सुनीता विल्यम्स अंतराळात अडकूनही पती म्हणाले, ती तर तिची…

अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकात अडकल्या आहेत. जवळपास दोन महिने झाले त्यांचा मुक्काम तेथेच असताना त्यांचे कुटुंबिय मात्र इकडे आरामात आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलने सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांच्या कुटुंबियांची मुलाखत घेतली आहे.

सुनीता विल्यम्स अंतराळात अडकूनही पती म्हणाले, ती तर तिची...
Follow us
| Updated on: Aug 12, 2024 | 5:33 PM

अमेरिकन अंतरावीर सुनीता विल्यम्स अंतराळात जाऊन दोन महिने झाले आहेत. सुनीता विल्यम्स त्यांचे सहकारी बट विल्मोर यांच्या सह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात 5 जून 2024 रोजी गेले होते. परंतू बोईंग स्टारलायनर स्पेसक्राफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अवघ्या आठवडाभराने त्यांची होणारी पृथ्वीवापसी तब्बल दोन महिने झाले तरी रखडली आहे. त्यामुळे अख्खे जग स्तंभीत झाले आहे. जगभरातील वृत्तपत्रे या बातम्यांनी भरली आहेत. एकीकडे जगभर चिंता व्यक्त केली जात असताना मात्र सुनीता विल्यम्स आणि बट विल्मोर यांचे कुटुंबिय इकडे आरामात आहेत.

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकात अडकून पडल्या आहेत. त्यांची पृथ्वी वापसी आता फेब्रुवारी 2025 मध्येच होऊ शकते असे म्हटले जात आहे.अवघ्या आठ दिवसांसाठी गेलेल्या सुनीता यांना चक्क आता फेब्रुवारी महिन्यापर्यंत तेथेच रहावे लागणार असल्याने जग चिंतेत आहे. मात्र या दोन्ही अंतराळवीरांच्या घरी मात्र काहीही चिंता व्यक्त केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अंतराळात हे दोघे त्यांची ड्यूटी योग्य प्रकारे करीत असतील त्यामुळे काही चिंता नाही असे दोघांचेही कुटुंबिय म्हणत आहेत.

त्यांचा वेळ तेथे मजेत जात आहे

अंतराळवीर सुनीता आणि बट विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात इतर सात क्रु मेंबर सोबत आहेत. त्यांचा वेळ तेथे मजेत जात आहे. सायन्टीफिक वर्क करण्यात त्यांनी त्यांचा वेळ घालवावा अशी अपेक्षा कुटुंबिय करीत आहेत.ते अंतराळातून दूरभाष प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देखील देत आहेत. ते स्नायू सक्रीय राहण्यासाठी तसेच हाडे मजबूत राहण्यासाठी दररोज सकाळी काही तास व्यायाम देखील करीत आहेत. तसेच आठ तास कंपलसरी झोप देखील घेत आहेत. ते आपल्या कुटुंबियांशी ईमेलवरुन संपर्कात आहेत आणि रोजच्या घडामोडी कळवित आहेत.

विल्मोर यांचे कुटुंबिय त्यांचा अंतराळ मुक्काम लांबल्याने फारसे चिंतित नाहीत. त्यांची पत्नी डिएन्ना म्हणाली न्यूयॉर्क पोस्टच्या बातम्यांनूसार माझे पती फेब्रुवारी किंवा मार्च ( 2025 ) पर्यंत पृथ्वीवर येणार नाहीत हे आम्ही जाणून आहोत. परंत ते दररोज आमच्या संपर्कात आहेत. त्यांची कन्या डार्यन म्हणाली की माझ्या पप्पा कूल आहेत. त्यांनी पृथ्वीचे अनेक वेगळ्या एंगलचे फोटो मला पाठविले आहेत. सुर्यास्त पाहातानाचा त्यांचा फोटो मला खास आवडलाय’ सुनिता आणि विल्मोर यांच्या कुटुंबिय निर्धास्त आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या बातमी म्हटले आहे की सुनिता विल्यम्स यांचे पती मायकल जे.विल्यम्स म्हणतात की “ती तिची आनंदाची जागा आहे,जरी ती अंतराळात अडकली असली तरी..

‘तुम्ही ती म्हण ऐकली असेल, की अपयश हा पर्याय नाही, म्हणूनच आम्ही आता इथेच थांबलो आहोत…आम्हाला विश्वास आहे की आम्ही करीत असलेल्या चाचण्या योग्य उत्तरे मिळविण्यासाठी आहेत. आम्हाला परत येण्यासाठी आवश्यक असलेला डेटा देण्यासाठी आम्हाला त्या करणे आवश्यक आहे, असे अंतराळवीर बट विल्मोर यांनी म्हटले आहे.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.