नेपाळमध्ये सत्तासंघर्ष सुरु, माजी पंतप्रधान ‘प्रचंड’ पत्नीच्या उपचारासाठी मुंबईमध्ये येणार

नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता असताना पुष्प कमल दहल प्रचंड पत्नीच्या उपचारासाठी मुंबईत येत आहेत. (Pushpa Kamal Dahal Prachand)

नेपाळमध्ये सत्तासंघर्ष सुरु, माजी पंतप्रधान 'प्रचंड' पत्नीच्या उपचारासाठी मुंबईमध्ये येणार
पुष्प कमल दहल प्रचंड, माजी पंतप्रधान, नेपाळ
Follow us
| Updated on: Jan 04, 2021 | 7:03 PM

नवी दिल्ली: नेपाळमध्ये राजकीय संघर्ष सुरु आहे. पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी सरकार बरखास्त केलं आहे. नेपाळची राजकीय स्थिती अस्थिर असताना सत्तारुढ नेपाळी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख पुष्प कमल दहल प्रचंड त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. प्रचंड यांची पत्नी सीता दहल यांना मेंदूविषयक आजार असून त्यांच्यावर मुंबईमध्ये उपचार केले जाणार आहेत. (Ex Nepal pm Pushpa Kamal Dahal Prachand came to Mumbai for wife treatment)

पुष्प कमल दहल प्रचंड काठमांडूहून मुंबईला येण्यासाठी विमानानं रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत सीता दहल, आणि दोन मुली मुंबईला येणार आहेत. सीता दहल या प्रोग्रेसिव्ह सुप्रान्यूक्लीअर पल्सी या आजारावर उपचार करण्यासाठी मुंबईला येत आहेत.

मुंबईपूर्वी अमेरिका, सिंगापूरमध्ये उपचार

सीता दहल यांच्यावर यापूर्वी अमेरिका आणि सिंगापूरमध्ये उपचार कऱण्यात आलेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार मुंबईतील न्यूरोजेन ब्रेन अँड स्पाईन इनस्टिट्यूटमध्ये उपचार करणयात येणार आहेत. डॉ. आलोक शर्मा सीता दहल यांच्यावर उपचार करतील अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. मागील आठवड्यात सीता दहल यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांच्यावर काठमांडू येथील मेडिसीटी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.

नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता

सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांनी 20 डिसेंबरला संसद भंग करण्याचा प्रस्ताव मांडला. पंतप्रधानांच्या प्रस्तावाला नेपाळच्या राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी त्याच दिवशी मंजुरी दिली. यामुळे नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. नेपाळ मध्ये आता 30 एप्रिल आणि 10 मे रोजी निवडणूक होणार आहे. नेपाळमधील हिंदू संघटनांनी देशाला पुन्हा एकदा हिंदू राष्ट्राचा दर्जा देण्यासाठी आणि राजेशाही परत आणण्यासाठी निदर्शने केली होती. नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता असताना माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड पत्नीच्या उपचारासाठी भारतात येत आहेत.

के.पी.शर्मा ओलींची पक्षाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी

के.पी. शर्मा ओली करत आहेत तर पक्षाचे वरिष्ठ नेते पुष्पकमल दहल दुसऱ्या गटाचे नेतृत्व करत आहेत. दहल यांच्या गटाने केंद्रीय समितीची बैठक घेत सत्तारुढ पक्ष नेपाळी कम्युनिस्ट पार्टीच्या अध्यक्षपदावरुन ओली यांना हटवलं आहे.

संबंधित बातम्या:

नेपाळमध्ये राजकीय घडामोडींना वेग, केपी शर्मा ओली यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं

नेपाळमध्ये राजकीय संकट वाढलं, पंतप्रधान ओलींकडून संसद बरखास्त, आता पुढे काय?

(Ex Nepal pm Pushpa Kamal Dahal Prachand came to Mumbai for wife treatment)

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.