दुसऱ्या महायुद्धातील 5,400 किलोच्या बॉम्बचा पोलंडमध्ये स्फोट, थरकाप उडवणाऱ्या लाटांची निर्मिती
दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीश सैन्याने पोलंडवर टाकलेल्या सर्वात मोठ्या बॉम्बचा तो निकाम करताना स्फोट झाला आहे.
वर्झावा (पोलंड) : दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीश सैन्याने पोलंडवर टाकलेल्या सर्वात मोठ्या बॉम्बचा तो निकाम करताना स्फोट झाला आहे. पोलंड नौदलाकडून हा बॉम्ब निकामी करण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र, त्यांना यश येण्यापूर्वीच या बॉम्बचा स्फोट झाला. पोलंड नौदलाच्या तयारी आणि सतर्कतेमुळे या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या बॉम्बला ‘भूकंप बॉम्ब’ किंवा ‘टेलबॉय’ नावाने ओळखले जात होते (Explosion of Largest Second world war bomb in poland).
दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीश हवाई दलाने पोलंडच्या उत्तर-पश्चिम भागामध्ये हा बॉम्ब होता. मात्र, तो त्यावेळी फुटला नाही. नंतरच्या काळात सप्टेंबर 2019 हा टेलबॉय बॉम्ब उत्खननामध्ये सापडला. रस्त्याचं खोद काम सुरु असताना स्झ्झासिन बंदराकडे जाणार्या एका जलवाहिनीच्या खाली हा बॉम्ब सापडला होता. युद्धादरम्यान इतका मोठा बॉम्ब टाकूनही त्याचा स्फोट का झाला नाही याबाबत वैज्ञांनिकांना देखील माहिती सांगता आलेली नाही. त्यामुळे हा बॉम्ब एक गुढ बनून राहिला.
The largest unexploded #WW2 bomb ever found in Poland, a British Tallboy, has detonated during the defusing process. #NoInjuries pic.twitter.com/BHo4GQabpX
— RG Poulussen (@rgpoulussen) October 14, 2020
टेलबॉय बॉम्बचे वजन 5 हजार 400 किलो
युद्धादरम्यान बॉम्ब टाकलेला स्विनोझ्स्की हा जर्मनीचा भाग होता. त्याला स्वाइनमंडे म्हणतात. या टेलबॉय बॉम्बचे वजन 5 हजार 400 किलो इतके होते. त्यात 2,400 किलो स्फोटकं होती. त्याची लांबी 6 मीटर (19 फूट) इतकी होती. हा बॉम्ब ब्रिटिश एरोनॉटिकल अभियंता बार्नेस वॉलिस यांनी डिझाईन केला होता. त्यानंतर रॉयल एअर फोर्सने 1945 मध्ये जर्मन क्रूझर, लुत्झोवर हल्ला केल्याने रॉयल एअर फोर्सने हा बॉम्ब खाली टाकला होता.
स्फोटाचे धक्के दूरपर्यंत
#Tallboy, the largest unexploded #WWII bomb detonated? – Lt Cmdr G.Lewandowski, 8th Coastal Defence Flotilla: The deflagration process turned into detonation. The object can be considered neutralised, it will not pose any more threat to the Szczecin-Swinoujscie shipping channel. pic.twitter.com/xHkRzAaONn
— Poland MOD ?? (@Poland_MOD) October 14, 2020
बॉम्ब निकामी करताना झालेल्या या स्फोटाचे धक्के पोलंडमधील या घटनास्थळापासून बऱ्याच अंतरापर्यंत जाणवले. या स्फोटाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात स्फोटानंतर तलावातील पाण्याचा मोठा फवारा हवेत फेकला गेल्याचं दिसत आहे. बॉम्बचा स्फोट होण्यापूर्वीच पोलंड नौदलाने सर्व जवान आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले होते (The largest world war bomb found in poland expioded).
या स्फोटानंतर पोलंड नौदलाचे प्रवक्ते ग्रिगॉर्झ लेवँडोव्स्की म्हणाले, “बॉम्ब निकामी करत असताना त्याचा स्फोट झाला आहे. आता या बॉम्बपासून कोणताही धोका नाही. स्फोट झाला त्यावेळी परिसरातील सर्व 750 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. तसेच आजूबाजूचा जवळपास 2.5 किलोमीटरचा भाग रिकामी करण्यात आला होता (The largest world war bomb found in poland expioded).
बॉम्ब निकामी करण्यापूर्वी नौदलाने खबरदारी म्हणून संपूर्ण परिसर रिकामा केला होता. 750 हून अधिक लोकांना येथून दुसर्या ठिकाणी नेण्यात आले होते. स्फोट इतका जोरदार होता, की स्विन्झोव्स्कीच्या काही भागात भूकंप सदृष्य धक्के जाणवले. पोलंडच्या नौदलाने बॉम्ब निकामी करण्यासाठी रिमोट कंट्रोल उपकरणांचा उपयोग केला.
हेही वाचा :
अफगाणिस्तानमध्ये मशिदीत भीषण स्फोट, 62 जणांचा मृत्यू
अफगाणिस्तानात आत्मघातकी हल्ला, 40 जणांचा मृत्यू, 100 पेक्षा अधिक जखमी
Explosion of Largest Second world war bomb in poland