VIDEO: आकाशातच विमानाच्या इंजिनमध्ये स्फोट, 241 लोकांचा जीव टांगणीला, अंगाचा थरकाप उडवणारी दृष्ये
अमेरिकेतील (America) डेनवर आंतरराष्ट्रीय विमान तळावर (Denver International Airport) शनिवारी (20 फेब्रुवारी) रात्री उशिरा मोठा अपघात होता होता टळला.
United Airlines Boeing Plane Incident वॉशिंग्टन : अमेरिकेतील (America) डेनवर आंतरराष्ट्रीय विमान तळावर (Denver International Airport) शनिवारी (20 फेब्रुवारी) रात्री उशिरा मोठा अपघात होता होता टळला. युनायटेड एअरलाईन्सच्या (United Airlines) एका विमानाला उड्डाणानंतर काही वेळेत आकाशातच आग लागली आणि विमानाचे भाग जमिनीवर कोसळायला लागले. त्यानंतर विमानावरील नियंत्रण सुटत विमान जमिनीच्या दिशेने कोसळू लागलं. मात्र, विमान चालकाच्या प्रसंगावधानाने विमानातील 241 प्रवाशांचा जीव वाचलाय (Fire in United Airlines Boeing Plane in air with 241 passengers).
it’s a little on fire it’s still good it’s still good#UA328
(video via @michaelagiulia) pic.twitter.com/K5r7TE4DJg
— Prof. Paul Byrne (@ThePlanetaryGuy) February 20, 2021
युनायटेड एअरलाईन्सचं विमान 241 प्रवाशांना घेऊन होनोलूलूसाठी रवाना झालं. मात्र, उड्डानानंतर लगेचच त्याचं उजवं इंजिन खराब झालं आणि त्याला आग लागली. यानंतर विमानाच्या उजवीकडील भाग जळून त्याचे तुकडे हवेतून थेट जमिनीवर पडू लागले. त्यामुळे एकाचवेळी विमानातील 241 प्रवाशी आणि हे तुकडे ज्या नागरी वसाहतीत पडत होते तेथील लोकांचा जीव टांगणीला लागला. सर्वांमध्येच भीतीचं वातावरण होतं. आता विमान खाली कोसळणार आणि सर्वांचाच जीव जाणार असाच विचार विमानातील प्रवाशांच्या मनात आला. मात्र, अशा परिस्थितीतही विमान चालकाने प्रसंगावधान दाखवत विमान सुरक्षितपणे जमिनीवर उतरवण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले.
I saw an explosion on this low flying aircraft over @broomfield about 45 minutes ago. Debris fell from the plane and left a black cloud of smoke. The plane continued on. Any new on if this plane landed safely? @BroomfieldPD @NMFirePIO @9NEWS @KyleClark pic.twitter.com/paMCdiuWMN
— Tyler Thal (@tgthal) February 20, 2021
अंगाचा थरकाप उडवणारी दृष्य
विमानाच्या इंजिनमध्ये स्फोट होऊन आग लागल्यानंतर विमान अचानकपणे जमिनीच्या दिशेने कोसळू लागलं. यावेळी काही प्रवाशांनी या घटनेचे व्हिडीओ देखील काढले आहेत. त्यामुळेच अंगाचा थरकाप उडवणारी ही दृष्य सर्वांच्या समोर आली आहेत. या विमानात एकूण 241 लोक होते. यात 10 विमान कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
कोसळत असलेल्या या विमानाचा व्हिडीओ व्हायरल
विमानाला आग लागल्यानंतरचा प्रसंग अनेक लोकांनी जमिनीवरुनही पाहिला. काहींनी तर कोसळत असलेल्या या विमानाचा व्हिडीओ देखील काढला. त्यांनी हा व्हिडीओ काढताना कसा आपल्यालाही जीवाचा धोका वाटला याचेही अनुभव सांगितलेत. विमान चालकाने विमान सुरक्षितपणे जमिनीवर उतरवल्याने सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. अनेक लोक आता आपल्या जीवघेण्या अनुभवांचं कथन करत आहेत. तसेच सुरक्षितपणे विमान उतरवणाऱ्या चालकाचे आभार मानत आहेत.
अपघाताची चौकशी सुरु
इंजिन नादुरुस्त झाल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र याचा तपास स्वतंत्रपणेही करण्यात येत आहे. यातच अधिकृत कारणांचा उलगडा होणार आहे. ब्रूमफील्ड पोलीस विभागाने (Broomfield Police Department) ट्विटरवर या घटनेनंतर जमिनीवर पडलेल्या विमानाच्या तुकड्यांचे फोटोही शेअर केले आहेत.
हेही वाचा :
Kerala Plane Crash Photos: केरळमध्ये विमानाचा थरकाप उडवणारा अपघात, 30 फूट खाडीत कोसळून दोन तुकडे
Karachi plane crash | पाकिस्तानात 100 प्रवाशांसह विमान इमारतीवर कोसळलं
9 दिवसांनंतर बेपत्ता AN-32 विमानाचे अवशेष सापडले
व्हिडीओ पाहा :
Fire in United Airlines Boeing Plane in air with 241 passengers