explainer | तुर्कीने बनविले अमेरिकेपेक्षा चारपट खतरनाक क्षेपणास्र, भारतालाही होऊ शकतो धोका
तुर्कस्थान आपल्या रॉकेटसन कंपनीच्या मदतीने रणगाडा विरोधी क्षेपणास्र विकसित केले आहे. या क्षेपणास्र अमेरिकेच्या javelin क्षेपणास्रापेक्षा चार पट जास्त ताकदवान आहे. तुर्कीच्या क्षेपणास्राचा पल्ला जगात सर्वात जास्त आहे. या क्षेपणास्राचा भारतालाही धोका निर्माण झाला आहे. कसा ते पाहूयात...
अंकारा | 29 नोव्हेंबर 2023 : तुर्कस्थानने LUMTAS-GM या रणगाडा विरोधी क्षेपणास्राची चाचणी केली आहे. या मिसाईलने आपल्या चाचणीत 16 किलोमीटर पेक्षा अधिक पल्ल्यावरील लक्ष्यभेद केला आहे. या क्षेपणास्राला शस्रास्र निर्मिती कंपनी रॉकेटसन हीने तयार केले आहे. रॉकेटसन कंपनीचे हे क्षेपणास्र सहा प्रमुख रशिया, अमेरिका आणि फ्रान्सच्या एटीजीएम मिसाईल सिस्टीम पेक्षा सर्वात जास्त पल्ल्याची आहे. शिवाय हे क्षेपणास्र हवा, जमीन आणि नौदलासाठी समुद्रावरुन डागता येऊ शकणारे आहे. तुर्कस्थान अलिकडच्या वर्षांतच हे घातक शस्र विकसित केले असूनही भारतालाही त्याचा धोका आहे.
तुर्कीच्या रॉकेटसन कंपनीने या मिसाईलच्या चाचणीत त्याने 16 किमीवरील लक्ष्य भेद केल्याचा व्हिडीओ देखील जाहीर केला आहे. LUMTAS-GM मिसाईलचे वजन 41.3 किलोग्रॅम आहे. याची लांबी 1.72 मीटर आहे. तसेच हॅलिकॉप्टरने जर हे डागले तर 16 किलोमीटर ऐवजी हे 20 किमी पर्यंतच्या लक्ष्याचा देखील भेद करू शकते असे म्हटले आहे. तुर्कीकडे आधीच हलक्या श्रेणीतील T-129 ATAK लडाऊ हेलिकॉप्टर आहे. त्यामुळे तुर्कीच्या माऱ्याची क्षमतेत वाढ होणार आहे.
पाकिस्तान पोहण्याची शक्यता ?
सध्या एटीजीएममध्ये तुर्कीच्या या मिसाईलचा सर्वात जास्त पल्ला आहे. अमेरिकेच्या प्रगत जेवलिन मिसाईलचे जॉइंट वेंचर संस्करण 4 किमीपर्यंतच मारा करु शकते. BGM-71TOW ची कमाल पल्ला 3.75 किमी आहे. तर 4 किमी पल्ल्याच्या आवृत्तीचा विकास सुरु आहे. फ्रान्स आणि जर्मन MILAN ATGM चा MILAN-ER आवृत्ती 3 किमी पल्ल्याची आहे. तर तुर्कीच्या मिसाईलची रेंज सर्वात जास्त 16 किमी इतकी जादा आहे. तुर्कीची हे क्षेपणास्र भारतासाठी डोकेदुखी बनू शकते. याचे कारण भारत आणि तुर्कस्थान यांच्यात वारंवार शस्रास्राचा व्यापार होत आला आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
Genişletilmiş Uzun Menzilli Tanksavar Füze Sistemimiz (LUMTAS-GM) uzun menzilli test atışını başarıyla gerçekleştirdi ve hedefi tam isabetle vurarak sahada kendini kanıtladı. 🎯#YarınİçinYüksel#Roketsan 🚀 pic.twitter.com/CrKCEgcU2x
— Roketsan (@roketsan) November 22, 2023
पाकिस्तान तुर्कीकडून हे क्षेपणास्र विकत घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. रॉकेटसन कंपनीने हे अत्याधुनिक क्षेपणास्र पाकिस्तानाला विकण्याची तयारी केली आहे. याच बरोबर रॉकेटसन कंपनी पाकिस्तान सोबत तंत्रज्ञान सहकार्य करून एकत्रित या क्षेपणास्राची निर्मिती करणार आहे. त्यामुळे भारताला याचा धोका असल्याचे म्हटले जात आहे.