काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील कलाकन जिल्ह्यात बुधवारी (12 मे) 2 मोठे स्फोट झाले. अफगानिस्तानच्या टोलो न्यूजने याबाबत माहिती दिलीय. या वृत्तानुसार, या भागात बराच काळ गोळीबाराचे आवाज ऐकू येत होते. एका सुरक्षा दलातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, स्फोट इतके भीषण होते की त्यामुळे उज्बेकिस्तानमधून अफगाणिस्तानला येणाऱ्या वीजेचे खांबच तुटले. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झालाय (Explosion and firing in Kalakan district of Kabul Afghanistan).
BREAKING: Two large explosions were heard in the Kalakan district of Kabul and gunfire has been ongoing for the last 30 minutes, said a TOLOnews reporter in the area. pic.twitter.com/Lbll0kkrTJ
— TOLOnews (@TOLOnews) May 12, 2021
शाळेजवळील स्फोटात 50 जणांचा मृत्यू
दरम्यान याआधी अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या शिया बहुल पश्चिम भागात शनिवारी (8 मे 2021) एका शाळेजवळ बॉम्बस्फोट झाला. यात तब्बल 50 लोकांचा मृत्यू झाला. यात अनेक तरुण विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अफगान सरकारच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली होती. नागरिकांना लक्ष्य करत केलेल्या या हल्ल्याचा तालिबानने निषेध केलाय. तसेच या हल्ल्यात आपला हात नसल्याचा स्पष्ट केलंय.
अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते तारिक अरियान म्हणाले, “शिया बहुल दस्त-ए-बारची भागातील सैयद अल-शाहदा शाळेजवळ बॉम्बस्फोट झाला. यानंतर रुग्णवाहिकेच्या मदतीने तेथून जखमींना बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमींची संख्या अधिक असल्याने मृतांची संख्याही वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केलीय. हा स्फोट खूपच भयानक असल्याचं स्थानिक रहिवाशांनी सांगितलंय. या भागात राहणाऱ्या नसीर रहिमी यांनी या भागात 3 वेगवेगळ्या स्फोटांचा आवाज एकल्याचं सांगितलंय.
आरोग्य कर्मचाऱ्यांवरही हल्ला
काबुलमध्ये बुधवारी (12 मे 2021) सकाळी आरोग्य कर्मचाऱ्यांना घेऊन जात असलेल्या एका मिनी बसलाच लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. काबुल पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. काबुल पोलीस प्रमुखांचे प्रवक्ते फर्दवस फरामर्ज म्हणाले, “या घटनेत 3 आरोग्य कर्मचारी जखमी आहेत. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.”
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :
Explosion and firing in Kalakan district of Kabul Afghanistan