जेफ बेझोस पिछाडीवर, आता ‘ही’ व्यक्ती ठऱली जगात सर्वात श्रीमंत; संपत्ती तब्बल 1,38,42,78,96,75,000 रुपये

टेस्ला इंक (Tesla Inc) आणि स्पेसएक्स (SpaceX) या दोन बड्या कंपन्यांचे संस्थापक एलन मस्क (Elon Musk) यांनी अ‌ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना मागे टाकलं असून मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. (richest person Elon Musk)

जेफ बेझोस पिछाडीवर, आता 'ही' व्यक्ती ठऱली जगात सर्वात श्रीमंत; संपत्ती तब्बल 1,38,42,78,96,75,000 रुपये
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 7:50 AM

वॉशिंग्टन : टेस्ला इंक (Tesla Inc) आणि स्पेसएक्स (SpaceX) या दोन बड्या कंपन्यांचे संस्थापक एलन मस्क (Elon Musk) यांनी अ‌ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना मागे टाकलं असून मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांची संपत्ती जेफ बेझोस यांच्यापेक्षा 1.5 अब्ज डॉलरने अधिक आहे. टेस्लाच्या (Tesla) समभागांमध्ये (shares) वाढ झाल्यामुळे एलम मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. एलन मस्क यांची एकूण संपत्ती 188.5 अब्ज डॉलर म्हणजेच 1,38,42,78,96,75,000 रुपये एवढी आहे. (Elon Musk becomes most richest person of the world)

समभागांचे मूल्य वाढले, आणि मस्क श्रीमंत झाले

मागील वर्षी टेस्ला कंपनीच्या समभागांमध्ये आठ पटीने वाढ झाली होती. त्यावेळी टेस्ला ही जगातील सर्वात महागडी कंपनी बनली होती. यावेळीसुद्धा समभागांमध्ये वाढ झाल्यामुळे मस्क यांची संपत्ती वाढली होती. ब्लूमबर्गने दिलेल्या रिपोर्टनुसार एलन मस्क यांची टेस्ला कंपनीमध्ये 20 टक्के हिस्सेदारी आहे. या वर्षीच्या सुरुवातीलाच गुरुवारी (8 जानेवारी) मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या समभागांचे मूल्य पुन्हा वाढले. ही वाढ तब्बल 7.4 टक्क्यांनी होती. गुरुवारी टेस्ला कंपनीच्या समभागाचे मूल्य 811.31 डॉलर्स होते. मिळालेल्या माहितीनुसार मागील 12 महिन्यांमध्ये एलन मस्क यांच्या संपत्तीमध्ये 150 अब्ज डॉलर्सने वाढ झाली आहे. मात्र, असे असले तरी फोर्ब्स बिलिनियर्सच्या लिस्टनुसार एलन मस्क यांची संपत्ती अजूनही जेफ बेझोस यांच्यापेक्षा 7.8 अब्ज डॉलर्सने कमी असल्याचं सांगितलं जात आहे.

2017 पासून जेफ बेझोस सर्वांत धनाढ्य व्यक्ती

अ‌ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस मागील तीन वर्षांपासून म्हणजेच ऑक्टोबर 2017 पासून जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होते. त्यानंतर आता एलन मस्क यांनी बेझोस यांना मगे टाकले आहे. मक्स यांचे अनेक क्षेत्रात काम आहे. ऑटोमोबाईल कंपनी टेस्लासोबतच रॉकेट कंपनी स्पेसएक्स (SpaceX) आणि न्यूरालिंक (Neuralink) या कंपनी मस्क यांच्या मालकीच्या आहेत.

संबंधित बातम्या :

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर!

ररोज नव्हे तर आठवड्यातून 12 तासच काम, ‘अलिबाबा’च्या श्रीमंतीचा नवा फंडा

(Elon Musk becomes most richest person of the world)

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.