चीन मंदीच्या उंबरठ्यावर, जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी शेजारी राष्ट्रांच्या कुरापती

चीनचं अंतर्गत चित्र काहीसं वेगळंच असल्याचं समोर येतंय. चीनच्या अंतर्गत स्थितीमुळे स्वतः चीनचे अध्यक्ष जिनपिंग देखील चिंतेत असल्याचं बोललं जात आहे.

चीन मंदीच्या उंबरठ्यावर, जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी शेजारी राष्ट्रांच्या कुरापती
Follow us
| Updated on: Oct 27, 2020 | 4:11 PM

बीजिंग : जगभरात कोरोना काळातही चीनची अर्थव्यवस्था तग धरुन राहिल्याची जोरदार चर्चा होती. तसेच जगातील सर्वात वेगाना वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेंपैकी एक असल्याचंही बोललं जातंय. मात्र, चीनचं अंतर्गत चित्र काहीसं वेगळंच असल्याचं समोर येतंय. चीनच्या अंतर्गत स्थितीमुळे स्वतः चीनचे अध्यक्ष जिनपिंग देखील चिंतेत असल्याचं बोललं जात आहे. चीनमध्ये सध्या भयानक अन्न तुटवड्याची स्थिती (Food Crisis) तयार झाली आहे (Food shortage in China recession messing with neighbors to divert public attention).

चीनमधून जगभरात कोरोना संसर्ग पोहचला, मात्र यात सर्वात आधी चीनच्याच अर्थव्यवस्थेला फटका बसला. त्यानंतर लगेचच चीनमधील पुराने उरली सुरली कसरही भरून काढली. या पुरात चीनची अन्नधान्याची शेती उद्ध्वस्त झाली. यानंतर यातूनही शिल्लक राहिलेली पीकं टोळधाडीने फस्त केली. आता चीनमधील स्थिती इतकी वाईट झाली आहे की चीनला दुसऱ्या देशांकडून अन्नधान्य खरेदी करावं लागत आहे.

चीनमध्ये महागाईने उच्चांक गाठला आहे. काही भागात तर कुपोषणाची आणि भूकबळीची स्थिती तयार झालीय. चीनमधील ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने शी जिनपिंग देखील चिंतेत आहेत. याच संकटावरुन लक्ष हटवण्यासाठी चीनकडून आपल्या शेजारी राष्ट्रांच्या कुरापती काढल्या जात असल्याचं बोललं जातंय. सोशल मीडियावर चीनमधील या विदारक स्थितीचा दावा करत काही व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडीओ चीनच्या हेनान प्रांतातील असल्याचं सांगितलं जातंय. या ठिकाणी भुकेने व्याकूळ लोकांसाठी जेवण आणलं गेलं होतं. मात्र, अन्न कमी असल्याने आणि गर्दी अधिक असल्याने येथे एकच गोंधळ उडाला. लोकांवर नियंत्रण करणंही शक्य झालं नाही, असा दावा या व्हिडीओसोबत करण्यात येत आहे.

चीनमध्ये धान्याचा तुटवडा

चीनवरील रिपोर्ट आणि आकडेवारी पाहिलं तर तेथील संकटाचा अंदाज येतो. चीनला जवळपास सर्व खाद्यपदार्थांची आयात करावी लागत आहे. मागील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये चीनने गव्हाची 1.07 मिलियन टनपर्यंत आयात केली होती. मागील वर्षीच्या तुलनेत ही आयात 548.5 टक्के अधिक आहे. याशिवाय 1.1 मिलियन टन मका आयात करण्यात आली हे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत 675 टक्क्यांनी वाढलं आहे. तसेच 5 लाख 70 हजार टन खाद्यतेल आयात (356 टक्के वाढ) आणि 1.34 मिलियन टन जवाची आयात ( 57.1 टक्के वाढ) करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

तैवानला शस्त्रास्त्र पुरवणाऱ्या अमेरिकी कंपनीवर चीनची बंदी

बल्गेरियाचाही चीनला झटका, ड्रॅगनला बाजूला करत अमेरिकेशी 5G चा करार

संयुक्त राष्ट्रात चीनची पत खालावली, मानवहक्क परिषदेच्या निवडणुकीत सर्वात कमी मतं

संबंधित व्हिडीओ :

Food shortage in China recession messing with neighbors to divert public attention

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.