बोगोटा (कोलंबिया) : देव तारी त्याला कोण मारी ! असं म्हटलं जातं. कोलंबियातील विमान अपघातातील (plane crash) चिमुकल्यांसाठी ही म्हण खरी ठरली आहे. कोणत्याही भीषण अपघातात लहान बालकाचे वाचणे चमत्कारापेक्षा कमी नसते. असाच एक चमत्कार कोलंबियामध्ये घडला आहे. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या विमान अपघातानंतर कोलंबियाच्या घनदाट ॲमेझॉनच्या जंगलात (amazon jungle) 11 महिन्यांच्या बाळासह चार मुले जिवंत सापडली आहेत, असे खुद्द राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो (Gustavo Petro) यांनी बुधवारी सांगितले. ‘हा देशासाठी आनंदाचा क्षण आहे’ असे त्यांनी नमूद केले. पेट्रो यांनी ट्विटरवर ही बातमी शेअर केली. लष्कराच्या कठीण शोध मोहिमेनंतर ही मुले सुरक्षितपणे सापडली आहेत, असे त्यांनी नमूद केले.
एएफपी न्यूज एजन्सीनुसार, 1 मे रोजी क्रॅश झालेल्या विमानात प्रवास करणाऱ्या मुलांचा शोध घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्निफर कुत्र्यांसह 100 हून अधिक सैनिक तैनात केले होते. या विमान अपघाता तीन प्रौढ व्यक्तींचा मृत्यू झाला होता. त्या विमानात 11 महिन्यांचे एक बालक तसेच इतर तीन लहान मुले होती, असे समजते. त्यांचे वय अनुक्रमे 13, 9 आणि 4 वर्षे आहे. विमानाचा अपघात झाल्यापासून ही मुलं त्या लहान बालकासह दक्षिण काक्वेटाच्या जंगलात भटकत होती.
मुलांना जंगलात लाकडी निवारा मिळाल्यानंतर त्यांना शोधण्यासाठी बचावाचे प्रयत्न तीव्र करण्यात आले आहेत. असे बुधवारी सशस्त्र दलाने सांगितले होते. आहेत. यानंतर त्यांना खात्री पटली की मुले अजूनही जिवंत आहेत. सशस्त्र दलांनी जारी केलेल्या फोटोंमध्ये जंगलात एका ठिकाणी कात्री आणि हेअरबँड दिसू शकतात. यापूर्वी एका मुलाची पाण्याची बाटली आणि अर्धवट खाल्लेली फळे सापडली होती.
सोमवार आणि मंगळवारी, सैनिकांना पायलट आणि दोन प्रौढांचे मृतदेह सापडले. हे सर्व जण जंगलातील तळावरून सॅन जोझ डेल ग्वाविअरेकडे उड्डाण करत होते, असे समजते. मृत प्रवाशांपैकी एक महिला ही या मुलांची आई होती. त्या मुलांना शोधल्यानंतर मदतीसाठी तीन हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. त्यातील एक हुआटोटो भाषेत मुलांच्या आजीचा रेकॉर्ड केलेला संदेश वाजवत होता. ज्यामध्ये त्याला जंगलात जाणे बंद करण्यास सांगितले होते.