Earthquake : म्यानमार-थायलंडच्या भूकंपाचे खरं कारण ठरली ही फॉल्टलाईन, पाहा भूगर्भात काय होतात हालचाली?
भूकंपाचे केंद्र म्यानमार येथील सागाइंग आहे. भूकंपाने नेमकी किती हानी झाली याची काहीही आकडेवारी समोर आलेली नाही. परंतू सोशल मीडियावरील शेअर झालेल्या फोटो आणि व्हिडिओवरुन या भूकंपाची तीव्रता लक्षात येत आहे. अशात या भूकंपाचे नेमके कारण काय आहे हे समजून घ्यायला हवे आहे.

Earthquake : म्यानमान आणि थायलंडची राजधानी बँकाँक भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरले आहे. २८ मार्च रोजी ७.७ आणि ६.४ रिश्टर स्केलच्या दोन लागोपाठ बसलेल्या धक्क्याने हाहा:कार उडाला आहे. या भूकंपाचे केंद्र मान्यमार येथील सागाइंग येथे आहे. हे केंद्र शहरापासून १६ किमी अंतरावर आहे. भूकंपाची केंद्राची खोली १० किलोमीटर खोल नोंदविली गेली आहे.याचे झटके थायलंडच्या बँकाँकपर्यंत जाणवले गेले आहे. त्यामुळे २६ डिसेंबर २००४ रोजी थायलंडला आलेल्या सुनामी लाटेच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.
भूकंपाला कारण काय ?
म्यानमार येथे आलेल्या भूकंपाचे कारण नेमके काय ? हे कळण्याआधी हे समजायला हवे की भूकंप नेमका का येतो ? पृथ्वीच्या पोटात टेक्टॉनिक प्लेट आहे. या प्लेट हळूहळू हालचाल करीत असतात. जेव्हा या प्लेट एकमेकांशी टक्कर घेतात किंवा घसरतात तेव्हा यातून निघणाऱ्या ऊर्जेने भूकंपाच्या लहरी तयार होतात. या लहरीचे भूकंपाला जबाबदार असतात.
भारत आणि ब्रह्मदेशाची टेक्टॉनिक प्लेट
म्यानमारच्या भूकंपाचे केंद्र सागाइंग असून ते भूकंपांच्या दृष्टीने खूपच संवेदनशील आहे. ही अशी जागा आहे, येथून भारत आणि ब्रह्मदेशाच्या टेक्टॉनिक प्लेटच्या सीमा आहेत. ही फॉल्टलाईन सुमारे १२०० किलोमीटर लांबीची आहे. याच कारणाने म्यानमारला भूकंपाचा मोठा काळा इतिहास आहे. सागाइंगमध्ये टेक्टोनिक प्लेटचे मुव्हमेंट होत राहाते. परंतू यंदा भूकंपाची तीव्रता मोठी होती. इमारती कोसळणे, ब्रिज पडले याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.




भूकंपाचा इतिहास काय?
भूकंपाने नेमके किती नुकसान झाले याची बातमी असून समजलेली नाही. परंतू नुकसान जास्त असेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे कारण, भूकंपाचे केंद्र ज्या जागेवर आहे ती एक फॉल्टलाईनवर आहे. इतिहासाची पाने उलटली तर या आधी देखील ७.७ तीव्रतेचा भूकंप याआधी देखील येऊन गेला आहे.साल १९४६ मध्ये देखील भूकंप आला होता. यानंतर २०१२ मध्ये ६.८ तीव्रतेचा भूकंप आला होता.
भूकंप आणणारी प्लेट किती सरकते ?
जमिनीच्या खाली असणारी भूकंप टेक्टॉनिक प्लेट किती सरकते याचा संशोधकांनी एका रिसर्चद्वारे थांगपत्ता लावण्याचा प्रयत्न केला आहे. स्टडी नुसार प्लेटमध्ये दर वर्षी मुव्हमेंट होत असते. ही प्लेट दरवर्षी ११ एमएम ते १८ एमएमपर्यंत सरकत असते त्यामुळे भूकंपांना निमंत्रण मिळत असते.
किती धोका असतो ?
धोका किती वाढेल याविषयी नेमके काहीही सांगता येणार नाही. असे यासाठी की काळानुसार प्लेटमध्ये ताण वाढत जातो. जेव्हा हा ताण अचानक रिलीज होतो. तेव्हा भूकंप येतो. विशेषत:च्या म्हणणे आहे की दरवर्षी १८ एमएमपर्यंत होणारा हा बदल भूगर्भात मोठी हालचाल आणतो. म्हणजे यात मोठी एनर्जी स्टोअर असते. एनर्जी मोठ्या भूकंप लहरींत रिलीज होऊ शकते म्हणून मोठा भूकंप होतो, असेच म्यानमार मध्ये घडले आहे.