भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध; माजी न्यायमंत्र्याला थेट फाशीची शिक्षा
झेंगुआ यांच्यावरील आरोपांची सखोल चौकशी करण्यात आली. तपासाअंती त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले. यानंतर झेंगुआ यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
बीजिंग : भरातासह सर्वच देशात भ्रष्टाचार होतो. पदाचा गैरफायदा घेत अनेक मंत्री देखील घोटाळे करतात. भारतात अशा अनेक घोटाळेबाज मंत्र्यांवर कारवाई झाली आहे. बरेच मंत्री जेलची हवा खावून बाहेर आले आहेत. चीनमध्ये मात्र, घोटाळेबाज मंत्र्यांविरोधात कठोर कारवाई केली जाते. घोटाळ्याचे आरोप सिद्ध झाल्यानंतर चीनचे माजी न्यायमंत्री के फू झेंगुआ( Chinese Justice Minister Ke Fu Zhenghua) यांना थेट फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
थेट माजी मंत्र्यांवरच कठोर कारवाई झाली आहे. चीनमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाते. हे या कारवाईमुळे अधोरेखित झाले आहे.
चीनच्या स्थानिक न्यूज एजन्सीने याबाबतचे वृत्त दिले आहे. माजी न्यायमंत्री के फू झेंगुआ यांनी पदाचा गैरवापर करत भ्रष्टाचार केला होता.
झेंगुआ यांच्यावरील आरोपांची सखोल चौकशी करण्यात आली. तपासाअंती त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले. यानंतर झेंगुआ यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
झेंगुआ हे बीजिंग म्युनिसिपल ब्यूरो चीफ, चीन सरकारमध्ये सार्वजनिक सुरक्षा उपमंत्री म्हणूनही काम केले आहे. याआधी चीनचे माजी रेल्वे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
जुलैमध्ये चीनचे माजी न्यायमंत्री के फू झेंगुआ यांना लाच घेतल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली होती. सुत्रानुसार त्यांच्यावर 117 दशलक्ष युआन ($17.3 दशलक्ष)च्या भ्रष्टाचाराचा आरोप होता.
वैयक्तिक फायद्यासाठी त्यांनी कोट्यवधींचा घोटाळा केला होता. न्यायालयीन सुनावणीदरम्यान त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सन 2020 पासून भष्ट्राचार रोखण्यासाठी मोठी मोहिम हाती घेतली आहे. पोलिस आणि न्याय यंत्रणा भ्रष्टाचार मूक्त असली पाहिजे यावर त्यांचा भर आहे.