षा 8 टक्के जादा आहे.

अमेरिकेचा बेरोजगारी दर?

बेरोजगारी अमेरिकेतही आहे. परंतू ही तेथील मोठ समस्या नाही. अमेरिकेच्या ब्यूरो ऑफ लेबर स्टेटीसटिक्सच्या मते ऑक्टोबर 2024 मध्ये बेरोजगारीचा दर 4.1 टक्के आहे. हा दर वाईट नाही आणि चांगला आहे असेही नाही.ऑक्टोबर मध्ये केवळ 12,000 नोकऱ्या वाढल्या आणि यावरुन कळते नोकऱ्यांचा वेग सुस्त पडला आहे.

Non Stop LIVE Update
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?.
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य.
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा.
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका.
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी.
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”.
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा.
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर..
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर...
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी.
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?.