धक्कादायक, पैशांच्या हव्यासापोटी पोटच्या 2 मुलांची नदीत बुडवून हत्या, आरोपी वडिलांना तब्बल 212 वर्षांची शिक्षा

अमेरिकेत (America) पैशांच्या लोभापाई वडिलांनीच आपल्या दोन मुलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

धक्कादायक, पैशांच्या हव्यासापोटी पोटच्या 2 मुलांची नदीत बुडवून हत्या, आरोपी वडिलांना तब्बल 212 वर्षांची शिक्षा
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 9:05 PM

वॉशिंग्टन : अमेरिकेत (America) पैशांच्या लोभापाई वडिलांनीच आपल्या दोन मुलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. आरोपी वडिलांनी आपल्या कुटुंबाचा अपघात विमा (Accident Insurance) काढला. काही काळ या विम्याचे हप्ते भरल्यानंतर त्याने विम्यावर दावा करण्यासाठी आपल्या पोटच्या मुलांच्याच अपघाताचा कट रचला. यानुसार त्याने कुटुंबाला सहलीला जायचं असं सांगून कारचा नदीच्या जवळ ठरवून अपघात केला. यात तो स्वतः वाचला, मात्र त्यात त्याच्या 8 आणि 13 वर्षांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीला न्यायालयाने तब्बल 212 वर्षांची शिक्षा सुनावली (Father killed his two sons for money of accident insurance policy in America).

मुलांची हत्या करणाऱ्या 45 वर्षीय आरोपीचं नाव अली एलमेजयेन (Ali Elmezayen) असं आहे. तो मिस्रचा नागरिक आहे. त्याने आपल्या दोन मुलांच्या नावावर अपघात विमा काढला होता. त्याचा डोळा या विम्याच्या रकमेवर होता. विम्याची ही मोठी रक्कम आपल्याला मिळावी यासाठी त्याने आपल्याच मुलांच्या अपघाताचा कट रचला. आरोपीने 9 एप्रिल 2015 रोजी आपल्या दोन मुलांना आणि पत्नीला लॉस एंजलसला फिरायला जायचं आहे असं सांगून गाडीत बसवलं. त्यानंतर त्याने मध्येच रस्त्यात गाडीचा अपघात घडवला आणि गाडी नदीत पाडली. अपघातानंतर त्याने मुलांना कोणतीही मदत न करता गाडीतून आपला जीव वाचवला आणि मुलांना मरण्यासाठी गाडीतच सोडून दिलं.

20 कोटी रुपयांच्या विम्यासाठी दरवर्षी 4.2 लाख रुपयांचा हप्ता भरला

आरोपीच्या कटाप्रमाणे दोन मुलं आणि पत्नी यात मरेल असं नियोजन करण्यात आलं होतं, पण त्याची पत्नीला बुडताना पाहून मच्छिमारांना तिला वाचवण्यात यश आलं. मात्र, दोन पोहू न शकल्याने पाण्यात बुडाले. यानंतर आरोपी या मुलांच्या नावावरील अपघात विम्याची 20 कोटी रुपयांची रक्कम घेणार त्याआधीच पोलिसांनी हा कट उघड केला. आरोपी या विम्यापोटी दरवर्षी 6 हजार डॉलर म्हणजे जवळपास 4.2 लाख रुपये भरत होता.

न्यायालयाकडून तब्बल 212 वर्षांची शिक्षा

या प्रकरणाची सुनावणी करणारे जिल्हा न्यायाधीश जॉन वाल्टर यांनी गुरुवारी (11 मार्च 2021) आरोपी अली एलमेजयेनने नियोजनबद्धपणे विचारपूर्वक आपल्या मुलांचा निर्दयी खून केल्याचं निरिक्षण नोंदवलं. तसेच आरोपीला मुलं मेल्याचं काहीही दुःख नसून त्याला केवळ आपण पकडले गेल्याचं वाईट वाटतंय असं सांगत आरोपीला तब्बल 212 वर्षांची शिक्षा सुनावली. आरोपी एक नंबरचा षडयंत्रकारी, खोटा, स्वार्थी आणि लालसेने अंधळा झालेला निर्दयी गुन्हेगार असल्याचंही न्यायालय म्हणालं. 212 वर्षांच्या शिक्षेशिवाय आरोपीला विमा कंपनीला जवळपास 1.9 कोटी रुपये दंड देण्याचेही आदेश दिले.

हेही वाचा :

भाऊजींचं उडवलेलं डोकं घेऊन मेहुणा पोलिस स्टेशनात, बहिणीचीही आत्महत्या

दोघा प्रवाशांना रिंग रोडला नेलं, संध्याकाळी रिक्षाचालकाचा मृतदेह आढळला, नागपुरात खळबळ

सहा महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज, क्षुल्लक वादातून पतीकडून नवविवाहितेची हत्या

व्हिडीओ पाहा :

Father killed his two sons for money of accident insurance policy in America

'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.