ऐनवेळी घेतलेल्या या निर्णयाने डोनाल्ड ट्रम्प यांचे वाचले प्राण, काय होता तो निर्णय

केवळ दैव कृपेने मी वाचलो आहे. आम्ही घाबरणार नाही. उलट धैय्यावर ठाम राहू.जे हल्ल्यात जखमी झाले ते ठीक व्हावेत अशी प्रार्थना मी करतो. जो व्यक्ती या हल्ल्यात वाईटरित्या मारला गेला त्याच्याबद्दल माझ्या हृदयात करुणा आहे. आपण सच्चे अमेरिकन म्हणून आपले चरित्र दाखवूया असे डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्यानंतर म्हटले आहे.

ऐनवेळी घेतलेल्या या निर्णयाने डोनाल्ड ट्रम्प यांचे वाचले प्राण, काय होता तो निर्णय
Donald TrumpImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jul 14, 2024 | 8:52 PM

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेंन्सिल्वेनियाच्या रॅली दरम्यान प्रचाराचे भाषण करताना जीवघेणा हल्ला झाला. ते सभेला संबोधित करीत असताना धाडधाड गोळीबार झाला. ट्रम्प यांच्या डाव्या कानाला चाटून गोळी गेली. ट्रम्प यांच्या कानातून रक्त येऊ लागले ते डायसच्या खाली वाकले त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्यांना चारी बाजूंनी घेरले आणि सुरक्षितस्थळी नेले. तर सिक्रेट सर्व्हीसच्या जवानांनी हल्लेखोराला जागीच ठार केले. ऐनवेळी त्यांनी जनतेशी थेट संवाद साधत भाषण करण्याचा निर्णय घेतल्यानेच ट्रम्प यांचे प्राण वाचल्याचे म्हटले जात आहे.

ट्रम्प यांच्या वाचण्याच्या मागे टेलिप्रॉम्प्टरचा वापर न करण्याचा निर्णय असल्याचे म्हटले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या निवडणूक प्रचार रॅलीत भाषण करताना नेहमीच टेलिप्रॉम्प्टरचा वापर करतात. परंतू आज त्यांनी पहिल्यांदा टेलिप्रॉप्टर न वापरता जनतेशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला. तेव्हाच नेमका गोळीबार झाला आणि गोळी त्याच्या कानाला चाटून गेली आहे.

जर डोनाल्ड ट्रम्प यांनी नेहमीप्रमाणे भाषण करताना जर टेलिप्रॉम्प्टर वापरला असता तर कदाचित वाचले नसते. वास्तविक छायाचित्रात टेलिप्रॉम्पट दिसत आहे. परंतू त्याचा वापर न करता त्यांनी जनतेकडे पाहून संवाद साधत भाषण सुरु केले. त्यामुळे त्यांची मान सारखी हलत राहीली. त्यामुळे गोळीबार करणाऱ्याचा निशाना अवघ्या काही सेंटीमीटरने मिस झाला आणि ते सुदैवाने बचावले. जर टेलिप्रॉम्प्टरचा वापर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असता तर कदाचित त्यांनी मान टेलिम्प्टरच्या दिशेने मजकूर वाचण्यासाठी स्थिर ठेवली असती आणि निशाना चुकला नसता असे म्हटले जात आहे. हल्लेखोराने 200 मीटरवरुन एका छतावरुन स्नायपर गनने ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला. जर ट्रम्प यांनी मान स्थिर ठेवली असती कदाचित त्यांना गोळी लागून ते गंभीर जखमी झाले असते आणि त्यांच्या प्राणावर देखील ते बेतले असते.

ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याने त्यांच्या पाठीराख्यांना मोठा धक्का बसला आहे. आता जे मतदार कोणाच्याही बाजूने नव्हते, तटस्थ होते किंवा जो बायडेन यांच्या बाजूने होते त्यांनाही आता ट्रम्प यांच्याबद्दल सहानुभूती वाटत आहे. त्यांना आता ट्रम्प यांच्यावर विश्वास टाकावा असे वाटत आहे. तसेच हल्ला जो बायडेन यांच्या सरकारमध्ये झाल्याने जनतेचे मतपरिवर्तन होई लागले आहे.तसेच बायडेन सरकारच्या अपयशामुळेच हल्लेखोराने घुसखोरी केली असाही आरोप होत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना सहानुभूतीचा लाभ ?

ट्रम्प यांच्या रिपब्लिकनच्या पाठीराख्यांमध्ये बायडेन सरकार आणि त्यांचा डेमोक्रेट्स पक्षाबद्दल राग होता. परंतू काही तटस्थ लोक होते तेही आता ट्रम्प यांना समर्थन करु शकतात असे म्हटले जात आहे. तसेच ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष पदासाठी जो बायडेन यांच्या तुलनेत शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फीट असल्याचे अमेरिकन लोकांना वाटत आहे. या घटनेनंतर हल्लेखोराला लागलीच सिक्रेट सर्व्हीसने ठार केले. त्याचे नाव थॉमस क्रुक असून त्याचे वय 20 वर्षे आहे.तो पेंसिल्वेनियाचा रहिवासी आहे. त्याचा रक्ताने भरलेला मृतदेह घटना स्थळी पडला होता. हल्लेखोराच्या डोक्यात गोळी घालण्यात आली आहे.

टेलिप्रॉम्पटर म्हणजे काय ?

टेलिप्रॉम्पटर ला autocue नावाने देखील ओळखले जाते. हा एक आरशासारखा डिस्प्ले असतो. यात पाहून चित्रवाहीन्यांवर अँकर बातम्या असतात. यात स्क्रीनवर आपल्या भाषणाचे मुद्दे दिसत असतात. ते पाहून राजकीय नेते भाषण करीत असतात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.