French election : इम्यॅनुएल मॅक्रॉन हेच फ्रान्सचे नवे कारभारी, सलग दुसऱ्यांदा विजय; मरीन ले पेन यांचा पराभव

| Updated on: Apr 25, 2022 | 1:13 PM

फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅनुएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (French election) बाजी मारली आहे. ते आता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा फ्रान्सचा कारभार पहाणार आहे. फ्रान्समधील जनतेने त्यांच्यावर पुन्हा विश्वास टाकत त्यांना निवडून दिले.

French election : इम्यॅनुएल मॅक्रॉन हेच फ्रान्सचे नवे कारभारी, सलग दुसऱ्यांदा विजय; मरीन ले पेन यांचा पराभव
Image Credit source: ANI
Follow us on

फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅनुएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (French election) बाजी मारली आहे. ते आता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा फ्रान्सचा कारभार पहाणार आहे. फ्रान्समधील जनतेने त्यांच्यावर पुन्हा विश्वास टाकत त्यांना निवडून दिले. गेल्या 20 वर्षांत फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक दुसऱ्यांदा जिंकणारे मॅक्रॉन पहिले राष्ट्रपती ठरले आहेत. त्यांनी मरीन ले पेन (Marine Le Pen) यांना पराभूत केले. इम्यॅनुएल मॅक्रॉन यांना या निवडणुकीत 58.2 टक्के मते मिळाली, तर मरीन ले पेन यांना 41.8 मते मिळाली. फ्रान्समध्ये राष्ट्रपतीपदासाठी एकूण 12 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र खरी लढत ही फ्रान्सचे विद्यामान राष्ट्रपती इम्यॅनुएल मॅक्रॉन आणि मरीन ले पेन यांच्यामध्येच होती. या लढतीकडे फ्रान्ससह अवघ्या जगाचे लक्ष लागले होते. अखेर या लढतीमध्ये फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅनुएल मॅक्रॉन यांनी बाजी मारली आहे. त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले.

समर्थकांचा विजयी जल्लोष

इम्यॅनुएल मॅक्रॉन यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत बाजी मारल्यानंतर त्यांच्या समर्थकांच्या आनंदाला उधान आले आहे. समर्थकांनी एकच जल्लोष केल्याचे पहायला मिळाले. समर्थकांनी आयफेल टॉवर समोर एकत्र येत जल्लोष केला. आयफेल टॉवरमधील चँप डे मार्स पार्कमध्ये एका मोठ्या स्क्रीनवर अंतिम निकाल जाहीर करण्यात आला होता. या निकालात 58.2 टक्के मते मिळून मॅक्रॉन यांनी बाजी मारली. मॅक्रॉन विजयी झाल्याचे कळताच त्यांच्या समर्थकांनी आयफेल टॉवर परिसरात विजयी जल्लोष करताना, एकमेकांचे अभिनंदन केले. यावेळी मॅक्रॉन समर्थकांच्या हातात फ्रान्स आणि यूरोपियन यूनियनचे झेंडे देखील दिसून आले.

रशिया- युक्रेन युद्धावर प्रतिक्रिया

इम्यॅनुएल मॅक्रॉन राष्ट्रपती होताच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ट्विट करत, इम्यॅनुएल मॅक्रॉन यांचं अभिनंदन केलं आहे. इम्यॅनुएल मॅक्रॉन यांनी विजयानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले की, आपल्याला देशासाठी अनेक कामे करायची आहेत. जनतेने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवला आहे. युक्रेन आणि रशियामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध भीषण आहे. या युद्धाबाबत आवाज उठवण्याची गरज असल्याचे मॅक्रॉन यांनी म्हटले आहे.

 

संबंधित बातम्या

Explosion in Nigeria: नायजेरियात तेल कारखान्यात शक्तीशाली स्फोट, 80 जणांचा मृत्यू

Pune Brinton Pharma : यूकेमध्ये संशोधन आणि विकास केंद्र स्थापन करणार पुण्यातील ब्रिंटन फार्मा

सोन्याची लंका अन्नाला ‘महाग’, जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य, भारताकडूनही मदत