काबुल : अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूलजवळील एका जवळ तीन बॉम्ब स्फोट (Explosion) झाले होते. त्यात सहा जणांचा मृत्यू तर डझनभर जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच आता काबूलसह (kabul) अफगानिस्तान पुन्हा एकदा धमाक्यांनी हादरले. यावेळी देशातील वेगवेगळ्या ठिकाणी तीन स्फोट झाल्याने अख्खा देश हादरला. हे स्फोट काबुल, मजार शरीफ (Mazar-e-Sharif) आणि कुंदूज मध्ये झाले. तर भयंकर बाब म्हणजे मजार शरीफमध्ये झालेला स्फोट हा येथील शीया मशीदीत झाला. येथे 20 जणांचा मृत्यू झाला असून 60 जन जखमी झाले आहेत. तसेच काबुलमध्ये रस्त्याच्या बाजूला ही स्फोट झाला. त्यामुळे येथे दोन लहान मुले जखमी झाल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. तर या स्फोटांची जबाबदारी अजूनही कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही.
याच्याआधी मंगळवारी अफगानिस्तानच्या काबुल शहरातील शिक्षण संस्थांना लक्ष करण्यात आले होते. ज्यात सात मुलांचा मृत्यू झाला होता. हे स्फोट काबुल जवळील दश्त-ए-बारचीमधील अब्दुल रहिम शहिद हायस्कुल जवळ करण्यात आले होते. येथे मुलांच्या परिक्षा सुरू होत्या. त्यावेळी देखील कोणत्याच संघटनेने त्या धमाक्यांची जबाबदारी घेतली नव्हती. मात्र पहिल्या स्फोटात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचे नाव समोर आले होते.
दरम्यान एप्रिलच्या सुरूवातीला काबुलमधील सगळ्यात मोठ्या मशीदीवर हातबॉम्ब टाकण्यात आला होता. त्यात 6 लोक जखमी झाले होते. हा हातबॉम्ब येथील 18 व्या शतकातील पुल-ए-खिश्ती मशीदीवर टाकण्यात आला होता. तर मागील वर्षीही शाळेच्या बाहेर असचा हल्ला झाला होता जेंव्हा तालिबानने सत्तेचा ताबा घेतला होता. त्यात 60 पेक्षाअधीक शाळकरी मुलांचा मृत्यू झाला होता.
तर 3 एप्रिलला सुद्धा काबुलच्या मध्यवर्ती ठिकाणी स्फोट झाला होता. ज्यात अनेकांचा मृत्यू झाला होता. तर 59 जन जखमी झाले होते. त्यावेळी काबुल आपत्कालिन रूग्णालयाकडून, एकाचा मृत्यू तर 59 जखमी असल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी 30 जनांना अतिदक्षाता विभागात हलविण्यात आले होते.
तसेच तालिबान पोलिसांचे प्रवक्ते खालिद जादरान यांनी सांगितले की, या स्फोटामागे एक चोर आहे. जो पैसे बदलून देणाऱ्यांना लुटनार होता. त्यावेळी 10 जखमी झाले होते.