Dubai Climate Change : बापरे…दुबईचे तापमान 62 डिग्री पार, का तापले स्वप्नाचं शहर, कारण काय ?
जेव्हा खूप तापमान वाढत जाते तेव्हा शरीरात 'डीहायड्रेशन' सुरु होते. तेव्हा शरीर घाम तुम्हाच्या शरीराला आजूबाजूच्या तापमानाशी सुसंगत करण्यासाठी मदत करीत असतो.
दुबईचे तापमानाचा पारा 62 डिग्री सेल्सिअसच्या पार गेल्याचा प्रकार घडला आहे. 16 जुलै 2024 रोजी दुपारी हे सर्वोच्च तापमान दुबई इंटरनॅशलन एअरपोर्टवर नोंदल गेले आहे. म्हणजे तापमानाचा पारा 144 फॅरनहाईटवर पोहचला होता. म्हणजेच 62.44 डिग्रीवर काटा पोहचला होता. सायंकाळी 5 वाजता हे तापमान लागलीच खाली येत 53.9 डिग्री सेल्सिअस झाले. परंतू हे तापमान सजिवांसाठी योग्य नाही. कोणताही सजीव अशा तापमानात तग धरु शकत नाही. वाळवंटी शहर दुबई का तापलं आहे. याविषयी आता चर्चा सुरु झाली आहे.
दुबईत अलिकडे जोरदार पर्जन्यवृष्टी होऊन अक्षरश:पूर आला होता. आता येथील तापमानाने उच्चांक गाठला आहे. ज्यादिवशी हे तापमान सर्वोच्च पातळीवर पोहचले त्यावेळी हवेत दमटपणा देखील होता. हवा देखील तापली होती. एअर टेंपरेचर 42 डिग्री सेल्सिअर होते. ‘ड्यू पाँईंट’ म्हणजेच आद्रता 85 टक्के होती. त्यामुळे तापमान 62.22 डिग्रीवर पोहचले. म्हणजेच दुबईत वेट बल्ब टेंपरेचरचे वातावरण आहे. असे वातावरणात मानवाचे आरोग्य ढासळते. अशा परिस्थितीत माणूस वाचणे जवळपास अशक्य असते.
दुबईत सर्वसामान्यपणे पारा 40 डिग्रीच्या आसपास असतो. परंतू येथील तापमानात जगण्याचा संघर्ष करावा लागतो. कारण हे तापमान शरीरातील पाणी घामावाटे बाहेर काढून टाकत असते. येथून जवळील सौदीतील मक्केत उष्णतेच्या लाटेने एक हजार लोकांचा नुकताच मृत्यू झाला आहे. यंदाचे वर्ष जगासाठी सर्वात उष्णतापमानाचे वर्ष आहे. यामुळे संपूर्ण आखाताची कोंडी होत आहे.
जेव्हा तापमान सर्वाधिक असते आणि आद्रता देखील सर्वोच्च असते त्यावेळी त्या तापमानाची सर्वाधिक धोका मनुष्याला असतो. कारण तेव्हा वातावरणात घुसमट होते. माणसाला अधिक घाम येतो. आणि उष्णता आणि आद्रता यांचे मिश्रण धोकादायक ठरते. त्यामुळे घामामुळे शरीरातील पाणी नष्ट होऊन ‘डीहायड्रेशन’ होऊ शकते. तहानेने धाप लागून मनुष्य अर्धमेला होतो. तहानेने जीव व्याकूळ होतो. चक्कर येते. किडनी आदी अवयव निकामी होऊ शकतात. मनुष्याचा मृत्यू देखील होऊ शकतो.
तापमान आणि रिलेटिव्ह ह्युमिडीटी याचा एकत्र मोजणी करुन ‘वेट बल्ब टेम्परेचर’ वा एखाद्या स्थानाचा ‘हिट इंडेक्स’ काढू शकतो. त्यामुळे या दोन्ही परिस्थितीचे नोंद केली जाऊ शकते. तापमान आणि आद्रता असलेली ‘हिट व्हेव’ देखील समजू शकते. एका ठराविक दबावाच्या स्थितीत ‘वेट बल्ब टेम्परेचर’ मध्ये हवा पाण्यातून निघालेल्या वाफेमुळे थंड होऊ शकते. परंतू त्यास ठराविक दाब तयार होणे गरजेचे असते.
येथे पाहा ट्वीट –
Dubai recorded a heat index of 144°F (62.2°C) today at 3 PM.
The heat index is currently 129°F (53.9°C) at 5 AM local time.
Life-threatening heat. pic.twitter.com/9eExu1jVMx
— Colin McCarthy (@US_Stormwatch) July 17, 2024
जेव्हा खूप तापमान वाढत जाते तेव्हा शरीरात ‘डीहायड्रेशन’ सुरु होते. तेव्हा शरीरातून निघालेला घाम तुम्हाच्या शरीराला आजूबाजूच्या तापमानाशी जुळविण्यास मदत करीत असतो. जेव्हा अतिउष्णता वाढते तेव्हा शरीर आणि हवामान थंड होण्याची प्रक्रीया देखील हळूहळू होते. यामुळे शरीराची संतूलन बिघडू शकते. ‘हीट स्ट्रोक’ येऊ शकतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘वेट बल्ब टेम्परेचर’ ची मर्यादा 30 ते 35 डिग्री सेल्सिअस असते. याहून अधिक तापमान जेव्हा तापमान वाढते तेव्हा माणसाचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते.