तिबेटमध्ये भूकंपाने एक हजार घरे भुईसपाट,किमान 100 जणांचा मृत्यू , तीन तासांत 50 वेळा धरणी हादरली

| Updated on: Jan 07, 2025 | 8:33 PM

तिबेट हे जगातील सर्वात उंचीवर क्षेत्र आज सकाळी आलेल्या तीव्र भूकंपाच्या झटक्याने हादरले असून या एव्हरेस्ट शिखरापासून ८० किमीवर असलेल्या गावात आहे. या भूकंपाने एव्हरेस्टवर परिणाम झालेला नसला तरी या गावातील हजार घरे भूईसपाट होऊन शंभर जण दगावले आहेत.

तिबेटमध्ये भूकंपाने एक हजार घरे भुईसपाट,किमान 100 जणांचा मृत्यू , तीन तासांत 50 वेळा धरणी हादरली
Follow us on

भारताचे शेजारील देश तिबेटमध्ये भूकंपाच्या तीव्र झटक्याने किमान 100  लोकांचे प्राण गेले आहेत. एव्हरेस्ट शिखरापासून जवळ असलेल्या गावात 7.1 इतक्या तीव्रतेच्या या भूकंपाने एक हजार घरे भूईसपाट होऊन किमान एक हजार  गावकरी  दगावल्याचे वृत्त आहे. या भूकंपाचे केंद्र हजारो फूट उंचीवर असलेल्या टिंगरी गावात आहे. ज्या एव्हरेस्ट पर्वताचे उत्तर द्वार म्हटले जाते. विशेष म्हणजे एव्हरेस्ट शिखर या गावापासून अवघ्या 80 किलोमीटरवर आहे. भूकंपाचे केंद्र दहा किमी जमीनीच्या आत खोलवर आहे.

भारताचा शेजारी असलेला तिबेट देशात 7.1 तीव्रतेचा मोठा भूकंप आल्याने जगातील सर्वात उंच असलेली भूमी अक्षरश : थडथडली असून भूकंपानंतरच्या छोट्या-छोट्या धक्क्यांनी संपूर्ण गावातील इमारती आणि घरे धाराशाही झाली आहे. एव्हरेस्ट पर्वातापासून 80 किमीवर असलेल्या टिंगरी गावात या भूकंपाचे केंद्र जमीनीच्या खाली 10 किलोमीटरवर आहे. या गावातील सर्व एक हजार घरे जमीनदोस्त झाली आहेत. भूकंपाचे केंद्र कमी खोलीवर असल्याने मोठी हानी झाली आहे. यामुळे तीन तासांत येथे 50 वेळा धरणीकंप होऊन मोठे नुकसान झाले आहे.

तिबेट हा जगातील सर्वात उंच प्रदेश असून समुद्र पातळीपासून याची उंची 13000-16000 फूट आहे. पर्वतमय भाग असल्याने येथे भूकंपामुळे मोठी हानी होण्याची शक्यता असते. मंगळवारी सकाळी 9.15 वाजता झालेल्या या 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने येथे रस्त्याला भेगा पडल्या तर इमारती आणि घरे भूईसपाट झाली. यानंतर तीव्र झटक्याने 3 तासांत 50 ऑफ्टरशॉक झाले, त्यातील अनेक धक्क्यांची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल नोंदवली गेली आहे. यामुळे टिंगरी आणि परिसरातील शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत.

हे सुद्धा वाचा

7000 लोकसंख्येच्या गावात 1000 घरे उद्ध्वस्त

भूकंपाच्या केंद्रापासून 20 किलोमीटरच्या परिघात असलेल्या 27 गावांमध्ये सकाळी नऊच्या सुमारास भूकंपाने हाहाकार उडाला.येथे सात हजार लोकसंख्येपैकी एक हजार घरे कोसळली आहेत. चिनी प्रसारमाध्यमाने दिलेल्या बातमीनुसार या भागात सुमारे 1000 घरे उद्ध्वस्त झाली आहेत. बचाव पथकाने येथे तातडीने मदत कार्य सुरु केले. आणि आजूबाजूच्या गावातही बचाव कार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. कोसळलेल्या इमारती,उद्ध्वस्त झालेले रस्ते आणि चेंदामेंदा झालेल्या गाड्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहेत.

हिमस्खलनाचा धोका

तिबेटमधील टिंगरीत झालेला हा भूकंप हा ‘ल्हासा ब्लॉक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रात असलेल्या क्रॅकमुळे झाला आहे. हा क्रॅक उत्तर-दक्षिण प्रेशर आणि पश्चिम-पूर्व दाबामुळे तयार झाला आहे. उदाहरणार्थ,या ल्हासा ब्लॉकमध्ये 1950 पासून आतापर्यंत 6 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे 21 भूकंप नोंदवले गेले आहेत. भूकंपानंतर, माऊंट एव्हरेस्टला जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत.येथील भूकंपाच्या धक्क्याने बसलेल्या जोरदार हादऱ्यांमुळे हिमस्खलनाचा धोका वाढला आहे.