ट्रम्पही असाही इतिहास घडवणार. द्विपक्षीय पद्धतच मोडीत काढणार?

Donald Trump| अध्यक्षपद सोडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प नवा राजकीय पक्ष काढण्याची शक्यता आहे. (Donald Trump USA )

ट्रम्पही असाही इतिहास घडवणार. द्विपक्षीय पद्धतच मोडीत काढणार?
Follow us
| Updated on: Jan 20, 2021 | 2:58 PM

न्यूयार्क: अमेरिकेच्या अध्यक्षपदावरुन पायउतार झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प स्वत:चा नवा पक्ष स्थापन करण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे.वॉल स्ट्रीट जनरलच्या रिपोर्टनुसार डोनाल्ड ट्रम्प नवा पक्ष काढून त्याला ‘Patriot Party’असं नाव देण्याची शक्यता आहे. नव्या पक्षाच्या स्थापनेबाबत ट्रम्प यांनी त्यांचे सहकारी आणि जवळच्या लोकांशी चर्चा केली आहे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला असला तरी मोठ्या प्रमाणावर लोकांचं समर्थन असल्याचं पुढं आलं होते. (Donald Trump will create new Political Party in USA)

डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनासाठी राजकारणात सक्रिय नसणारे लोक देखील पुढं आल्याची माहिती आहे. अमेरिकेतील रिपब्लिक पक्षाला ग्रँड ओल्ड पार्टी म्हटलं जाते. रिपब्लिक पक्षावर विश्वास नसणारे लोक ट्रम्प यांच्या नव्या पक्षाच्या समर्थनात पुढे येऊ शकतात. अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर डोनाल्ड ट्रम्प आणि रिपब्लिकच्या इतर नेत्यांमध्ये वाद पाहायला मिळाले होते. सिनेटमधील रिपब्लिक पार्टीचे प्रमुख मिच मॅककोनेल यांच्यासोबत ट्रम्प यांचा वाद झाला होता. ट्रम्प यांनी मॅककोनेल यांच्यावर विश्वासघात केल्याचा आरोप केला होता. वॉल स्ट्रीट जनरलच्या रिपोर्टनुसार ट्रम्प खरंच नवीन पार्टी स्थापन करतील का याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात आली आहे.

अमेरिकेत दोन पक्षांचं वर्चस्व

अमेरिकन राजकारणावर आतापर्यंत दोन पक्षांचं वर्चस्व राहिलं आहे. जो बायडन अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतील. जगातील सर्वात बलाढ्य लोकशाही देशात डेमॉक्रेटिक आणि रिपब्लिक या दोन पक्षांचा वर्चस्व राहीलं आहे. अमेरिकेत इतर पक्ष आहेत पण त्यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठ यश मिळालं नसल्याचं पाहायला मिळालं आहे. डोनाल्ड ट्रमप् यांनी नवा पक्ष स्थापन केल्यास त्यांना कितपत प्रतिसाद मिळणार हा प्रश्न कायम आहे.

राजकीय हिंसा मान्य केली जाणार नाही

अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निरोप भाषणाचा एक व्हिडीओ जारी केला. या व्हिडीओमध्ये ट्रम्प त्यांच्या कार्यकाळातील ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाच्या यशाबाबत बोलताना दिसत आहेत. तसेच, “आम्ही जी चळवळ सुरु केली, ती फक्त एक सुरुवात आहे”, असंही ते म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅपिटॉल भवनात झालेल्या हिंसेचाही या भाषणादरम्यान उल्लेख केला. हे अमेरिकेच्या मूल्यांविरोधात असल्याचं त्यांनी म्हटलं. “कॅपिटॉल भवनवर झालेल्या हिंसेने प्रत्येक अमेरिकी नागरिक घाबरला होता. राजकीय हिंसा त्या सर्व मुल्यांवरील हल्ला आहे ज्या मुल्यांवर आपण जगतो. हे कधीही सहन केलं जाऊ शकत नाही. आता आम्हाला आधीपेक्षा जास्त एकत्र येण्याची गरज आहे”, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या

Donald Trump Impeachment | डोनाल्ड ट्रम्प: दुसऱ्यांदा महाभियोग, सर्वात बलाढ्य लोकशाहीतील सत्तापेच

Donald Trump | खुर्ची सोडण्यापूर्वी ट्रम्प यांचा चीनला अजून एक झटका, कोणता मोठा निर्णय?

US Capitol | संसदेचं रुपांतर छावणीत, 20 हजार जवान तैनात, जवानांवर जमिनीवर झोपण्याची वेळ

(Donald Trump will create new Political Party in USA)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.